Home बातम्या Samsung Galaxy M34 5G भारतात लाँच, ह्यात आहे 16GB पर्यंत रॅम, 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी

Samsung Galaxy M34 5G भारतात लाँच, ह्यात आहे 16GB पर्यंत रॅम, 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी

Highlights
  • Galaxy M34 5G तीन कलर ऑप्शनमध्ये सादर झाला आहे.
  • मोबाइलमध्ये रॅम प्लस फीचरची सुविधा पण मिळत आहे.
  • ह्यात 50 मेगापिक्सलचा रियर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

सॅमसंगनं भारतात नवीन एम सीरीज स्मार्टफोन Samsung Galaxy M34 5G लाँच केला आहे. हा एक बजेट रेंज असलेला 5G असल्यामुळे लोकांना आवडू शकतो. ह्यात 6000mAh ची बॅटरी, रॅम प्लस फीचरसह 16GB पर्यंत रॅमची पावर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सारखी वैशिष्ट्ये आहेत. चला जाणून घेऊया ह्या नवीन 5G मोबाइलची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

Samsung Galaxy M34 5G ची किंमत

सॅमसंगनं आपले नवीन 5G डिवाइस दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये आणले आहेत ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 6GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेलचा समावेश आहे. फोनची प्रारंभिक किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कलर ऑप्शन पाहता डिवाइस मिडनाइट ब्लू, प्रिज्म सिल्व्हर आणि वॉटरफॉल ब्लू सारख्या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर झाला आहे. स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर लवकरच सुरु होईल परंतु आजपासून प्रीऑर्डर सुरु झाली आहे.

Samsung Galaxy M34 5G स्पेसिफिकेशन्स