Vivo Y200 लवकर होऊ शकतो लाँच, गीकबेंच आणि 3 सी साईटवर आली माहिती

विवो होम मार्केट चीनमध्ये आपल्या वाय सीरिजचा विस्तार करू शकतो, यात कंपनी Vivo Y200 स्मार्टफोन जोडू शकते. परंतु अजून ब्रँडकडून कोणतीही घोषणा झालेली नाही, मात्र या डिव्हाईसच्या प्रमुख माहितीसह बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंच आणि 3 सी सर्टिफिकेशनवर समोर आला आहे. ज्यामुळे याच्या लाँचची संभावना वाढली आहे. चला, पुढे लिस्टिंगची माहिती जाणून घेऊया.

Vivo Y200 गीकबेंच लिस्टिंग

 • गीकबेंच बेंचमार्क डेटाबेसवर विवोचा नवीन मोबाईल मॉडेल नंबर V2343A सह स्पॉट करण्यात आला आहे. ज्याला Vivo Y200 मानले जात आहे.
 • गीकबेंच वेबसाइट बेंचमार्क टेस्टच्या सिंगल-कोर राऊंड मध्ये फोनने 931 पॉइंट आणि मल्टी-कोर राऊंड मध्ये 2846 पॉइंट मिळवले आहेत.
 • Vivo Y200 गीकबेंच लिस्टिंगवरून समजले आहे की यात 4+4 कोर कॉन्फिग्रेशन असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर, कोडनेम पॅरट आणि एड्रेनो 710 GPU आहे.
 • वरती दिलेल्या माहितीनुसार फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.
 • स्टोरेजच्या बाबतीत स्मार्टफोन गीकबेंचवर 12GB रॅमसह दिसला आहे.
 • ऑपरेटिंग सिस्टम पाहता मोबाईल अँड्रॉईड 14 असलेला सांगण्यात आले आहे.

Vivo Y200 3सी लिस्टिंग

 • 3C लिस्टिंगमध्ये पण विवोचा नवीन मोबाईल मॉडेल नंबर V2343A सह दिसला आहे.
 • 3 सी प्लॅटफॉर्मनुसार Vivo Y200 मानले जात आहे की, मोबाईलला 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असू शकतो.
 • फोनच्या टेस्टिंगसाठी मॉडेल नंबर V8073L0A1-CN, V8073L0E0-CN, V8073L0B0-CN आणि V8073L0D0-CN असणाऱ्या चार्जरचा वापर केला आहे.
 • 3C लिस्टिंगमध्ये 10W (5V/2A), 15W (5V/3A), 18W (9V/2A) आणि 80W (11V/7.3A) वर चार्जिंगचा सपोर्ट दिसत आहे.

Vivo Y200 5G चे स्पेसिफिकेशन

भारतात Vivo Y200 5G मागचा सेल सादर केला गेला होता ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

 • डिस्प्ले: Vivo Y200 5G मध्ये 6.67-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 2400 × 1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 800 निट्स पर्यंतच्या पीक ब्राईटनेस मिळते.
 • प्रोसेसर: हा डिव्हाईस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसह आहे हा 6nm मोबाईल प्लॅटफॉर्म आणि एड्रेनो GPU सह येतो.
 • स्टोरेज: डिव्हाईसमध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB तथा 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
 • कॅमेरा: Vivo Y200 5G मध्ये ऑरा LED फ्लॅशसह 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा पोर्ट्रेट सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा आहे.
 • बॅटरी: पावर बॅकअपसाठी मोबाईल 44W फास्ट चार्जिंगसह 4800mAh च्या बॅटरीसह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here