Categories: बातम्या

25 महिन्यात 25,00,00,000 यूजर मिळवून जियो ने केला रेकॉर्ड

इंंडियन टेलीकॉम बाजारात फक्त 4जी नेटवर्क वर चालणारी दूरसंचार कंपनी ​रिलायंस जियो ने आपल्या एंट्रीने देशातील टेलीकॉम बाजारचा चेहराच बदलून टाकला. इंटरनेट डेटा साठी भरभक्कम पैसे देणार्‍या यूजर्सना फ्री मध्ये इंटरनेट मिळू लागले आणि देशभरात केले जाणारे कॉल्स पण निशुल्क झाले. आपल्या अनोख्या प्लान्स मुळे जियो काही दिवसांत लोकांना आवडू लागली आहे. त्यातच आज रिलायंस जियो ने आपला नवीन तिमाही रिपोर्ट सादर करून सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. रिलायंस जियो ने सांगितले की फक्त 25 महिन्यांत जियो ने 250 मिलियन म्हणजे 25 कोटि लोक आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत.

रिलायंस जियो चे चेअरमन मुकेश अंबानी ने आज रिलायंस जियो संबंधीत रिपोर्ट शेयर करताना या मोठ्या रेकॉर्डची माहिती दिली आहे. अंबानी ने रिपोर्ट मधून सांगितले की रिलायंस जियो ने आपल्या सुरवातीपासून आता पर्यंत गेल्या 25 महिन्यात 250 मिलियन यूजर्सचा बेस मिळवला आहे. जियोशी पहिल्या 25 महिन्यात जोडल्या गेलेल्या लोकांची ही संख्या 25,00,00,000 आहे.

ताजे आकडे पाहिले तर 30 सप्टेंबर पर्यंत जियोचे 252.3 मिलियन सब्स्क्राइबर्स झाले होते. तुम्ही ऐकून हैराण व्हाल की गेल्या फक्त 12 महिन्यांत जियो नेटवर्क सोबत 114 मिलियन यूजर जोडले गेले आहेत आणि जियो सर्विसेज वापरता आहेत. जियो ने फक्त इतके यूजर्स जोडले नाहीत तर आपल्या डेटा आणि कॉलिंग स​र्विस ने पण नवीन रेकॉर्ड बनवाला आहे. ताज्या रिपोर्ट नुसार ​जियो नेटवर्क वर मागील तिमाहीत एकूण 771 कोटि जीबी डेटा वापरला गेला आहे.

जियो च्या नवीन रिपोर्ट नुसार 2018 च्या गेल्या तिमाहीत म्हणजे फक्त 3 महिन्यात वेगवेगळ्या प्लॅटफार्म वर जियो नटवर्क वरून एकूण 771 कोटी जीबी 4जी डेटा वापरला गेला. डेटा सोबतच वॉयस कॉलिंग साठी पण युजर्स जियो नेटवर्क निवडतात. रिपोर्ट नुसार गेल्या तिमाहीत जियो नेटवर्क वर एकूण 53,379 मिनिटे वॉयस कॉलिंग करण्यात आली आहे.

रिलायंस जियो च्या नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की एक जियो यूजर एक महिन्यात सरासरी 11.0जीबी 4जी डेटा वापरत आहे. तसेच सरासरी प्रत्येक जियो यूजर एका महिन्यात जवळपास 17.5 तास आॅनलाईन वीडियो बघण्यात घालवतात. तसेच ग्राहक आपल्या जियो ​नंबर वरून एका महिन्यात जवळपास 761 मिनिटांचे वॉयस कॉल करतात.

मुकेश अंबानी ने जियो मानसून आॅफर पण यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. रिपोर्ट मधून त्यांनी सांगितले आहे की जियो नेटवर्कशी जोडल्या जाणार्‍या यूजर्सच्या संख्येवर कंपनीच्या जियो मानसून आॅफरचा पण सकारात्मक परिणाम झाला आहे आणि 501 रुपयांच्या जियोफोनच्या आॅफर ने अनेक टेलीकॉम युजर्स जियो नेटवर्कशी जोडले आहेत. तसेच जियोफोन व जियोफोन 2 मध्ये फेसबुक, व्हाट्सॅप व यूट्यूब सपोर्ट मिळण्याचा फायदा पण जियोला झाला आहे.

Published by
Siddhesh Jadhav