4G Data - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 30 Mar 2020 13:20:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/ https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/#respond Mon, 30 Mar 2020 13:20:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6937 बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

The post लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus ने भारताला जणू थांबवले आहे. संपूर्ण देश लॉकडाउन आहे आणि सर्व नागरिक आपला काम धंदा सोडून घरी बसले आहेत. गेल्याच आठवड्यात आम्ही हे जाणले होते आणि घरी बसल्यावर लोक इंटरनेटच्या मदतीने लोक टाईमपास करत आहेत. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि इंडियन यूजर्स कशाप्रकारे आपला इंटरनेट डेटा वाचवू शकतात आणि बराच काळ चालू शकता. आता देशातील इंटरनेटचा वेगाने वाढत असलेल्या वापराचे आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि गेल्या आठवड्यातच देशात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे.

ईटी च्या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Coronavirus मुळे देशात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वेगाने वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार या काळात भारतात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे. फक्त इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर आधीच्या तुलनेत जास्त झाला आहे तर दुसरीकडे हा वापरामुळे इंटरनेटच्या स्पीड मध्ये पण 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

स्पीड अजून झाला कमी

रिपोर्टनुसार ISPAI म्हणजे इंटरनेट सर्विसेज प्रोवाइडर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले आहे कि गेल्या आठवड्यात भारतात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर जास्त झाल्यामुले स्पेक्ट्रम वर भार पडला आहे आणि इंटरनेट स्पीड घटला आहे. सध्या हि घसरण 20 टक्क्यांची आहे पण अजून दोन आठवडे सुरु राहणाऱ्या लॉकडाउन मध्ये इंटरनेटचा स्पीड अजून कमी होईल. रिपोर्ट नुसार इंटरनेट स्पीड 25 ते 30 टक्क्यांनी अजून कमी होऊ शकतो. विश्लेषकांच्या मते सरासरी इंटरनेट स्पीड 9Mbps ते 10Mbps पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

70 टक्क्यांनी वाढला आहे वापर

लॉकडाउन नंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. घरातून ऑफिसचे काम करताना सर्वांना इंटरनेटचा वापर जास्त करावा लागत आहे. देशात इंटरनेटचा वापर सरासरी 30 टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही दिवसांत वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट यूजर्सची संख्या तीन पटीने वाढली आहे. रिपोर्ट नुसार लॉकडाउन सुरु झाल्यावर बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

अनावश्यक मीडिया फाइल्स करू नका शेयर

इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यामुळे कमी होत असलेला स्पीड लक्षात घेता इंटरनेट यूजर्सने विनंती केली जात आहे व्हाट्सऍप किंवा इतर सोशल मीडिया व मेसेंजिंग ऍप्स वर अनावश्यक मीडिया फाइल्स शेयर करणे टाळा. डेटा कंजक्शन पासून वाचण्याचा सल्ला दिला जात आहे कि खासकरून वीडियोजची देवाण घेवाण कमी केली पाहिजे ज्यामुळे विनाकारण इंटरनेट स्पेक्ट्रम व नेटवर्क वर भार पडतो.

रिपोर्टनुसार भारतात सध्या 68.76 कोटींच्या आसपास इंटरनेट यूजर आहेत आणि यातील जवळपास 66.5 कोटी यूजर वायरलेस पद्धतीने इंटरनेट वापरतात. यात स्मार्टफोन आणि डॉन्गल आणि वाईफाई चा समावेश आहे. लॉकडाउन नंतर आमच्यासारख्या अनेक लोकांना घरातून ऑफिसचे काम करावे लागत आहे. फक्त वर्क फ्रॉम होम नाही तर अनेक प्रकारच्या मूलभूत गरजा व सर्विसेज पण ऑनलाईन वापरल्या जात आहेत. त्यामुळे 91मोबाईल्स पण विंनती करत आहे कि विनाकारण इंटरनेट नेटवर्क वर बोझा पडू देऊ नका जेणेकरून बिनदिक्कत सर्वांना डेटा नेटवर्क मिळू शकेल.

The post लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/feed/ 0
मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये भारत मागे, पहिल्या क्रमांकावर आहे हा देश https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-in-india-lags-know-which-country-have-fastest-internet-speed/ https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-in-india-lags-know-which-country-have-fastest-internet-speed/#respond Tue, 10 Sep 2019 13:44:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5274 भारत, पाकिस्तान आणि अफगानिस्तान मध्ये इंटरनेट स्पीड सरासरी पेक्षा पण कमी आहे.

The post मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये भारत मागे, पहिल्या क्रमांकावर आहे हा देश first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज भारत त्या मोठ्या देशांत येतो जे इंटरनेट डेटा खूप जास्त वापरतात. भारतात ज्या वेगाने इंटरनेट यूजर्सची संख्या वाढत आहे, त्यापेक्षा अधिक वेगाने डेटाचा वापर पण वाढला आहे. अलीकडेच टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) च्या नवीन रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि मोबाईल डेटाच्या वापरात भारतीय सर्वात पुढे आहेत. पण हैराणीची बाब म्हणजे मोबाईल स्पीडच्या बाबतीत भारत दुसऱ्या अनेक देशांच्या मागे आहे.

स्पीडटेस्ट कंपनी Ookla ने एक नवीन स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि जगभरात मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये 21.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच ब्रॉडबॅंडच्या स्पीड मध्ये 37.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. पण तरीसुद्धा भारतात इंटरनेटचा स्पीड जगातील सरासरी स्पीड पेक्षा कमी आहे.

रिपोर्ट नुसार भारतात मोबाईलच्या वापरात 16.3 टक्के इयर ऑन इयर (YOY) वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच भारतात फिक्स्ड ब्रॉडबॅंडच्या स्पीड मध्ये 28.5 टक्के वाढ झाली आहे. पण सिंगापूर इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

सिंगापुर मध्ये फिक्सड ब्रॉडबॅंडच्या स्पीड मध्ये 5.6 टक्के वाढ झाली आहे. तर साउथ कोरिया मध्ये मोबाईल डाउनलोडच्या स्पीड मध्ये 165.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच आशियातील देशांमध्ये इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जपान पुढे आहे.

Ookla च्या रिपोर्ट नुसार जापान मध्ये सरासरीपेक्षा चांगला मोबाईल आणि फिक्स्ड ब्रॉडबॅंड स्पीड नोंदवण्यात आला आहे. दक्षिण आशियातील देशांत भारत, पाकिस्तान आणि अफगानिस्तान मध्ये इंटरनेट स्पीड सरासरी पेक्षा पण कमी आहे. रिलायंस जियो मुळे भारतीय टेलीकॉम बाजारात इंटरनेट डेटा यूजर्स वाढले आहेत. ज्यामुळे भारत जगातील सर्वात जास्त इंटरनेट वापरणाऱ्या देशांच्या यादीत आला आहे.

The post मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये भारत मागे, पहिल्या क्रमांकावर आहे हा देश first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-in-india-lags-know-which-country-have-fastest-internet-speed/feed/ 0
पाकिस्तान पेक्षा पण कमी मोबाईल इंटरनेट स्पीड मिळत आहे भारतात, देशाचा ग्लोबल रँक घसरला https://www.91mobiles.com/marathi/ookla-report-india-average-mobile-download-speed/ https://www.91mobiles.com/marathi/ookla-report-india-average-mobile-download-speed/#respond Tue, 28 May 2019 14:41:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4435 गेल्यावर्षी भारताची ग्लोबल रँकिग 109 होती ती यावर्षी घसरून 121 झाली आहे

The post पाकिस्तान पेक्षा पण कमी मोबाईल इंटरनेट स्पीड मिळत आहे भारतात, देशाचा ग्लोबल रँक घसरला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांत भारत जागतिक पातळीवर मोबाईलचा मोठा बाजार म्हणून उदयास आला आहे. फक्त स्मार्टफोनच नाही तर इंटरनेट डेटा आणि 4जी सर्विसचा वापर पण भारतात जास्त वाढला आहे. आज भारत जगातील त्या मोठ्या देशांच्या टॉप लिस्ट मध्ये आहे जिथे इंटरनेट डेटाचा वापर खूप जास्त होतो. रिला​यंस जियोच्या एंट्री नंतरच भारतीय टेलीकॉम बाजारात इंटरनेट डेटा यूजर्स वाढले आहेत. पण हैराणीची बाब भारत एकीकडे इंटरनेट वापरणारा सर्वात मोठा बाजार बनत आहे तर दुसरीकडे मोबाईल स्पीडच्या बाबतीत भारताची रँक घसरून 121व्या क्रमांकावर आला आहे.

हे खरे कि भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढली आहे आणि इंटरनेट सेवा तसेच 4जी सर्विस आधीपेक्षा खूप जास्त स्वस्त झाली आहे. पण जगात इतर देशांच्या तुलनेत भारताची रँकिंग कमी झाली आहे. अमेरिकी डेटा स्पीड टेस्टर फर्म Ookla ने आपल्या नव्या रिपोर्ट मध्ये भारतात उपलब्ध इंटरनेट स्पीड संबंधित हि माहिती दिली आहे. ओकला ने सांगितले कि गेल्यावर्षी भारताची ग्लोबल रँकिग 109 होती ती यावर्षी घसरून 121 झाली आहे. ओकला चा हा रिपोर्ट वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आकड्यांवर आधारित आहे.

सरासरी स्पीड मध्ये वाढ
ग्लोबल रँकिंग कमी झाल्याने तुम्हाला थोडे वाईट वाटले असेल पण प्रकरण इतके वाईट पण नाही. ओकला ने आपल्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट सांगितले आहे कि जरी ग्लोबल रँकिंग मध्ये भारताची रँकिंग कमी झाली असली तरी गेल्यावर्षी पेक्षा देशात सरासरी मोबाईल डेटा स्पीड मध्ये सुधार आला आहे. गेल्यावर्षी जानेवारी-मार्च तिमाही मध्ये देशात सरासरी मोबाईल डेटा स्पीड 9.01 होता तो यावर्षी वाढून 10.71 झाला आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो कि भारतात मोबाईल डेटा स्पीड वाढत आहे. ग्लोबल रँकिंग मध्ये मागे जाण्याचे कारण आपल्या देशात इंटरनेटची वाईट अवस्था आहे असे नाही तर याचे खरे कारण इतर देशांमध्ये डेटा स्पीड भारतापेक्षा जास्त वेगाने सुधारला आहे. गेल्यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत भारतात सर्व टेलीकॉम कंपन्यांचा सरासरी 4जी एलटीई डाउनलोड स्पीड 9.84Mbps होता जो यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत 10.58Mbps झाला आहे.

ब्रॉडबॅंड क्षेत्रात पण झाला सुधार
दुसरीकडे ब्रॉडबॅंड स्पीड बद्दल बोलायचे झाले तर भारतात गेल्यावर्षी सरासरी डाउनलोड स्पीड 20.72Mbps होता जो यावर्षी वाढून 29.25Mbps झाला आहे. इथे पण सरासरी स्पीड वाढूनही भारत ग्लोबल इंडेक्स मध्ये 67व्या स्थानावरून 68व्या स्थानावर आला आहे. विशेष म्हणजे साल 2019 च्या पहिल्या तिमाहीत नॉर्वे ने सर्वात जास्त 65.41Mbps चा सरासरी डाउनलोड स्पीड देऊन पहिले स्थान मिळवले आहे. तसेच ब्रॉडबॅंड सेग्मेंट मध्ये 197.50Mbps सरासरी डाउनलोड स्पीड देऊन सिंगापुर पहिल्या क्रमांकावर आहे.

शेजारी देश पाकिस्तान सरासरी मोबाईल डेटा स्पीड मध्ये भारतापेक्षा पुढे गेला आहे. जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान भारतात 10.71Mbps चा सरासरी मोबाईल स्पीड होता तर याच काळात पाकिस्तान मध्ये 13.39Mbps चा सरासरी मोबाईल स्पीड होता. भारताची भौगोलिक स्थिति आणि लोकसंख्या इंटरनेट स्पीड साठी मोठे आव्हान आहे. इथे एकाच वेळी एकाच नेटवर्क वर अनेक लोक इंटरनेटचा वापर करत आहेत आणि याच कारणामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो.

The post पाकिस्तान पेक्षा पण कमी मोबाईल इंटरनेट स्पीड मिळत आहे भारतात, देशाचा ग्लोबल रँक घसरला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ookla-report-india-average-mobile-download-speed/feed/ 0