कोरोना काळात कमी किंमतीत एखादा चांगले स्पेसिफिकेशन्स असलेला स्मार्टफोन मिळवण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. नवीन फोन पण घेता यावा आणि पैसे पण वाचावे. अश्याच लोकांसाठी शॉपिंग साइट फ्लिपकार्टने शानदार ऑफर सादर केली आहे. फेब्रुवारीमध्ये लॉन्च झालेल्या 7,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy F62 स्पेशल सेलअंतगर्त विकला जात आहे जिथे फोनवर थेट 6,000 रुपयांची सूट मिळत आहे. (Samsung Galaxy F62 Rs 6,000 discount on Flipkart till 7 may effective price 17999)
Samsung Galaxy F62 फ्लिपकार्टवर 6,000 रुपयांच्या दमदार डिस्काउंट ऑफरसह विकत घेता येईल. या स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 23,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 25,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. पण आता ऑफरअंतगर्त गॅलेक्सी एफ62 फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट फक्त 17,999 रुपये आणि 8 जीबी रॅम वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. म्हणजे दोन्ही वेरिएंट्सवर थेट 6,000 रुपयांची सूट हि जबरदस्त ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलअंतगर्त उपलब्ध आहे जो येत्या 7 मे पर्यंत सुरु राहील.
Samsung Galaxy F62
सॅमसंग गॅलेक्सी एफ62 मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपरएमोलेड प्लस इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 16एम कलर्स, 420 Nits ची पीक ब्राइटनेस आणि 1000000 च्या कॉन्ट्रास्ट रेश्योला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आणि वन युआय 3.1ला सपोर्टसह येतो. ज्यात प्रोसेसिंगसाठी सॅमसंगचा एक्सनॉस 9825 चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे जो फास्ट व स्मूद प्रोसेसिंग देतो. तसेच फोनमध्ये युजर्सना AltZLife फीचर पण मिळतो जो स्मार्टफोनची गोपनीयता वाढवतो.
हे देखील वाचा : Samsung Galaxy Z Fold3 मध्ये असू शकतो अंडर डिस्प्ले कॅमेरा, S Pen आणि नवीन कॅमेरा डिजाइन
फोटोग्राफीसाठी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 64MP सोनी आईएमएक्स 682 प्राइमरी सेंसर आहे. तसेच गॅलेक्सी F62 वर 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आहे जी 123-डिग्री व्यू कॅप्चर करते. फोनमध्ये 5MP मॅक्रो लेंस क्लोज-अप शॉट्स कॅप्चर करण्यासाठी मिळेल. गॅलेक्सी F62 च्या 5MP डेप्थ सेंसर लेंसमध्ये लाइव फोकससह अद्भुत पोर्ट्रेट शॉट घेता येतील. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी F62 चा 32MP फ्रंट कॅमेरा 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्लो-मो सेल्फीला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy F62 यूएसपी फ्लॅगशिप प्रोसेसर सोबतच पावरफुल 7000mAh ची बॅटरी पण आहे. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच फोनमध्ये इन-बॉक्स टाइप C 25W सुपरफास्ट चार्जर मिळतो जो स्मार्टफोनची 7000mAh ची बॅटरी 2 तासांपेक्षा कमी काळात चार्ज करतो. गॅलेक्सी एफ 62 मध्ये रिवर्स चार्जिंग पण देण्यात आली आहे जी अजून कोणताही फोन चार्ज करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी एफ62 व्हिडीओ
