5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

5G Plan Price: 5G पुढील महिन्यात भारतात रोल आउट (5G Service India launch) होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि रिलायन्स जियो (Reliance Jio) या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी घोषणा केली आहे की त्या पुढील महिन्यात म्हणजे Diwali 2022 पासून देशात आपली 5जी सेवा (5G Service) सुरु करतील. 5जी सर्व्हिससाठी ग्राहकांना किती पैसे द्यावे लागतील याबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. काहींच्या मते नवीन सेवा टेस्ट करण्यासाठी ग्राहकांना मोफत देण्यात येईल तर काही रिपोर्ट्सनुसार 5G महागडं प्रकरण असू शकतं. याबाबत कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरनं मौन सोडलं नाही. परंतु आता एका नवीन रिपोर्टमधून 5G सेवेच्या शुल्काची माहिती समोर आली आहे.

4G प्लॅन इतकी असेल 5G प्लॅनची किंमत

इकोनॉमिक टाइम्स (ईटी) च्या एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जियो आणि भारती एयरटेल आपल्या 5जी सेवेची किंमत 4जी सेवेच्या किंमती एवढीच ठेवतील. इंडस्ट्रीची माहिती असणाऱ्या अधिकारी आणि विश्लेषकांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की 4G च्या किंमतीत 5G सेवा लाँच करून देशात मोठ्या प्रमाणवर लोकांना 5जी सर्व्हिसवर आणण्यात येईल. हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

टेलीकॉम कंपन्या सुरुवातीला 5जी सेवांसाठी ग्राहकांकडून जास्त पैसे घेणार नाहीत कारण त्यांना 4 जी युजर्सना पुढील पिढीच्या मोबाइल नेटवर्कवर येण्यासाठी प्रेरित करायचं आहे. रिपोर्टमध्ये तज्ज्ञांचा हवाला देत संकेत देण्यात आला आहे की 5G लाँचनंतर किंमत वाढवली जाईल. परंतु हे लवकर होणार नाही कारण 5G हँडसेट अजूनही महाग आहेत.

5G price in India बद्दल तज्ज्ञांचं मत

Analysys Mason चे भारतीय प्रमुख रोहन धमीजा यांनी म्हटलं आहे, “5जी ऑपरेटर सुरुवातीला 4जी पेक्षा प्रीमियम चार्ज करण्याची शक्यता नाही कारण सुरुवातीला त्यांचं लक्ष 5जी वापर वाढवणे, जास्त युजर्सना वेगाचा अनुभव देणं, जास्त डेटा वापरणं आणि त्यामुळे एआरपीयू वाढवण्यावर असेल.” हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

धमीजा यांनी यूकेचं उदाहरण देत सांगितलं की तिथे 5जी सेवा 4जी सर्व्हिसपेक्षा जास्त किंमतीत लाँच करण्यात आली होती परंतु तिथे 5जीचा वापर वाढवण्यासाठी किंमती कमी कराव्या लागल्या.

या देशांमध्ये लोक वापरात आहेत 5जी

भारतात जरी 5G आता येत असलं तर जगभरातील अनेक देश आधीपासून ही सेवा वापरत आहेत. सध्या अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशांमध्ये लोकांना 5जी सर्व्हिस मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये साल 2018 मध्ये सर्वप्रथम 5जी लाँच झालं होतं. तसेच मे 2019 मध्ये यूके, यूएस आणि स्वित्जरलँडमध्ये 5जी सुरु झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here