5G Internet - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 01 Oct 2022 05:54:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launched-in-india/#respond Sat, 01 Oct 2022 05:54:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13630 5G Launch in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज IMC 2022 म्हणजे इंडिया मोबाइल कांग्रेसच्या मंचावरून भारतात 5जी सर्व्हिस लाँच केली आहे. 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारत सरकारकडून Reliance Jio, Airtel आणि Vi सारख्या टेलीकॉम कंपन्यांना 5G Spectrum चं वाटप करण्यात आलं होतं, आजच्या लाँच नंतर या कंपन्या देशात आपली सेवा सुरु करू शकतील. […]

The post प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Launch in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज IMC 2022 म्हणजे इंडिया मोबाइल कांग्रेसच्या मंचावरून भारतात 5जी सर्व्हिस लाँच केली आहे. 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारत सरकारकडून Reliance Jio, Airtel आणि Vi सारख्या टेलीकॉम कंपन्यांना 5G Spectrum चं वाटप करण्यात आलं होतं, आजच्या लाँच नंतर या कंपन्या देशात आपली सेवा सुरु करू शकतील. 5G Services मध्ये मजबूत 5G Network सोबतच cloud gaming, AR/VR technology आणि IoT मध्ये आमूलाग्र बदल दिसेल परंतु सर्वसामान्य जनतेला ज्या गोष्टीची सर्वात जास्त प्रतीक्षा आहे ती म्हणजे सुपर फास्ट 5G Internet! 5जी लाँचनंतर भारतात इंटरनेट आता रॉकेट स्पीडनं चालेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

5G Services Launched in India by PM Modi

नवी दिल्लीतील प्रगती मैदानमध्ये आयोजित आयएमसी 2022 इव्हेंटच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशातील तिन्ही प्रमुख टेलीकॉम कंपन्या एयरटेल, जियो आणि वीआयच्या 5जी सर्विसचा डेमो देखील घेतला आहे. या दरम्यान मोदींनी 5जी अँब्युलन्स आणि 5जी एज्युकेशन सारख्या सर्विसेसची माहिती जाणून घेतली त्याचबरोबर ऑग्मेंटेड रियलिटी वर्चुअल रियलिटीचा अनुभव देखील घेतला. इतकेच नव्हे तर 5जी टेक्नोलॉजीच्या मदतीनं पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये बसून स्वीडनमध्ये ठेवण्यात आलेली कार देखील चालवून दाखवली.

5जीचा फायदा

5जी एक नेक्स्ट जेनरेशन मोबाइल कम्यूनिकेशन नेटवर्क आहे जो सध्याच्या 4जी च्या तुलनेत मोठा आणि वेगवान असेल. 5जी नेटवर्क फक्त मोबाइल स्मार्टफोंस पर्यंत मर्यादित राहणार नाही तर सुपरफास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासह याचा फायदा क्लाउड गेमिंग (cloud gaming), एआर/वीआर टेक्नॉलजी (AR/VR technology), आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) इत्यादीमध्ये होईल.

किती फास्ट असेल 5G

5G बद्दल लोकांच्या मनात सर्वात जास्त उत्सुकता हिच्या स्पीडमुळे आहे. सध्याच्या 4G चा टाॅप स्पीड 100mbps म्हणजे 100 मेगाबिट्स प्रति सेकंड आहे. तर 5G मध्ये हा स्पीड थेट 10GBPS (10 जीबी प्रति सेकंड) होईल. अर्थात 4जी पेक्षा 100 पट जास्त. तुम्हाला आठवत असेल की 3G नेटवर्कवर हा स्पीड 7.2mbps होता. आणि तरी सुद्धा जेव्हा 3जीची सुरुवात झाली होती तेव्हा मोबाइल युजर्स किती उत्साही होते. मग आता 5जी स्पीड जेव्हा तुमच्या स्मार्टफोनमध्ये चालेल तेव्हा काय होईल.

The post प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launched-in-india/feed/ 0
5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/ https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/#respond Fri, 23 Sep 2022 07:41:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13392 5G Plan Price: 5G पुढील महिन्यात भारतात रोल आउट (5G Service India launch) होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि रिलायन्स जियो (Reliance Jio) या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी घोषणा केली आहे की त्या पुढील महिन्यात म्हणजे Diwali 2022 पासून देशात आपली 5जी सेवा (5G Service) सुरु करतील. 5जी सर्व्हिससाठी ग्राहकांना किती पैसे […]

The post 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Plan Price: 5G पुढील महिन्यात भारतात रोल आउट (5G Service India launch) होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि रिलायन्स जियो (Reliance Jio) या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी घोषणा केली आहे की त्या पुढील महिन्यात म्हणजे Diwali 2022 पासून देशात आपली 5जी सेवा (5G Service) सुरु करतील. 5जी सर्व्हिससाठी ग्राहकांना किती पैसे द्यावे लागतील याबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. काहींच्या मते नवीन सेवा टेस्ट करण्यासाठी ग्राहकांना मोफत देण्यात येईल तर काही रिपोर्ट्सनुसार 5G महागडं प्रकरण असू शकतं. याबाबत कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरनं मौन सोडलं नाही. परंतु आता एका नवीन रिपोर्टमधून 5G सेवेच्या शुल्काची माहिती समोर आली आहे.

4G प्लॅन इतकी असेल 5G प्लॅनची किंमत

इकोनॉमिक टाइम्स (ईटी) च्या एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जियो आणि भारती एयरटेल आपल्या 5जी सेवेची किंमत 4जी सेवेच्या किंमती एवढीच ठेवतील. इंडस्ट्रीची माहिती असणाऱ्या अधिकारी आणि विश्लेषकांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की 4G च्या किंमतीत 5G सेवा लाँच करून देशात मोठ्या प्रमाणवर लोकांना 5जी सर्व्हिसवर आणण्यात येईल. हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

टेलीकॉम कंपन्या सुरुवातीला 5जी सेवांसाठी ग्राहकांकडून जास्त पैसे घेणार नाहीत कारण त्यांना 4 जी युजर्सना पुढील पिढीच्या मोबाइल नेटवर्कवर येण्यासाठी प्रेरित करायचं आहे. रिपोर्टमध्ये तज्ज्ञांचा हवाला देत संकेत देण्यात आला आहे की 5G लाँचनंतर किंमत वाढवली जाईल. परंतु हे लवकर होणार नाही कारण 5G हँडसेट अजूनही महाग आहेत.

5G price in India बद्दल तज्ज्ञांचं मत

Analysys Mason चे भारतीय प्रमुख रोहन धमीजा यांनी म्हटलं आहे, “5जी ऑपरेटर सुरुवातीला 4जी पेक्षा प्रीमियम चार्ज करण्याची शक्यता नाही कारण सुरुवातीला त्यांचं लक्ष 5जी वापर वाढवणे, जास्त युजर्सना वेगाचा अनुभव देणं, जास्त डेटा वापरणं आणि त्यामुळे एआरपीयू वाढवण्यावर असेल.” हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

धमीजा यांनी यूकेचं उदाहरण देत सांगितलं की तिथे 5जी सेवा 4जी सर्व्हिसपेक्षा जास्त किंमतीत लाँच करण्यात आली होती परंतु तिथे 5जीचा वापर वाढवण्यासाठी किंमती कमी कराव्या लागल्या.

या देशांमध्ये लोक वापरात आहेत 5जी

भारतात जरी 5G आता येत असलं तर जगभरातील अनेक देश आधीपासून ही सेवा वापरत आहेत. सध्या अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशांमध्ये लोकांना 5जी सर्व्हिस मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये साल 2018 मध्ये सर्वप्रथम 5जी लाँच झालं होतं. तसेच मे 2019 मध्ये यूके, यूएस आणि स्वित्जरलँडमध्ये 5जी सुरु झालं आहे.

The post 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/feed/ 0