Samsung ने भारतात Galaxy F62 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. हा स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला गेला होता. लॉन्चनंतर पहिल्यांदाच ऑफलाइन मार्केटमध्ये या स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 91mobiles च्या ऑफलाइन रिटेल सोर्सनुसार या स्मार्टफोनवर प्रथमच 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटसह आता Samsung Galaxy F62 स्मार्टफोन भारतात 21,999 रुपयांची बेस किंमतीत विकत घेता येईल. याआधी कंपनीने हा फोन 23,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला होता. (Samsung Galaxy F62 price in India discounted first time benefits up to RS 10000)
Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर हा डिस्काउंट ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर सुरु असलेल्या Flipkart Flagship Fest sale वर पण मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा सेल 15 एप्रिल पर्यंत सुरु राहील. Samsung चा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी, फ्लॅगशिप Exynos चिपसेट आणि AMOLED Plus डिस्प्लेसह सादर केला गेला आहे.
Samsung Galaxy F62 ची ऑफर काय आहे
Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर मिळत असलेल्या 2000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 6GB RAM वेरिएंट 21,999 रुपये आणि 8GB RAM वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच सॅमसंगच्या अपग्रेड प्रोग्रामअंतगर्त या स्मार्टफोनवर कंपनी 8000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर ग्राहकांना एकूण 10000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. या फोनवर ऑफलाइन डिस्काउंट 19 एप्रिलपर्यंत मिळेल. तसेच ऑनलाइन मार्केटमध्ये हा डिस्काउंट फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या फ्लॅगशिप फेस्ट सेल 15 एप्रिल पर्यंत सुरु राहील.
हे देखील वाचा : Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट
Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED Plus डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फीसाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन कंपनीच्या फ्लॅगशिप चिपसेट Exynos 9825 सह सादर केला गेला आहे. सॅमसंगचा हा फोन 8GB पर्यंतच्या RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. या फोनची स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येते. Galaxy F62 मध्ये दमदार 7,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : 12,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S21+ स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी
Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP मेगापिक्सलचा आहे, ज्यात 12MP वाइड अँगल लेंस, 5MP चा डेप्थ सेंसर आणि 5MP मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी कॅमेरा सेंसर पाहता फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 4G LTE, डुअल-बॅंड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.
