सॅमसंगने अलीकडेच भारतात आपल्या Galaxy A सीरीजचे दोन दमदार स्मार्टफोन Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 लॉन्च केले आहेत. सॅमसंग गेल्या अनेक दिवसांपासून मिड रेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये आक्रमक किंमतीत स्मार्टफोन लॉन्च करत आहे. तसेच आपल्या प्रतिस्पर्धी जसे कि Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग ग्राहकांसाठी नवीन ऑफर पण सादर करतो. सॅमसंगची लेटेस्ट ऑफर पाहता कंपनी Galaxy A32, Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोनवर दमदार कॅशबॅक देत आहे. इथे आम्ही तुम्हाला सॅमसंगच्या या कॅशबॅक ऑफरबाबत सविस्तर माहिती देत आहोत. (Samsung Galaxy A32 Galaxy A52 and Galaxy A72 smartphones get discounts of up to Rs 6000)
काय आहे सॅमसंगची कॅशबॅक ऑफर
सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy A32, Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोनमध्ये कंपनी 3000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर करत आहे. तसेच जुना फोन अपग्रेड केल्यास कंपनी 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट पण देत आहे. सॅमसंगची कॅशबॅक ऑफर फक्त HDFC कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही ऑफर सह सॅमसंग एकूण 6000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर करत आहे.
हे देखील वाचा : 18GB रॅम आणि सर्वात पावरफुल फीचर्ससह बाजारात आला अजून एक फोन, आता रंगेल गेमिंग फोन्समधील युद्ध
Samsung Galaxy A32 वर ऑफर
Samsung Galaxy A32 स्मार्टफोन सिंगल वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 21,990 रुपयांमध्ये मिळतो. या फोनवर HDFC बँकेकडून 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच जुना फोन अपग्रेड केल्यावर या फोनमध्ये 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळत आहे.
हे देखील वाचा : OnePlus Nord LE झाला लॉन्च, मोफत मिळू शकतो शानदार स्मार्टफोन फक्त करावे लागेल इतकेच
Samsung Galaxy A52 वर ऑफर
Samsung Galaxy A52 स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 26,499 रुपये आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेजचा वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनवर HDFC बँकेची ऑफर पाहता ग्राहकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
Samsung Galaxy A72 वर ऑफर
Samsung Galaxy A72 स्मार्टफोन पण दोन वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. याचा बेस वेरिएंट 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह 34,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तसेच 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये HDFC बँकेकडून 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच जुना स्मार्टफोन अपग्रेड केल्यावर 3000 रुपयांचा एडिशनल डिस्काउंट मिळत आहे.














