13 मेला होईल लो बजेट Realme C20A लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले

Realme C20 वियातनाम मध्ये झाला सादर.

Realme खूप दिवसांपासून आपल्या C-सीरीजमध्ये स्वस्त आणि पावरफुल बॅटरी असलेले फोन्स सादर करत आहे. अलीकडेच कंपनीने टेक मंचावर C-सीरीजचा पोर्टफोलियो वाढवत Realme C11 2021 लॉन्च केला होता. आता कंपनीने सी-सीरीजच्या अजून एका नवीन फोनच्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनी हा नवीन फोन Bangladesh मध्ये Realme C20A नावाने 13 मेला सादर करेल. अलीकडेच रियलमीने फेसबुक पेजवर फोन लॉन्च टीज करत फोनच्या काही फीचर्सचा खुलासा केला होता. (Realme C20a launch date May 13 5000mah battery)

Realme C20A मध्ये असेल 5000mAh battery

लॉन्च डेटबाबत टीज करत कंपनीने फोनच्या काही फीचर्सची पण माहिती दिली आहे. रियलमीने सांगितले आहे कि Realme C20A मध्ये 5000mAh ची बॅटरी असेल. तसेच डिवाइसमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. फोन बजेट कॅटेगरीमध्ये LCD डिस्प्लेसह येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फोनमध्ये Realme C20 सारखे फीचर्स असू शकतात.

Realme C20 चा फोटो

Realme C20 ची हुबेहूब नक्कल असेल Realme C20A

आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका टीजर व्हिडीओमध्ये, Realme Bangladesh ने पुष्टी केली आहे कि Realme C20A ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये येईल. तसेच, Realme C20A दूसरी मार्केटमध्ये लॉन्च झालेल्या Realme C20 सारखा असेल.

Realme C20

Realme C20 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी वाटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. Realme C20 स्मार्टफोन MediaTek Helio G35 चिपसेटसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 2GB की LPDDR4x RAM देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. जी microSD कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा स्पेसिपिकेशन्स पाहता Realme C20 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, सोबत LED फ्लॅश आहे. तसेच फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच बॅटरी पाहता या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी रिवर्स चार्जला सपोर्ट करते. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित Realme UI वर चालतो. Realme C20 स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, GPS/ A-GPS, Micro-USB, आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here