7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12 चा लॉन्च नजीक, समोर आली महत्वाची माहिती

Galaxy M11

Samsung च्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा अपकमिंग फोन Samsung Galaxy M12 स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अलीकडेच फोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर दिसला होता. या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि आता कंपनी लवकरच आपला हा नवीन मोबाईल फोन भारतीय बाजारात लाॅन्च करेल. तसेच, आता यूएसच्या FCC सर्टिफिकेशन वेबसाइट वर फोन दिसला आहे. पण FCC वेबसाइटवर फोन बद्दल अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.

FCC वर Samsung Galaxy M12 मॉडेल नंबर SM-M127F सह स्पॉट केला गेला आहे. FCC वेबसाइट वर असे सांगण्यात आले आहे कि हा “phablet” असेल. रिपोर्ट्सनुसार या डिवाइसचा आकार एका स्मार्टफोन सारखाच असेल. या एंट्री लेवल फोन मध्ये फक्त 2.4GHz Wi-Fi सपोर्ट दिला जाईल, ज्याची माहिती FCC वेवबसाइट वर समोर आली आहे.

फोन काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर पण दिसला होता. सॅमसंग गॅलेक्सी एम12 गीकबेंच वर 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि बाजारात हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये येईल. बेंचमार्किंग स्कोर पाहता गॅलेक्सी एम12 ला गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 178 स्कोर मिळाला आहे तर मल्टी कोर मध्ये 1025 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच वर फोनच्या इतर जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाही पण या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि लवकरच Samsung Galaxy M12 ची घोषणा होईल.

हे देखील वाचा : 6GB रॅम असलेला सर्वात स्वस्त 5G फोन Oppo A53 स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या खासियत

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी एम12 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लाॅन्च केला जाऊ शकतो जो पंच होल डिजाईन वर बनला असेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 7,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे. आशा आहे कि मोठ्या बॅटरीमुळे फोन मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट पण मिळेल.

लीकनुसार फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो त्याअंतर्गत 5 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 2 मेगापिक्सलचे इतर दोन सेंसर्स मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी लाॅन्चची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here