Reliance Jio ने प्रथम टेलीकाॅम बाजारात यश मिळवले आणि नंतर 4G फीचर फोन आणून भारतातील मोबाईल बाजारात पण आपला जम बसवला. आता इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये पण आपली पकड मजबूत करत Jio ने VIVO सोबत हातमिळवणी केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी भागेदारी अंतगर्त Jio Exclusive वीवो फोन सादर केला आहे जो Vivo Y1s नावाने मार्केट मध्ये येईल. हा स्मार्टफोन फक्त 7,990 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे तसेच जियो युजर्सना 4,550 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट पण मिळतील.
Jio Exclusive वीवो वाय1एस स्मार्टफोन भारतीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे जो जियोच्या लॉक इन ऑफर सह घेता येईल. या स्मार्टफोन सह कंपनीने 4,550 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट दिले आहेत. यात 90 दिवसांच्या Shemaroo OTT सब्सक्रिप्शनचा पण समावेश असेल ज्यासाठी फक्त 99 रुपये द्यावे लागतात. तसेच फक्त 149 रुपयांमध्ये कंपनी वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट गॅरेंटी पण देत आहे. जियो ग्राहकांना एक्स्ट्रा बेनिफिटसाठी 249 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
Vivo Y1s
वीवो वाय1एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा लो बजेट फोन प्लास्टिक बॉडी वर लॉन्च झाला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप असलेली नॉच देण्यात आली आहे. वीवो वाय1एस 88.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ फुलव्यू एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12 चा लॉन्च नजीक, समोर आली महत्वाची माहिती
Vivo Y1s अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 10.5 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आहे. भारतीय बाजारात हा फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनची मेमरी वाढवता पण येते. Vivo Y1s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 135.11 x 75.09 x 8.28एमएम तसेच वजन 161ग्राम आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y1s च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. वीवो वाय1एस बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच 3.5एमएम जॅकला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी Vivo Y1s स्मार्टफोन 4,030एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात हा फोन Aurora Blue आणि Olive Black कलर मध्ये लॉन्च झाला आहे.
