Samsung चा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S21 Ultra कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये कंपनीने मोठ्या प्राइमरी कॅमेरा सेंसरसह ऑटोफोकस असलेला अल्ट्रा कॅमेरा आणि ऑप्टिकल इमेज सेंसरसह दोन टेलीफोटो (3x आणि 10x) कॅमेरा सेंसर दिले आहेत. आता कंपनी आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी करत आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन पुढल्यावर्षी सादर केला जाईल. सॅमसंगचा हा अपकमिंग स्मार्टफोन Galaxy S22 Ultra नावाने सादर केला जाईल ज्यात कंपनी नवीन झूम कॅमेरा टेक्नोलॉजी (zoom camera technology) सह सादर करू शकते. (Samsung Galaxy S22 Ultra new zoom camera technology)
प्रसिद्ध टिपस्टर Ice Universe नुसार सॅमसंग Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये कॉन्टिनूअस झूम असलेला चांगला पेरिस्कोप कॅमेरा सेंसर मिळू शकतो. सध्या सॅमसंग Galaxy S21 Ultra स्मार्टफोनमध्ये जो पेरिस्कोप झूम यूनिट वापरण्यात आला आहे त्यात फिक्स्ड लेंस आहे. झूमसाठी फोन प्राइमरी कॅमेऱ्याने क्लिक केलेले फोटो क्रॉप करतो किंवा पेरिस्कोप कॅमेऱ्याने क्लिक करण्याआधी 2x किंवा 3x झूम लेंसने क्लिक केलेल्या फोटोचा वापर करतो. त्यामुळे इमेज क्वालिटी बिघडते.
हे देखील वाचा : 13 मेला होईल लो बजेट Realme C20A लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले
सॅमसंग कॉन्टिनूअस झूम पेरिस्कोप लेंस मॅकॅनिज्म
Sammobiles च्या रिपोर्टनुसार Samsung Electromechanics आणि Samsung LSI ने मिळून अपकमिंग Galaxy S22 Ultra स्मार्टफोनसाठी कॉन्टिनूअस झूम पेरिस्कोप कॅमेरा टेक्नोलॉजी तयार केली आहे. या कॅमेरा टेक्नोलॉजीमध्ये लेंस (किंवा इतर कॅमेरा एलिमेंट्स) पेरिस्कोप यूनिटमध्ये झूमिंग इन आणि आउट (3x ते 10x साठी) स्वतंत्ररित्या हालचाल करेल. त्यामुळे इमेजमध्ये परफेक्ट ऑप्टिकल शार्पनेस आणि शानदार डिटेल मिळेल. सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ज्या टेक्नोलॉजीबद्दल सांगण्यात येत आहे हि डिजिटल आणि DSLR कॅमेऱ्यातील टेक्नॉलॉजी आहे. याआधी Sony Xperia 1 III स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या पेरिस्कोप झूम कॅमेऱ्यात हि टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यात फक्त जी नेटिव मॅग्निफिकेशन लेवल (3x आणि 4.4x) देण्यात आले आहेत.
Galaxy S22 Ultra : अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि AMD ग्राफिक्स
अपकमिंग Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये नवीन झूम कॅमेऱ्यासह कंपनी अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा, AMD ग्राफिक्स ऑफर करतो. Galaxy S22 Ultra बद्दल समोर आलेल्या अफवांनुसार या फोनमध्ये अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. म्हणजे या फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट मिळणार नाही. सॅमसंगचा हा फोन कंपनीच्या प्रोसेसर Exynos 2200 सह सादर केला जाईल ज्यात ग्राफिक्ससाठी AMD Radeon Mobile GPU दिला जाऊ शकतो. या ग्राफिक्स कार्ड बाबत बोलले जात आहे कि हा Apple च्या लेटेस्ट A14 Bionic चिपमधील GPU पेक्षा दमदार आहे.
