Moto Edge 50 Fusion भारतात लवकरच होईल लाँच, ब्रँडने शेअर केला टिझर

गेल्या महिन्यात मोटोरोलाने एज 50 सीरिजच्या तीन मोबाईलला जागतिक बाजारात लाँच केले आहे. ज्यात एक मॉडेल एज 50 प्रो भारतात सेलसाठी उपलब्ध आहे. तसेच, आता Moto Edge 50 Fusion लाँच होऊ शकतो. याला घेऊन सोशल मीडियावर ब्रँडने माहिती सादर केली आहे. विशेष म्हणजे नवीन फोनच्या सीरिजमध्ये सर्वात स्वस्त असू शकतो, यामुळे याला भारतात खूप पसंद केले जाऊ शकते. चला, पुढे टिझर आणि वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेऊया.

Moto Edge 50 Fusion भारतातील लाँच कंफर्म

 • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोटोरोलाने अगामी स्मार्टफोनचा टिझर शेअर केला आहे.
 • कंपनीने अगामी डिव्हाईसच्या नावाचा खुलासा केला नाही, परंतु टिजर व्हिडिओमध्ये कर्व्ड डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 50MP OIS कॅमेरा असलेला फोन दिसला आहे.
 • टिझर व्हिडिओमध्ये समोर आलेल्या माहितीवरून समजले आहे की भारतात मोटोरोलाचा अगामी फोन Moto Edge 50 Fusion असेल.
 • तसेच अजून मोबाईलची लाँच तारीख माहित नाही, परंतु हा काही दिवसांमध्ये येऊ शकतो.

Motorola Edge 50 Fusion चे स्पेसिफिकेशन (जागतिक)

 • डिस्प्ले: Motorola Edge 50 Fusion मध्ये 6.7-इंचाची कर्व pOLED स्क्रीन देण्यात आली आहे. यावर FHD+ रिजॉल्यूशन 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट मिळतो.
 • प्रोसेसर: फोनला युरोप, मध्य पूर्व आणि अफ्रीकामध्ये Snapdragon 7s Gen 2 चिपसह सादर करण्यात आले आहे. तर हा स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसरसह लैटिन अमेरिकेत आला होता. आशा आहे की भारतात याला Snapdragon 7s Gen 2 सह आणले जाऊ शकते.
 • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत हा मोबाईल 12GB रॅम + 512GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो.
 • कॅमेरा: Motorola Edge 50 Fusion मध्ये बॅक पॅनलवर 50MP चा LYT-700C प्रायमरी कॅमेरा OIS सह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 13MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा कॅमेरा आहे.
 • बॅटरी: डिव्हाईसमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसाठी 68W टर्बोपावर चार्जिंगला सपोर्ट मिळतो.
 • ओएस: Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित Hello UX वर चालतो.
 • इतर: हा मोटो फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, AI फीचर, ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here