Home बातम्या दमदार 256GB स्टोरेज सह येत आहे Samsung Galaxy M62, लवकरच करेल एंट्री

दमदार 256GB स्टोरेज सह येत आहे Samsung Galaxy M62, लवकरच करेल एंट्री

Samsung आपल्या Galaxy M सीरीज मध्ये एक नवीन फोन आणण्याची तयारी करत आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार गॅलेक्सी एम62 हाई-एन्ड स्पेसिफिकेशन सह सादर केला जाऊ शकतो. Samsung Galaxy M62 च्या अनेक प्रमुख स्पेसिफिकेशन पण या रिपोर्ट मध्ये समोर आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम62 च्या नावाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण रिपोर्ट मध्ये त्या सूत्रांचा हवाला देण्यात आला आहे, ज्यांनी सांगितले आहे कि अपकमिंग फोनचा मॉडेल नंबर SM-M625F असेल.

हा रिपोर्ट Sammobile ने जारी केला आहे. बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम62 पुढल्या वर्षी लॉन्च होऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सूत्रांचा हवाला देत सांगण्यात आले आहे कि एम-सीरीजचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असू शकतो. लक्षात असू द्या कि साल 2019 मध्ये सॅमसंगने Galaxy M40 लॉन्च केला होता आणि 2020 मध्ये याचा अपग्रेडेड वेरिएंट Samsung Galaxy M51 च्या नावाने लॉन्च केला गेला आहे.

Samsung Galaxy M51

सॅमसंग गॅलेक्सी एम51 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि हँडसेट मध्ये 128 जीबी पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज आहे, जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून वाढवता येते.

हे देखील वाचा : Samsung Galaxy Note 10 ची किंमत झाली 27,000 रुपयांनी कमी, विकत घेण्याची आहे सुवर्णसंधी

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये मागे क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

तसेच रियर कॅमेरा सेटअप प्रमाणे Samsung Galaxy M51 चा सेल्फी कॅमेरा पण शानदार आहे. सॅमसंगचा हा फोन 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वरच्या भागात पंच-होल मध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 चा फ्रंट कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो.

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक आहेत. तसेच फोनच्या मागे एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. सॅमसंगच्या या फोन मध्ये 7000mAh ची बॅटरी आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 व्हिडीओ