Samsung Galaxy M34 5G भारतात लाँच, ह्यात आहे 16GB पर्यंत रॅम, 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी

Highlights

  • Galaxy M34 5G तीन कलर ऑप्शनमध्ये सादर झाला आहे.
  • मोबाइलमध्ये रॅम प्लस फीचरची सुविधा पण मिळत आहे.
  • ह्यात 50 मेगापिक्सलचा रियर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

सॅमसंगनं भारतात नवीन एम सीरीज स्मार्टफोन Samsung Galaxy M34 5G लाँच केला आहे. हा एक बजेट रेंज असलेला 5G असल्यामुळे लोकांना आवडू शकतो. ह्यात 6000mAh ची बॅटरी, रॅम प्लस फीचरसह 16GB पर्यंत रॅमची पावर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सारखी वैशिष्ट्ये आहेत. चला जाणून घेऊया ह्या नवीन 5G मोबाइलची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

Samsung Galaxy M34 5G ची किंमत

सॅमसंगनं आपले नवीन 5G डिवाइस दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये आणले आहेत ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 6GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेलचा समावेश आहे. फोनची प्रारंभिक किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कलर ऑप्शन पाहता डिवाइस मिडनाइट ब्लू, प्रिज्म सिल्व्हर आणि वॉटरफॉल ब्लू सारख्या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर झाला आहे. स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर लवकरच सुरु होईल परंतु आजपासून प्रीऑर्डर सुरु झाली आहे.

Samsung Galaxy M34 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता ह्यात 6.46 इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन मिळतो.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये दमदार Exynos 1280 प्रोसेसर आहे. जो मिड रेंजमध्ये देखील चांगला प्रोसेसर आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम +128GB स्टोरेज आहे. ह्यात 8GB पर्यंत रॅम प्लस फीचर देखील देण्यात आलं आहे. त्यामुळे रॅम 16GB पर्यंत वाढवता येईल.

  • बॅटरी : फोन 6000mAh च्या मोठ्या बॅटरी आणि 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा : डिवाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन सपोर्टसह देण्यात आली आहे. ह्या लेन्ससह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची तिसरी कॅमेरा लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.
  • OS : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित OneUI 5.1 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : मोबाइलमध्ये 5जी, ड्युअल 4जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी सारखे फीचर्स देखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here