मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये भारत मागे, पहिल्या क्रमांकावर आहे हा देश

आज भारत त्या मोठ्या देशांत येतो जे इंटरनेट डेटा खूप जास्त वापरतात. भारतात ज्या वेगाने इंटरनेट यूजर्सची संख्या वाढत आहे, त्यापेक्षा अधिक वेगाने डेटाचा वापर पण वाढला आहे. अलीकडेच टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) च्या नवीन रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि मोबाईल डेटाच्या वापरात भारतीय सर्वात पुढे आहेत. पण हैराणीची बाब म्हणजे मोबाईल स्पीडच्या बाबतीत भारत दुसऱ्या अनेक देशांच्या मागे आहे.

स्पीडटेस्ट कंपनी Ookla ने एक नवीन स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि जगभरात मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये 21.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच ब्रॉडबॅंडच्या स्पीड मध्ये 37.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. पण तरीसुद्धा भारतात इंटरनेटचा स्पीड जगातील सरासरी स्पीड पेक्षा कमी आहे.

रिपोर्ट नुसार भारतात मोबाईलच्या वापरात 16.3 टक्के इयर ऑन इयर (YOY) वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच भारतात फिक्स्ड ब्रॉडबॅंडच्या स्पीड मध्ये 28.5 टक्के वाढ झाली आहे. पण सिंगापूर इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

सिंगापुर मध्ये फिक्सड ब्रॉडबॅंडच्या स्पीड मध्ये 5.6 टक्के वाढ झाली आहे. तर साउथ कोरिया मध्ये मोबाईल डाउनलोडच्या स्पीड मध्ये 165.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच आशियातील देशांमध्ये इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जपान पुढे आहे.

Ookla च्या रिपोर्ट नुसार जापान मध्ये सरासरीपेक्षा चांगला मोबाईल आणि फिक्स्ड ब्रॉडबॅंड स्पीड नोंदवण्यात आला आहे. दक्षिण आशियातील देशांत भारत, पाकिस्तान आणि अफगानिस्तान मध्ये इंटरनेट स्पीड सरासरी पेक्षा पण कमी आहे. रिलायंस जियो मुळे भारतीय टेलीकॉम बाजारात इंटरनेट डेटा यूजर्स वाढले आहेत. ज्यामुळे भारत जगातील सर्वात जास्त इंटरनेट वापरणाऱ्या देशांच्या यादीत आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here