सॅमसंगने आणला 50MP Selfie Camera असलेला फोन! जाणून घ्या किती आहे 12GB RAM असणाऱ्या मोबाईलची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ‘एम’ सीरिजचे नवीन मोबाईल फोन आज भारतात लाँच झाले आहेत. कंपनीने Samsung Galaxy M15 5G आणि Samsung Galaxy M55 5G फोन भारतीय बाजारात आणले आहेत जो स्टाइलिश लूक आणि जबरदस्त स्पेसिफिकेशनसह आहे. तसेच प्रीमियम मोबाईल गॅलेक्सी एम 55 5जी ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M55 5G Price

  • 8GB RAM + 128GB Storage = ₹26,999
  • 8GB RAM + 256GB Storage = ₹29,999
  • 12GB RAM + 256GB Storage = ₹32,999

सॅमसंग गॅलेक्सी एम55 5जी फोन भारतीय बाजारात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनचे दोन मॉडेल 8 जीबी रॅमला सपोर्ट करतात, ज्यात 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. याची किंमत क्रमश: 26,999 रुपये आणि 29,999 रुपये आहे. तसेच Galaxy M55 5G फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. हा फोन Light Green आणि Denim Black कलरमध्ये विकत घेता येईल. सुरुवातीच्या सेलमध्ये कंपनी 2,000 रुपयांचा बँक डिस्काऊंट पण देत आहे.

Samsung Galaxy M55 5G Specifications

फ्रंट कॅमेरा

  • 50MP Selfie Camera
  • f/2.4 Aperture
  • Dual Recording feature

गॅलेक्सी एम 55 5 जी स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी काढणे व व्हिडिओ कॉलिंग करण्यासोबत इन्स्टाग्राम रिल्स बनविण्यासाठी कामी येईल. हा कॅमेरा सेन्सर एफ/2.4 अपर्चर वर चालतो. फोनमध्ये असलेला ड्युअल रेकॉर्डिंग फिचरच्या माध्यमातून फ्रंट आणि बॅक दोन्ही लेन्सचा वापर एकाच फ्रेममध्ये केला जाऊ शकतो.

बॅक कॅमेरा

  • 50MP Wide-angle Camera
  • 8MP Ultra Wide Camera
  • 2MP Macro Camera

फोटोग्राफीसाठी Samsung M55 5G फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर ओआयएस टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सल मेन वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे जी 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह मिळून चालते.

डिस्प्ले

  • 6.7″ FHD+ Display
  • Super AMOLED Panel
  • 120Hz refresh rate

सॅमसंग गॅलेक्सी एम55 5जी फोन 1080 x 2400 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करते. पंच-होल स्टाईल असणारी ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड+ पॅनलवर बनली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. या फोन डिस्प्लेवर 100 निट्स ब्राइटनेस आणि 16 मिलियन कलरला सपोर्ट मिळतो.

प्रोसेसेर

  • 4nm Snapdragon 7 Gen 1
  • 2.4GHz Clock Speed
  • 64bit Octa-core CPU

सॅमसंग गॅलेक्सी एम 55 स्मार्टफोन क्वॉलकॉमचा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटला सपोर्ट करतो. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर 2.4 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो ज्यात 1 Cortex-A710 कोर, 3 2.36GHz Cortex-A710 कोर तसेच 4 1.8GHz Cortex-A510 कोरचा समावेश आहेत. हा गॅलेक्सी अँड्रॉइड 14 आधारित वनयुआयवर काम करेल.

बॅटरी

  • 5,000mAh Battery
  • 45W Fast Charger
  • Super Fast Charging 2.0

सॅमसंग गॅलेक्सी एम55 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी नवीन सॅमसंग स्मार्टफोन 45 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह केला आहे. हा सुपर फास्ट चार्जिंग 2.0 टेक्नॉलॉजी आहे जी न फक्त फोनला फास्ट चार्ज करेल तसेच सोबत बॅटरी हेल्थला मेंटेन ठेवेल तसेच फोन गरम होण्यापासून वाचवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here