Vivo V30 आणि Vivo V30 Pro नंतर आता कंपनी भारतात आपल्या या सीरिजचा एक आणि स्मार्टफोन Vivo V30e घेऊन येत आहे. हा मोबाईल 2 मे ला भारतीय बाजारात येईल ज्यात 3D Curved Display तसेच 50MP Selfie Camera सारख्या गोष्टी मिळतील. तुम्ही घरीबसल्या आपल्या फोनवर विवो वी 30 ई चे भारतातील लाँच लाईव्ह पाहू शकता, ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.
Vivo V30e भारतातील लाँच लाईव्ह लिंक :
Vivo V30e भारतातील लाँचची माहिती
विवो वी 30 ई भारतात लाँचसाठी तयार आहे. कंपनी 2 मे ला एका कार्यक्रमाचे आयोजन करेल ज्या मंचावरून या फोनचे अनावरण केले जाईल. हा लाँचचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता सुरू होईल जो वरती दिलेल्या लिंकव्हर लाईव्ह दिसत आहे. तसेच विवो इंडिया वेबसाईट, शॉपिंग साईट फ्लिपकार्ट तसेच ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण Vivo V30e चे लाँच लाईव्ह प्रसारित होईल.
Vivo V30e चे स्पेसिफिकेशन
- पंच-होल 3 डी कर्व्ड डिस्प्ले
- 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा
- 5,500 एमएएचची बॅटरी
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 (लीक)
स्क्रीन : कंपनीकडून सांगण्यात आले आहे की विवो वी30 ई कर्व्ड डिस्प्लेवर लाँच केला जाईल. ही अल्ट्रा स्लीम 3 डी स्क्रीन असेल जी पंच-होल स्टाईल असणार आहे.
फ्रंट कॅमेरा : Vivo V30e 5G फोन 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यासह लाँच होईल. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की ही ऑटो फोकस लेन्स असेल.
बॅक कॅमेरा : विवो वी 30 ई स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कंपनीकडून खुलासा करण्यात आला आहे की यात 50 मेगापिक्सल पोर्टरेट कॅमेरा दिला जाईल जो सोनी आयएमएक्स 882 सेन्सर असेल.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी 30 ई 5 जी फोनमध्ये 5,500 एमएएचची बॅटरी दिली जाईल. कंपनीने सांगितले आहे की हा 4 वर्षाच्या बॅटरी हेल्थ लाईफसह आला जाईल, तो जास्त वेळापर्यंत युजर्सची साथ देईल.
प्रोसेसर : विवो वी 30 ई बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 ऑक्टाकोरवर लाँच केला जाऊ शकतो. तसेच हा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
विवो वी30 सीरिजचा फोन
Vivo V30
8GB RAM + 128GB Storage = ₹33,999
8GB RAM + 256GB Storage = ₹35,999
12GB RAM + 256GB Storage = ₹37,999
विवो वी 30 5 जी फोनला तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये विकत घेता येईल. याच्या 8+128 मॉडेलची किंमत 33,999 रुपये तसेच 8+256 जीबी व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. तसेच मोबाईलचा 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंट 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.















