OPPO Reno 11 Pro 5G फोनच्या किंमतीत झाली कपात, जाणून घ्या नवीन किंमत

ओप्पोने जानेवारीमध्ये आपल्या रेनो 11 सीरिजला भारतीय बाजारात सादर केले होते. यानुसार OPPO Reno 11 आणि OPPO Reno 11 Pro 5G मोबाईल लाँच केला होता. तसेच, आता ब्रँडने आपल्या फ्लॅगशिप लेव्हल प्रो मॉडेलला कमी किंमतीत सेल करण्याची घोषणा केली आहे. हा डिव्हाइस सध्या तुम्हाला पूर्ण 2,000 रुपयांची कमी सह मिळेल. जर तुम्ही पण या दोन्ही एक नवीन आणि जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणार आहात तर रेनो 11 प्रो शानदार पर्याय आहे. चला, पुढे नवीन किंमत आणि सर्व ऑफर्सची माहिती जाणून घेऊया.

OPPO Reno 11 Pro 5G किंमत कपात

 • 2,000 रुपयांच्या कपातीसह ओप्पो रेनो 11 प्रो 5G स्मार्टफोन सध्या 37,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
 • प्राइस ड्रॉपसह ब्रँडद्वारे 10% कॅशबॅक आणि 6 महिन्याचा नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन पण मिळेल.
 • ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर एसबीआय क्रेडिट कार्डच्या मदतीने 10% इंस्टंट डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस पण मिळू शकतो.
 • फोनच्या जुन्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा 39,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. वापरकर्त्यांना फोनसाठी पर्ल व्हाइट आणि रॉक ग्रे असे दोन रंग पर्याय मिळतील.
 • OPPO Reno 11 Pro 5G ला तुम्ही फ्लिपकार्टसह कंपनी वेबसाईट आणि इतर रिटेल आऊटलेट्सवरून विकत घेता येईल.

नवीन किंमत: 37,999 रुपये

जुनी किंमत: 39,999 रुपये

OPPO Reno 11 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

 • डिस्प्ले: OPPO Reno 11 Pro मध्ये 6.7 इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे यावर 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो, 2412 × 1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 1600 निट्स पर्यंत ब्राईटनेस आणि HDR10+ टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
 • प्रोसेसर: हा फ्लॅगशिप ओप्पो मोबाईल MediaTek Dimensity 8200 चिपसेटसह येतो. यात ग्राफिक्ससाठी माली-G610 MC6 जीपीयू लावला आहे.
 • स्टोरेज: हा फोन 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेजसह आहे.
 • कॅमेरा: मोबाईलमध्ये OIS आणि LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50MP चा प्रायमरी, 32MP चा टेलीफोटो आणि 8MP चा अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX709 फ्रंट कॅमेरा आहे.
 • बॅटरी: Oppo Reno 11 Pro मध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 4700mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
 • ओएस: हा ओप्पो मोबाईल अँड्रॉईड 14 आधारित ColorOS 14 सह मिळून चालतो.
 • इतर: कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, GPS, NFC आणि USB टाईप-C पोर्ट आहे तर सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here