लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी

Coronavirus ने भारताला जणू थांबवले आहे. संपूर्ण देश लॉकडाउन आहे आणि सर्व नागरिक आपला काम धंदा सोडून घरी बसले आहेत. गेल्याच आठवड्यात आम्ही हे जाणले होते आणि घरी बसल्यावर लोक इंटरनेटच्या मदतीने लोक टाईमपास करत आहेत. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि इंडियन यूजर्स कशाप्रकारे आपला इंटरनेट डेटा वाचवू शकतात आणि बराच काळ चालू शकता. आता देशातील इंटरनेटचा वेगाने वाढत असलेल्या वापराचे आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि गेल्या आठवड्यातच देशात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे.

ईटी च्या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Coronavirus मुळे देशात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वेगाने वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार या काळात भारतात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे. फक्त इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर आधीच्या तुलनेत जास्त झाला आहे तर दुसरीकडे हा वापरामुळे इंटरनेटच्या स्पीड मध्ये पण 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

स्पीड अजून झाला कमी

रिपोर्टनुसार ISPAI म्हणजे इंटरनेट सर्विसेज प्रोवाइडर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले आहे कि गेल्या आठवड्यात भारतात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर जास्त झाल्यामुले स्पेक्ट्रम वर भार पडला आहे आणि इंटरनेट स्पीड घटला आहे. सध्या हि घसरण 20 टक्क्यांची आहे पण अजून दोन आठवडे सुरु राहणाऱ्या लॉकडाउन मध्ये इंटरनेटचा स्पीड अजून कमी होईल. रिपोर्ट नुसार इंटरनेट स्पीड 25 ते 30 टक्क्यांनी अजून कमी होऊ शकतो. विश्लेषकांच्या मते सरासरी इंटरनेट स्पीड 9Mbps ते 10Mbps पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

70 टक्क्यांनी वाढला आहे वापर

लॉकडाउन नंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. घरातून ऑफिसचे काम करताना सर्वांना इंटरनेटचा वापर जास्त करावा लागत आहे. देशात इंटरनेटचा वापर सरासरी 30 टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही दिवसांत वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट यूजर्सची संख्या तीन पटीने वाढली आहे. रिपोर्ट नुसार लॉकडाउन सुरु झाल्यावर बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

अनावश्यक मीडिया फाइल्स करू नका शेयर

इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यामुळे कमी होत असलेला स्पीड लक्षात घेता इंटरनेट यूजर्सने विनंती केली जात आहे व्हाट्सऍप किंवा इतर सोशल मीडिया व मेसेंजिंग ऍप्स वर अनावश्यक मीडिया फाइल्स शेयर करणे टाळा. डेटा कंजक्शन पासून वाचण्याचा सल्ला दिला जात आहे कि खासकरून वीडियोजची देवाण घेवाण कमी केली पाहिजे ज्यामुळे विनाकारण इंटरनेट स्पेक्ट्रम व नेटवर्क वर भार पडतो.

रिपोर्टनुसार भारतात सध्या 68.76 कोटींच्या आसपास इंटरनेट यूजर आहेत आणि यातील जवळपास 66.5 कोटी यूजर वायरलेस पद्धतीने इंटरनेट वापरतात. यात स्मार्टफोन आणि डॉन्गल आणि वाईफाई चा समावेश आहे. लॉकडाउन नंतर आमच्यासारख्या अनेक लोकांना घरातून ऑफिसचे काम करावे लागत आहे. फक्त वर्क फ्रॉम होम नाही तर अनेक प्रकारच्या मूलभूत गरजा व सर्विसेज पण ऑनलाईन वापरल्या जात आहेत. त्यामुळे 91मोबाईल्स पण विंनती करत आहे कि विनाकारण इंटरनेट नेटवर्क वर बोझा पडू देऊ नका जेणेकरून बिनदिक्कत सर्वांना डेटा नेटवर्क मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here