Home बातम्या Samsung Galaxy C55 5G फोन 12GB रॅम, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह चीनमध्ये लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Samsung Galaxy C55 5G फोन 12GB रॅम, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह चीनमध्ये लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॅमसंगचा नवीन सी-सीरिज स्मार्टफोन Samsung Galaxy C55 5G बद्दल सतत चर्चा होत असते. तसेच, आता ब्रँडने डिव्हाईस चीनमध्ये लाँच केला आहे. यात युजर्सना लेदर स्टिच बॅक पॅनल, 12जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट, 50 मेगापिक्सल रिअर, 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 45 वॉट फास्ट चार्जिंग सारखे अनेक फिचर्स मिळत आहेत. चला, पुढे मोबाईलची किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy C55 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Samsung Galaxy C55 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड+ डिस्प्ले आहे. यावर 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स ब्राइटनेस मिळते.

प्रोसेसर: मोबाईलमध्ये युजर्सना ऑक्टाकोर 2.4GHz हाई क्लॉक स्प्पीड असलेला स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट मिळत आहे.

स्टोरेज: मेमरीला लक्षात घेत ब्रँडने यात भरपूर सुविधा दिली आहे हा 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो.

कॅमेरा: Samsung Galaxy C55 5G मध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. ज्यात OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 50MP चा कॅमेरा आहे.

बॅटरी: डिव्हाईसमध्ये 5000 एमएएचची बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वजन आणि डायमेंशन: वेबसाईटवर स्मार्टफोनचे वजन 180 ग्रॅम आणि डायमेंशन 163.9×76.5×7.8 मिमी दिसत आहे.

ओएस: Samsung Galaxy C55 5G अँड्रॉईड 14 आधारित ब्रँड वन युआय 6.1 वर आधारित आहे.

इतर: फोनमध्ये ड्युअल सिम 5 जी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, यूएसबी-सी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरियो स्पिकर सारखे अनेक पर्याय देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy C55 5G ची किंमत