44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मर्टफोननंतर आता स्मार्टफोन कंपन्या 100 Megapixel सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहेत. म्हणजे जर सर्वकाही सुरळीत झाले तर लवकरच बाजारात 100एमपी फ्रंट कॅमेरा असलेले स्मार्टफोन बाजारात येतील. याची माहिती फेमस टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशनने दिली आहे. चॅट स्टेशनने चीनी सोशल मीडिया साइट वीबोवर सांगितले आहे कि 100 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लवकरच येत आहे. डिजिटल चॅट स्टेशनने सांगितले नाही कि कोणती कंपनी हा स्मार्टफोन बनवत आहे.
100MP + सेल्फी कॅमेरा फ्रंटला येणे खूप रोमांचक असेल कारण सध्या मागे उपलब्ध 108MP सेंसर खूप घेतो. त्यामुळे कॅमेरा फ्रंटला घेणे कंपन्यांसाठी अवघड काम असेल. सेल्फी कॅमेऱ्यात इतका मोठा सेंसर मोटोराइज्ड फ्लिप कॅमेराच्या मदतीने लावता येईल जसा आपण Zenfone 6 Zenfone 7 मध्ये दिसला होता.
हे देखील वाचा : 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Moto चा हा लो बजेट फोन
काही ब्रँड्स 100 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार नाहीत. पण शाओमी आणि वीवो सारख्या कंपन्या असे करू शकतात. सध्या सॅमसंगचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा आहे. बाजारात अश्या अनेक कंपन्या आहेत, ज्यात फोन मध्ये मागे 108एमपी कॅमेरा आहे.
44 मेगापिक्सलपर्यंतचा फ्रंट कॅमेरा असलेले स्मार्टफोन आले आहेत. पण, तुम्हाला यात लवकरच मोठा बदल मिळू शकतो. स्मार्टफोन्ससंबंधित लीक देणाऱ्या डिजिटल चॅट स्टेशननुसार, 100 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लवकरच येत आहे.
हे देखील वाचा : या खास फीचरसह येऊ शकतो Apple चा पावरफुल iPhone 13 Pro, नवीन लीक मध्ये झाला खुलासा
Megapixel म्हणजे काय?
खूप कमी लोकांना माहित आहे आहे कि मेगापिक्सलचा फुल फॉर्म मिलियन पिक्सल आहे. हे एक मेजरमेंट यूनिट आहे. एक मेगापिक्सल मध्ये एक मिलियन पिक्सल म्हणजे 10 लाख पिक्सल असतात. तुमच्या फोन मधील कॅमेरा सेंसर मध्ये सर्वात खाली एक कंपोनेंट असतो त्याला सेंसर म्हणतात. या सेंसर मध्ये पिक्सल असतात. यातील एक पिक्सल मध्ये कलर, लाइट आणि कांट्रस्ट कॅप्चर करण्याची क्षमता असते.
