Home बातम्या सॅमसंग Galaxy A80 आणि Galaxy A70 ची किंमत आली समोर, Galaxy A70 पुढल्या आठवड्यात होतील भारतात लॉन्च

सॅमसंग Galaxy A80 आणि Galaxy A70 ची किंमत आली समोर, Galaxy A70 पुढल्या आठवड्यात होतील भारतात लॉन्च

सॅमसंगने या महिन्याच्या सुरवातीला अंर्तराष्ट्रीय मंचावर गॅलेक्सी सीरीजचे दोन दमदार स्मार्टफोन Galaxy A80 आणि Galaxy A70 सादर केले होते. Galaxy A70 पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि दमदार बॅटरी सह येतो तर Galaxy A80 अनोख्या कॅमेरा सेटअप आणि चिपसेटमुळे चर्चेत आहे. Galaxy A सीरीजचे याच शानदार स्मार्टफोन्सची वाट इंडियन यूजर्स पण बघत आहेत. भारतीय फॅन्सची प्रतीक्षा सुखकर करत सॅमसंग इंडिया ने Galaxy A80 आणि Galaxy A70 च्या भारत लॉन्चची माहिती दिली आहे. तसेच कंपनीने या दोन्ही फोनची इंडियन प्राइज पण सांगितली आहे.

किंमत आणि उपलब्धता
सॅमसंग इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि सीनियर वाइस प्रेजिडेंट रनजीवजीत सिंह यांनी Galaxy A80 आणि Galaxy A70 च्या भारत लॉन्च संबधीत माहिती सार्वजनिक केली आहे. सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे कि कंपनी पुढल्या आठवड्यात आपल्या Galaxy A सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy A70 भारतीय बाजारात आणेल. हा फोन देशात 25,000 रुपये ते 30,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाईल. तसेच Galaxy A80 पुढल्या महिन्यात म्हणजे मे मध्ये भारतात येईल. सॅमसंग हा स्मार्टफोन 48,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लॉन्च करेल. विशेष म्हणजे Galaxy A70 सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर झाला आहे.

Galaxy A70
सॅमसंग ने Galaxy A70 को इनफिनिटी यू नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. हा फोन पण Galaxy A80 प्रमाणे 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने Galaxy A70 को एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 670 चिपसेट वर चालतो.

कंपनीने Galaxy A70 6जीबी रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Galaxy A70 चा दूसरा रियर कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तसेच फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपर रियर कॅमेरा सह भारतात लॉन्च होईल Vivo Y17

सेल्फी साठी सॅमसंग Galaxy A70 एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Galaxy A70 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह पण येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Galaxy A70 मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Galaxy A80
सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो कालच कंपनीने आफिशियल केला आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता पुन्हा सांगतो, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 48-एमपी ट्रिपर रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला शाओमीचा नवीन फोन, स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल यात

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.