48-एमपी ट्रिपर रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला शाओमीचा नवीन फोन, स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल यात

शाओमी बद्दल अलीकडेच बातमी आली होती कि कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल. हा स्मार्टफोन कोणत्या नावाने आणि कधी लॉन्च होईल हि माहिती तो अजून मिळाली नाही, पण एका ताजा लीक मध्ये शाओमीच्या दुसऱ्या स्मार्टफोनची बातमी समोर आली आहे. चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट शेयर झाली आहे ज्यात शाओमीच्या आगामी स्मार्टफोनचा फोटो आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले गेले आहेत. शाओमीचा हा आगामी स्मार्टफोन सॅमसंगच्या लेटेस्ट गॅलेक्सी ए80 फोनच्या टक्करचा असल्याचे बोलले जात आहे.

पॉप-अप कॅमेरा
इंटरनेट वर शेयर झालेला शाओमीचा या आगामी स्मार्टफोनच्या फोटो मध्ये फोन एका खास एंगल वरून क्लिक करण्यात आला आहे. या फोटो मध्ये शाओमी फोनचा वरचा पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यात पॉप-अप कॅमेरा आहे. या फोटो वरून स्पष्ट झाले आहे कि शाओमी द्वारा लॉन्च होणाऱ्या या स्मार्टफोन मध्ये पॉप-अप कॅमेरा असेल. विशेष म्हणजे शाओमी ने अजूनपर्यंत कोणताही फोन पॉप-अप कॅमेरा सह लॉन्च केलेला नाही. तसेच फोनच्या वरच्या पॅनल वर पॉप-अप कॅमेऱ्यासह 3.5एमएम आडियो जॅक पण देण्यात आला आहे.

ट्रिपल रियर कॅमेरा
लीक मध्ये शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनचे कॅमेरा डिटेल्स पण सांगण्यात आले आहेत. फोन मध्ये सेल्फी साठी पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल तसेच शाओमीचा हा आगामी डिवाईस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. समोर आलेल्या लीकनुसार शाओमीच्या या स्मार्टफोन मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा असेल तर तिसरा कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सल पावरचा असेल.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपर रियर कॅमेरा सह भारतात लॉन्च होईल Vivo Y17

स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट
चिपसेट निर्माता कंपनी क्वालकॉम ने अलीकडेच काही नवीन चिपसेट सादर केले आहेत. यात स्नॅपड्रॅगॉन 730 पण आहे. सॅमसंग ने नुकताच आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये गॅलेक्सी ए80 स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो याचा चिपसेट सह येतो. गॅलेक्सी ए80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह येतो. तर ताजा लीक मध्ये शाओमीच्या आगामी स्मार्टफोन बद्दल बोलले जात आहे कि हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

4,000एमएएच बॅटरी
स्लॅशलीक ने कॅमेरा व चिपसेटची माहिती देण्यासोबत शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल पण सांगितले आहे. लीकनुसार शाओमीच्या या नेक्स्ट डिवाईस मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. तर दुसरीकडे असे पण बोलता येईल कि शाओमीचा हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंग फीचरला पण सपोर्ट करेल.

विशेष म्हणजे येत्या 24 एप्रिलला शाओमी इंडिया मध्ये एक ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून रेडमी वाई सीरीजचा आगामी स्मार्टफोन Redmi Y3 लॉन्च केला जाईल. कंपनी ने जरी फोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले नसले तरी समोर आलेला रिपोर्ट्सनुसार Redmi Y3 मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. तसेच या फोन मध्ये 4,500एमएएच किंवा त्यापेक्षा जास्त बॅटरी असेल.

SOURCE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here