Samsung Galaxy C55 5G फोन 12GB रॅम, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह चीनमध्ये लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॅमसंगचा नवीन सी-सीरिज स्मार्टफोन Samsung Galaxy C55 5G बद्दल सतत चर्चा होत असते. तसेच, आता ब्रँडने डिव्हाईस चीनमध्ये लाँच केला आहे. यात युजर्सना लेदर स्टिच बॅक पॅनल, 12जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट, 50 मेगापिक्सल रिअर, 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 45 वॉट फास्ट चार्जिंग सारखे अनेक फिचर्स मिळत आहेत. चला, पुढे मोबाईलची किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy C55 5G चे स्पेसिफिकेशन

 • 6.7-इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड+ डिस्प्ले
 • स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट
 • 12GB रॅम + 256GB स्टोरेज
 • 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा
 • 50MP फ्रंट कॅमेरा
 • 5000 एमएएचची बॅटरी
 • 45W फास्ट चार्जिंग
 • अँड्रॉईड 14

डिस्प्ले: Samsung Galaxy C55 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड+ डिस्प्ले आहे. यावर 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स ब्राइटनेस मिळते.

प्रोसेसर: मोबाईलमध्ये युजर्सना ऑक्टाकोर 2.4GHz हाई क्लॉक स्प्पीड असलेला स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट मिळत आहे.

स्टोरेज: मेमरीला लक्षात घेत ब्रँडने यात भरपूर सुविधा दिली आहे हा 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो.

कॅमेरा: Samsung Galaxy C55 5G मध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. ज्यात OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 50MP चा कॅमेरा आहे.

बॅटरी: डिव्हाईसमध्ये 5000 एमएएचची बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वजन आणि डायमेंशन: वेबसाईटवर स्मार्टफोनचे वजन 180 ग्रॅम आणि डायमेंशन 163.9×76.5×7.8 मिमी दिसत आहे.

ओएस: Samsung Galaxy C55 5G अँड्रॉईड 14 आधारित ब्रँड वन युआय 6.1 वर आधारित आहे.

इतर: फोनमध्ये ड्युअल सिम 5 जी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, यूएसबी-सी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरियो स्पिकर सारखे अनेक पर्याय देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy C55 5G ची किंमत

 • चीनमध्ये Samsung Galaxy C55 5G ला दोन स्टोरेजमध्ये सादर करण्यात आले आहे. ज्यात 8 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम+256 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.
 • सध्या वेबसाईटवर किंमत समोर आलेली नाही, परंतु माहितीनुसार हा फोन 26 एप्रिलपासून सेलसाठी उपलब्ध होईल.
 • फोनसाठी युजर्सना Colorful Orange आणि Fashion Black सारखे दोन कलर मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here