Samsung Galaxy Z Fold3 मध्ये असू शकतो अंडर डिस्प्ले कॅमेरा, S Pen आणि नवीन कॅमेरा डिजाइन

Samsung सध्या आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold3 च्या लॉन्चिंगमध्ये व्यस्त आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनबाबत लीक रिपोर्ट समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी सॅमसंगचा हा अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोन 3C सर्टिफिकेशनच्या वेबसाइटवर लिस्ट झाला होता, त्यामुळे या फोनच्या बॅटरी आणि चार्जिंगसंबंधित माहिती समोर आली होती. आता सॅमसंगच्या या स्मार्टफोनबाबत डिजाइन आणि सेल्फी कॅमेराबद्दल माहिती येत आहे. सॅमसंगच्या अपकमिंग Galaxy Z Fold3 स्मार्टफोनबद्दल जी माहिती समोर आली आहे त्यानुसार हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Galaxy Z Fold2 च्या तुलनेत अपग्रेडेड असेल. (Samsung Galaxy Z Fold 3 leaks under screen camera and S pen)

Samsung Galaxy Z Fold3 बाबत समोर आलेल्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये नवीन रियर कॅमेरा डिजाइन दिसत आहे. हि Galaxy S21 सीरीजमधील कॅमेरा मॉड्यूलपेक्षा खूप वेगळी आहे. लीक इमेजमध्ये दिसत आहे की सॅमसंगच्या अपकमिंग फोल्डेबल फोनमध्ये तीन वर्टिकल कॅमेरा आणि LED फ्लॅश देण्यात आले आहेत. तसेच अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि सॅमसंग Galaxy Z Fold3 स्मार्टफोनमध्ये S Pen स्टायलस दिला जाऊ शकतो. आता नवीन लीकमध्ये दावा केला गेला आहे कि Galaxy Z Fold3 मध्ये युजर्स व्हिडीओ कॉलिंग करताना S Pen ने नोट्स पण लिहिता येतील.

हे देखील वाचा : रोज 1.5GB डेटा देणारा हा आहे BSNL चा स्वस्त प्लान, Jio-Airtel पण नाही टिकत याच्यासमोर

https://twitter.com/BuKarpiel/status/1388846870655553538

रिपोर्टमध्ये असा पण दावा केला जात आहे कि सॅमसंगच्या आगामी फोल्डेबल फोनमध्ये स्टायलस ठेवण्यासाठी जागा पण दिली जाऊ शकते. अजूनतरी याची पुष्टी झाली नाही कि सॅमसंग या फोनसोबत S Pen ऑफर करेल कि युजर्सना विकत घ्यावा लागेल. असे वाटत आहे कि या फोनमधील S Pen ची टिप टोकदार नसेल, जेणेकरून युजर्सकडून या फोल्डेबल फोनचा डिस्प्ले डॅमेज होणार नाही.

हे देखील वाचा : Xiaomi चा लो बजेटमध्ये सर्वात बडा डाव तयार, 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 10S भारतात होईल 13 मेला लॉन्च

Samsung Galaxy Z Fold3 स्मार्टफोन जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल ज्यात अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो. अंडर डिस्प्ले कॅमेरा सॅमसंगच्या अपकमिंग Galaxy Z Fold3 स्मार्टफोनला हाइर स्क्रीन टू बॉडी रेश्यो ऑफर करेल. सॅमसंगच्या या स्मार्टफोनबाबत सांगितले जात आहे कि बाहेरून फोनमध्ये Gorilla Glass Victus प्रोटेक्शन दिले जाऊ शकते .

सॅमसंगच्या अपकमिंग गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोनमध्ये कंपनी इन-स्क्रीन कॅमेरा आणि S Pen स्टायलस दिला जाऊ शकतो. म्हणजे सॅमसंगचा हा स्मार्टफोन Fold 2 च्या तुलनेत महाग असू शकतो. काही रिपोर्ट्स मध्ये असा पण दावा केला जात आहे कि सॅमसंग Galaxy Z Fold3 स्मार्टफोनसोबत जुलैमध्ये Galaxy Z Flip3 स्मार्टफोन पण सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here