Home बातम्या सोनी एक्सपीरिया एक्सए3 चा फोटो झाला लीक, 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

सोनी एक्सपीरिया एक्सए3 चा फोटो झाला लीक, 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

टेक कंपनी सोनी घोषणा केली आहे कि कंपनी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2019 मध्ये सहभागी होत आहे आणि 25 फेब्रुवारीला आपले नवीन स्मार्टफोन व डिवाईस टेक मंचावर सादर करेल. पण सोनी ने अजूनतरी सांगतिले नाही कि कंपनी त्यादिवशी कोणते फोन लॉन्च करेल पण चर्चा अशी आहे कि एमडब्ल्यूसी 2019 मध्ये सोनी एक्सपीरिया एक्सझेड4, एक्सपीरिया एक्सए3, एक्सपीरिया एक्सए3 अल्ट्रा आणि एक्सपीरिया एल3 लॉन्च करू शकते. आज यातील एक्सपीरिया एक्सए3 स्मार्टफोनची रेंडर ईमेज आणि स्पेसिफिकेशन्स लॉन्चच्या आधीच लीक झाले आहेत.

सोनी एक्सपीरिया एक्सए3 विनफ्यूचर द्वारा शेयर करण्यात आला आहे. या वेबसाइट ने फोनच्या रेंडर ईमेज सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये एक्सपीरिया एक्सए3 बेजल लेस डिजाईन वर दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला बॉडी पार्ट मध्ये सेल्फी कॅमेरा आणि स्पीकर आहे. तसेच फ्रंट पॅनल वर इतर तिन्ही किनारे पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या वरच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे आणि बॅक पॅनल वरच सोनी लोगो आणि एनएफसी साईन आहे.

एक्सपीरिया एक्सए3 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन 21:9 आस्पेक्ट रेशियो वाली डिस्प्ले वर सादर केला जाईल. लीकनुसार या फोन मध्ये 5.9-इंचाची मोठी ​स्क्रीन दिली जाईल जी 2560 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक पाहता सोनी एक्सपीरिया एक्स3 4जीबी रॅम सह सादर केला जाईल तसेच हा फोन 64जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट दिला जाऊ शकतो.

एक्सक्लूसिव : हा आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू

सोनीचा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर 25-मेगापिक्सलचा असू शकतो तर दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. समोर आलेल्या फोटो वरून समजते कि सोनी आपल्या या फोन मध्ये साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर बटण देईल. फोनच्या उजव्या पॅनल वरच पावर बटण व वाल्यूम रॉकर असतील.

जियोफोन 3 ची माहिती आली समोर, बघा कसा असेल हा फोन

एक्सपीरिया एक्सए3 सोनी द्वारा ब्लू, ब्लॅक, सिल्वर आणि पिंक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी ने अजूनतरी एक्सपीरिया एक्सए3 च्या लॉन्च ची कोणतीही माहिती दिली नाही पण अशा आहे कि 25 फेब्रुवारीला सोनी च्या एमडब्ल्यूसी ईवेंट मध्ये एक्सपीरिया एक्सए3 पण येईल. हा फोन कंपनी मीड बजेट मध्ये सादर करू शकते.