Samsung चे साल 2020 खूप चांगले गेले. कंपनीने प्रत्येक प्राइस सेग्मेंट मध्ये आपले फोन लाॅन्च केले आहेत आणि ते युजर्सना आवडत पण आहेत. आजच आम्ही बातमी दिली होती कि कंपनीने Samsung Galaxy A31 स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे त्यामुळे हा 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आता नवीन माहिती समोर येत आहे कि कंपनीने आपले अजून दोन स्मार्टफोन Samsung Galaxy M01 तसेच Samsung Galaxy M01s पण स्वस्त केले आहेत.
सॅमसंगने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे. Samsung Galaxy M01 आतापर्यंत 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता पण किंमतीत कपात केल्यानंतर या फोनची किंमत फक्त 7,499 रुपये झाली आहे. तसेच Samsung Galaxy M01s बाजारात 9,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल परंतु प्राइस कट नंतर किंमत कमी होऊन 8,999 रुपये झाली आहे. हे दोन्ही सॅमसंग स्मार्टफोन आज पासूनच नवीन किंमतीत देशात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत जे ऑनलाईन शाॅपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येतील.
Samsung Galaxy M01
Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.
Samsung Galaxy M01s
सॅमसंग गॅलेक्सी एम01एस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M01s च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम01एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम01एस मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
















