Samsung Galaxy A32 बद्दल अनेक दिवसांपासून अफवा समोर येत आहे कि हा कंपनीचा अपकमिंग मिड-रेंज फोन असेल जो 5G कनेक्टिविटी सह येईल. अलीकडेच एक रिपोर्ट आला होता, ज्यानुसार हा फोन पुढल्या वर्षी 2021 च्या मध्यात सादर केला जाऊ शकतो. आता 91mobiles ला सॅमसंग गॅलेक्सी ए32 च्या रियर पॅनलची लाइव इमेज मिळाली आहे. या लाइव इमेज वरून फोनच्या लुकचा खुलासा झाला आहे. तसेच फोनच्या रियर पॅनलची डिजाइन काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या सीएडी-बेस्ड रेंडर्स मध्ये दिसली होती.
91मोबाईल्सला मिळलेल्या फोटोज नुसार फोन मध्ये USB टाइप सी पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक बॉटमला दिला जाईल. तसेच फोनच्या मागे क्वाड कॅमेरा रेक्टेंगुलर मॉड्यूल मध्ये येईल जो एलईडी फ्लॅश सह येईल. लाइव इमेज फोनच्या बॅटरी स्लॉटच्या जागी पण दिसेल. एका पॅनल इमेज मध्ये ‘A32 4G LTE’ लिहिण्यात आले आहे, ज्यावरून आशा व्यक्त केली जात आहे कि फोनचा 5जी मॉडेल पण येईल.
हे देखील वाचा : आता भारतात पण विकला जाईल Nokia 2.4 स्मार्टफोन, फक्त 10,399 रुपयांमध्ये सुरु झाली विक्री
Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन
Samsung Galaxy A32 रेंडर्स नुसार फोन मध्ये इनफिनिटी-यू डिस्प्ले आणि स्लिम बेजल असतील. फोनच्या उजवीकडे मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि वॉल्यूम रॉकर बटन दिला जाईल. रेंडर्स मध्ये समोर आले आहे कि फोनच्या बॉटमला USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक सह स्पीकर ग्रिल असेल.
सॅमसंग गॅलेक्सी A32 चा आकार 164.2 मिमी x 76.1 मिमी x 9.1 मिमी असेल. इतकेच नव्हे तर यात 6.5 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. रिपोर्ट्सनुसार 5G मॉडेल मीडियाटेक डाइमेंशन 720 SoC, 15W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट आणि अँड्रॉइड 11 OS आउट ऑफ द बॉक्स सह शिप होईल. सॅमसंग गॅलेक्सी A32 5G ची किंमत EUR 299 (जवळपास 26,900 रुपये) च्या आसपास सांगण्यात येत आहे.














