Samsung Galaxy Note 10 ची किंमत झाली 27,000 रुपयांनी कमी, विकत घेण्याची आहे सुवर्णसंधी

सॅमसंगने फेस्टिवल सीजन पाहता आपल्या अनेक दमदार स्मार्टफोन वर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली होती. तसेच आता कंपनीने Samsung Galaxy Note 10 वर बेस्ट डील ऑफर केली आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंगने गॅलेक्सी नोट 10 च्या किंमतीत 27,695 रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यानंतर याची किंमत फक्त 45,000 रुपये झाली आहे. या फोन मध्ये प्राईस कटचा फायदा ऑफलाइन रिटेल वरून विकत घेतल्यावर मिळेल. ऑनलाइन विकत घेतल्यास पण या फोन सह डिस्काउंट मिळत आहे, पण ऑफलाइन विकत घेतल्यास जास्त फायदा आहे.

ऑनलाइन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 कंपनीने 69,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. सध्या सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट वर हा फोन 57,100 रुपयांमध्ये विकला जात आहे. वहीं, अमेझॉन वर फोनची किंमत अजूनही 73,600 रुपये दिसत आहे. आमच्या ऑफलाइन रिटेल सोर्सनुसार, कंपनीने फोनच्या सर्व कलर वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A12 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Note 10 मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे जो 401पीपीआई सह HDR10+ क्वॉलिटीला सपोर्ट करती आहे. गॅलेक्सी नोट 10 च्या फ्रंट पॅनल वर अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. Galaxy Note 10 चे डायमेंशन 71.8 x 151.0 x 7.9एमएम आहे तसेच याचे वजन 168ग्राम आहे. विशेष म्हणजे Galaxy Note 10 सह येणाऱ्या S Pen चे वजन फक्त 3.04ग्राम आहे.

Samsung Galaxy Note 10 अँड्रॉइड आपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 9 पाई वर सादर केला गेला आहे. हा डिवायस ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या सॅमसंगच्या एक्सनॉस 9825 चिपसेट वर चालतो. Samsung Galaxy Note 10 4G LTE सोबतच 5G ला सपोर्ट करतो. तसेच गॅलेक्सी नोट 10 मध्ये ब्लूटूथ 5, एनएफसी, जीपीएस व वाय-फाई सोबतच यूएसबी टाईप-सी सारखे ऑप्शन्स आहेत. तसेच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy Note 10 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy M12/ F12 ची लाइव इमेज आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

Samsung Galaxy Note 10 फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिवायसच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 16-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/1.5-एफ/2.4 अपर्चर असलेली 12-मेगापिक्सलची वाइड लेंस आणि एफ/2.1 अपर्चर असलेली 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी Galaxy Note 10 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 10-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here