Categories: बातम्या

जियोफोन बनला जगातील सर्वात जास्त विकला जाणारा फीचर फोन, नोकिया-सॅमसंग ला पण टाकले मागे

जियो के 4जी फीचर फोन च्या बाबतीत काही दिवसांपूर्वी रिपोर्ट आला होता कि हा फोन भारतीय फीचर फोन बाजारात 35.8 टक्के शेयर वर कब्जा करत सर्वात जास्त विकला जाणारा फीचर फोन बनला आहे. आता जियोफोन चा हा कीर्तिमान भारतातच नाही तर जगभरात पसरला आहे. रिसर्च फर्म काउंटर प्वाइंट ने आपला नवीन रिसर्च रिपोर्ट शेयर केला आहे ज्या नुसार संपूर्ण जगभरातील फीचर फोन बाजारात जियोफोन सर्वात जास्त विकला जाणारा फीचर फोन बनला आहे.

काउंटरप्वाइंट चा हा रिपोर्ट साल 2018 च्या पहिल्या तिमाहीचा आहे. या रिपोर्ट मध्ये जगभरातील फीचर फोन ब्रांड चा अभ्यास करण्यात आला आहे आणि मोजदाद करण्यात आली आहे की कोणता फीचर फोन जगात सर्वात जास्त विकला गेला आहे. या रिसर्च मध्ये रिलायंस ​जियो सह नोकिया, सॅमसंग, आईटेल व टेक्नो हे ब्रांड पण होते तसेच सर्व ब्रांड्सना मागे टाकत जियोफोन चे जगात सर्वात जास्त मोबाईल फोन यूनिट विकले गेल्यामुळे पहिले स्थान मिळवले आहे.

जियोफोन नंतर या यादीत नोकिया ब्रांड चे मालकी हक्क असलेली एचएमडी ग्लोबल दुसर्‍या स्थानावर आहे. लिस्ट मध्ये आईटेल तिसर्‍या तर सॅमसंग चौथ्या स्थानावर राहिली आहे तर टेक्नो ने पाचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच जर मार्केट शेयर पाहता ग्लोबल फीचरफोन शिपमेंट मार्केट शेयर मध्ये जागतिक बाजारात रिलायंस जियो ने 15 टक्के शेयर वर कब्जा केला आहे. त्याचप्रमाणे एचएमडी ग्लोबल 14 टक्के, आईटेल 13 टक्के मार्केट शेयर मिळवला आहे. सॅमसंग व टेक्नो च्या वाट्याला 6 टक्के मार्केट शेयर आला आहे.

जियोफोन नंतर नोकिया 105 चा सेल जगात सर्वात जास्त झाला आहे. आधी लॉन्च झालेल्या नोकिया 3310 आणि एमडब्ल्यूसी मध्ये सादर झालेल्या नोकिया 8110 ला सध्या या यादीत जागा मिळाली नाही. एक रोचक बाब ही आहे की नोकिया नंतर तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या नंबर वर लागोपाठ आईटेल चे डिवाईस आहेत. यात आईटेल आईटी2180, आईटेल आईटी2130 आणि आईटेल आईटी5231 आहेत.

विशेष म्हणजे नोकिया आणि आईटेल अंर्तराष्ट्रीय बाजारात सेल
करतात तर जियोफोन फक्त भारतात सेल साठी उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी रिसर्च कंपनी क्रेडिट स्विस ने रिपोर्ट सादर केला होता ज्यात सांगितले गेले होते की जियो प्रत्येक महिन्याला 70 लाख जियोफोन विकत आहे. 2018 च्या पहिल्या तिमाहीत भारतीय फीचर फोन मार्केट मध्ये टक्के 35.8 टक्के हिस्सेदारी जियोफोन ची होती. 9.8 टक्क्यांसह सॅमसंग नंबर दुसर्‍या तर 9.4 टक्के हिस्सेदारी सह चीनी कंपनी आईटेल तिसर्‍या नंबर वर राहिली.

Published by
Siddhesh Jadhav