एक्सक्लूसिव : हा आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू

नोकिया 9 प्योरव्यू बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत कि कंपनी आपला हा फोन 5 रियर कॅमेऱ्यांसह सादर करेल. अनेक लीक्स मध्ये या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत ज्यातून नोकिया 9 प्योरव्यू ची माहिती मिळाली होती. आता तमाम लीक्सच्या पुढे जात 91मोबाईल्स नोकिया 9 प्योरव्यू चे अधिकृत प्रेस रेंडर ईमेज घेऊन आला आहे ज्यात फोनच्या लुक, डिस्प्ले व डिजाईनची संपूर्ण माहिती आहे. या फोटो मध्ये नोकिया 9 प्योरव्यू च्या कॅमेरा सेटअपची पण सविस्तर माहिती मिळेल.

नोकिया 9 प्योरव्यू ची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 5 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा जगातील सर्वात जास्त रियर कॅमेरा सेंसर असलेला स्मार्टफोन बनला आहे. हे पाचही कॅमेरा सेंसर एका मोठ्या सर्कल शेप मध्ये लावण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये कॅमेरा सेंसर सोबत एलईडी फ्लॅश पण देण्यात आला आहे. नोकियाच्या या फोन मध्ये पण कार्ल जेसिस चे कॅमेरा सेंसर दिले जातील. फोनच्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगर​​प्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही तसेच नो​किया ब्रँडिंग सोबत एंडरॉयड वन लिहिण्यात आलेले आहे.

फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर कंपनी ने हा फोन ट्रेंड मधील नॉच डिस्प्ले किंवा पंच होल डिस्प्ले पासून लांब ठ्वले आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या पॅनल वर बारीक बेजल्स आहेत. डिस्प्लेच्या वरील बॉडी पार्ट वरच सेल्फी कॅमेरा स्पीकर आणि 3डी सेसिंग सेंसर देण्यात आले आहेत. नोकिया 9 प्योरव्यू च्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही तसेच फोनच्या डिस्प्ले वर फिंगरप्रिंट सेंसरचे चिन्ह आहे. म्हणजे हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

6जीबी रॅम आणि 48-एमपी कॅमेरा सह येईल मोटो झेड4 प्ले, स्पेसिफिकेशन्स साले समोर

नोकिया 9 प्योरव्यू च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहेत. नोकिया 9 प्योरव्यू चा बॅक पॅनल खूप चमकदार दिसत आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99 इंचाच्या डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो जो 2के रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. आतापर्यंत आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो तसेच स्टोरेज साठी या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो.

एक्सक्लूसिव: 6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज, 15 मार्च पासून होईल सेल

नोकिया 9 प्योरव्यू कंपनी द्वारा क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट 845 स्नॅपड्रॅगॉन ने सुस्सज असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अनेक लीक्स मध्ये अशा व्यक्त केली जात आहे कि कंपनी हा फोन स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर पण सादर केला जाईल. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये 5 रियर कॅमेरा सेंसर असणार आहेत हे स्पष्ट झाले आहे तसेच फोनचे स्पेसिफिकेशन्स पण कंपनी द्वारा लॉन्च केल्यानंतर मिळतील. कंपनी या महिन्यात एफडब्ल्यूसी 2019 मध्ये हा फोन सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here