Categories: बातम्या

लेदर फिनिश असलेला Samsung Galaxy F55 5G पुढच्या आठवड्यात होत आहे लाँच, जाणून घ्या काय आहे तारीख

सॅमसंगनं गेल्या आठवड्यात भारतात आपल्या पहिला लेदर फिनिश स्मार्टफोन Samsung Galaxy F55 5G चे लाँच कंफर्म केले होते. तसेच, आता ब्रँडने नवीन टिझरमध्ये डिव्हाईसची लाँचची तारीख आणि इतर माहिती शेअर केली आहे. हा मोबाइल येत्या 17 मे ला सादर केला जाईल. याच्या किंमती बद्दल कंपनीने हिंट दिली आहे की हा 2X,999 रुपयांमध्ये येईल. चला, पुढे सादर होण्याची तारीख, वेळ, संभावित स्पेक्स आणि किंमतीबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy F55 5G लाँचची तारीख आणि किंमत

  • सॅमसंगने सोशल मीडिया साईट एक्सवर नवीन Samsung Galaxy F55 5G मोबाईलची माहिती सांगितली आहे.
  • तुम्ही खाली पोस्टमध्ये पाहू शकता की सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 भारतात 17 मे ला दुपारी 12 वाजता सादर होईल.
  • ब्रँडने हा पण खुलासा केला आहे की सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 5 जी ची भारतात किंमत 29999 असेल.
  • या किंमतीचा अर्थ असा आहे की डिव्हाईसच्या बेस व्हेरिएंटची किंमत निश्चित रूपानी देशात 30,000 रुपयांनी कमी ठेवली जाऊ शकते.

Samsung Galaxy F55 5G ची डिझाईन

  • सॅमसंगने या आठवड्याच्या सुरुवातीला अगामी एफ-सीरीज स्मार्टफोनच्या डिझाईन आणि कलर ऑप्शनवरून पडदा उठविला होता.
  • ब्रँडने टिझरमध्ये सांगितले होते की सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 मध्ये सॅडल स्टिच पॅटर्नसह वेगन लेदर फिनिश मिळेल.
  • कलर ऑप्शन पाहता मोबाईल एप्रिकॉट क्रश आणि रेजिन ब्लॅक सारख्या दोन शेडमध्ये सादर होईल.
  • सॅमसंगचा दावा आहे की गॅलेक्सी एफ 55 वेगन लेदर फिनिशसह सेगमेंटचा सर्वात हलका आणि पातळ स्मार्टफोन असेल.

Samsung Galaxy F55 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड+ इनफिनिटी-O डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर FHD+ रिजॉल्यूशन, 85.7% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: Samsung Galaxy F55 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसर मिळण्याची चर्चा आहे.
  • स्टोरेज: सॅमसंगच्या नवीन फोनमध्ये 8 जीबी तसेच 12 जीबी रॅमसह 128 आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज प्रदान केले जाऊ शकते.
  • कॅमेरा: टिझरमध्ये कंफर्म झाले आहे की Samsung Galaxy F55 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. यात OIS सह 50MP चा प्रायमरी आणि 8MP +2MP चे लेन्स मिळू शकतात. तसेच, सेल्फीसाठी 50MP ची लेन्स लावली जाऊ शकते.
  • बॅटरी: Samsung Galaxy F55 5G मध्ये ब्रँड 5000mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग देऊ शकते.
Published by
Kamal Kant