Exclusive: या दमदार फीचर्स सह एंट्री करेल Samsung Galaxy S21 Ultra, लवकरच होईल लॉन्च

Samsung Galaxy S21 सीरीज पुढल्या वर्षाच्या सुरवातीला लॉन्च केली जाणार असल्याची शक्यता आहे. पण या फोन बद्दल लीक व माहिती आतापासून समोर येऊ लागली आहे. या नवीन सीरीज मध्ये कंपनी Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21+ आणि Samsung Galaxy S21 Ultra सादर करू शकते. तसेच कथितरित्या कंपनी गॅलेक्सी एस21 फ्लॅगशिप फोनचे प्रोडक्शन डिसेंबर मध्ये सुरु करू शकते, त्यानंतर हि सीरीज जानेवारी 2021 पर्यंत सादर केली जाऊ शकतो. अलीकडेच Galaxy S21 आणि S21 Ultra गीकबेंच वर स्पॉट केले गेले होते. आता 91mobiles ला Galaxy S21 Ultra चे स्पेसिफिकेशन्स टिप्सटर Ishan Agarwal ने दिले आहेत.

स्मार्टफोन कोडनेम O3 आणि मॉडेल नंबर SM-G998U सह ऑनलाइन स्पॉट केला गेला आहे. तसेच आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार या फ्लॅगशिप फोन मध्ये Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी सह अनेक शानदार फीचर्स असतील.

Samsung Galaxy S21 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Ishan Agarwal नुसार Samsung Galaxy S21 Ultra मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल जो अँड्रॉइड 11-बेस्ड One UI 3.0 वर चालेल. तसेच फोन 108MP प्राइमरी रियर कॅमेरा आणि 40MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्यासह येईल. त्याचबरोबर टिप्सटरने सांगितले आहे कि या फ्लॅगशिप फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल.

तसेच या फ्लॅगशिप फोन मध्ये हाई रिफ्रेश रेट स्क्रीन (144Hz) असू शकते. पण याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. येत्या काही दिवसांत लवकरच फोन बद्दल अजूनही बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे टिप्सटर Ice universe ने Samsung Galaxy S21+ चे रेंडर्स ट्विटर वर शेअर केले आहेत. रेंडर्स मध्ये दिसत आहे कि फोनच्या सर्व कडांवर स्लिम बेजल्स देण्यात आले आहेत, तसेच फोन मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट देण्यात आला आहे जो स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी आहे. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन स्क्रीनच्या उजव्या बाजूला आहेत.

हे देखील वाचा : लो बजेट असलेला Samsung Galaxy A02s वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच करू शकतो एंट्री

Ice universe च्या रेंडर्स मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दिसला आहे, तसेच MySmartPrice वेबसाइटने फोनचे RAW CAD रेंजर्स शेअर केले आहेत ज्यात फोन सर्व बाजूंनी दाखवण्यात आला आहे. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस21+ स्मार्टफोन 6.7 इंचाचा डिस्प्ले आणि 161.5×75.6×7.85mm डायमेन्शन्स सह येईल. डिजाइनच्या बाबतीती हा फोन Galaxy S21 सारखा दिसत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा ज्याचे रेंडर्स गॅलेक्सी एस21 सोबत लीक करण्यात आले होते, या फोन मध्ये कर्व्ड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याची स्क्रीन 6.7 आणि 6.9 इंचाच्या दरम्यान असू शकते. तसेच या फोन मध्ये एस पेन सपोर्ट मिळू शकतो, पण या पेनसाठी फोन मध्ये कोणताही विशेष स्लॉट दिला जाणार नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here