Adani Data Networks - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 07:20:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Adani च्या कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं UL (AS) लायसन्स; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-gets-unified-license-for-full-fledge-telecom-services-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-gets-unified-license-for-full-fledge-telecom-services-in-india/#respond Wed, 12 Oct 2022 07:32:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13908 इंडियन टेलीकॉम मार्केटमध्ये Jio, Airtel आणि Vodafone idea (Vi) तीन प्रायव्हेट कंपन्या सक्रिय आहेत. सर्वात जास्त सब्सक्राइबर बेससह रिलायन्स जियो आघाडीवर आहे, त्यानंतर एयरटेल आणि विआयचं येतं. 5G Services भारतात सुरु झाल्यानंतर सध्या जियो आणि एयरटेलमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु आता भारतीय टेलीकॉम बाजार लवकरच बदलणार असं दिसतंय. या तिन्ही कंपन्यांसोबतच अदानी डेटा […]

The post Adani च्या कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं UL (AS) लायसन्स; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम मार्केटमध्ये Jio, Airtel आणि Vodafone idea (Vi) तीन प्रायव्हेट कंपन्या सक्रिय आहेत. सर्वात जास्त सब्सक्राइबर बेससह रिलायन्स जियो आघाडीवर आहे, त्यानंतर एयरटेल आणि विआयचं येतं. 5G Services भारतात सुरु झाल्यानंतर सध्या जियो आणि एयरटेलमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु आता भारतीय टेलीकॉम बाजार लवकरच बदलणार असं दिसतंय. या तिन्ही कंपन्यांसोबतच अदानी डेटा नेटवर्क या नवीन नावाचा देखील समावेश होऊ शकतो. Adani Data Networks कंपनीला UL (AS) लायसन्स मिळालं आहे त्यामुळे देशात टेलीकॉम सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये अंबानींनंतर अदानी देखील दिसू शकतात.

Adani Data Networks बद्दल मोठी बातमी समोर आली आहे की गौतम अदानी यांच्या या कंपनीला भारत सरकार कडून संपूर्ण देशात टेलीकॉम सर्व्हिस देण्याचं लायसन्स मिळालं आहे. अदानी डेटा नेटवर्क्सला यूनिफाइड लायसन्स देण्यात आलं आहे आणि आता ही कंपनी देखील Jio व Airtel प्रमाणे भारतात आपली टेलीकॉम सेवा देऊ शकेल. Adani टेलीकॉम मार्केटमध्ये आल्यामुळे संपूर्ण बाजारावर याचा परिणाम होऊ शकतो आणि यामुळे Mukesh Ambani यांच्या जियो तसेच Sunil Bharti Mittal यांच्या एयरटेलला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: Jio चा टेंशन वाढलं! BSNL नं आणला भन्नाट प्लॅन; स्वस्तात 30 दिवसांसाठी डेली 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग

How to get 5g service on 4g sim

Adani Data Networks ला मिळालं UL (AS) लायसन्स

मीडिया रिपोर्टनुसार, अदानी डेटा नेटवर्कला यूनिफाइड लायसन्स मिळालं आहे. कंपनीकडून अजूनतरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारकडून अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड (Adani Enterprises Ltd) च्या Adani Data Networks Ltd (ADNL) युनिटला संपूर्ण देशात टेलीकॉम सर्व्हिस देण्याचा अधिकार मिळाला आहे. हे जर खरं ठरलं तर येत्या काही महिन्यांमध्ये Jio, Airtel आणि Vi सोबतच Adani Sim देखील बाजारात येऊ शकतं.

3 महिने फ्री मिळू शकते 5जी सर्व्हिस

तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो भारतीय बाजारात आणली होती तेव्हा Jio 4G service अनेक महिन्यांपर्यंत मोफत देण्यात आली होती. फ्री 4जी सिम आणि मोफत 4जी डेटामुळे लोकांनी जियो सिम पटापट खरेदी केले तसेच जियो स्टोर्सवर लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. अशीच परिस्थती अदानी नेटवर्क सर्व्हिस बद्दल देखील मिळू शकते. बाजारात चर्चा आहे की जियो प्रमाणे Adani 5G service देखील काही महिने फ्री दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

6 वर्षानंतर नव्या कंपनीचं आगमन

सरकारी BSNL सोबत सध्या फक्त तीन प्रायव्हेट कंपन्या Jio, Airtel आणि Vi भारतीय बाजारात सक्रिय आहेत. वोडाफोन आणि आयडिया मिळून विआय तयार झाली आहे यातील सर्वात नवीन नाव रिलायन्स जियोचं आहे. 2016 मध्ये आलेल्या जियोला आज 6 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या सहा वर्षांमध्ये कोणतीही नवीन टेलीकॉम कंपनी भारतीय बाजारात आली नाही. लोकांकडे नवीन ऑप्शन नसल्यामुळे सर्व ऑपरेटर्सचे टॅरिफ प्लॅन्स देखील जवळपास सारखेच झाले आहेत. त्यामुळे Adani च्या रूपात नवीन टेलीकॉम कंपनी बाजारात येणं सामान्य मोबाइल युजर्ससाठी फायजेशीर ठरू शकतं. परंतु यासाठी अदानी टेलीकॉम सर्व्हिसनं व्यावसायिक रित्या सर्व्हिस देणं सुरु करण आवश्यक आहे, ज्याची अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Adani च्या कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं UL (AS) लायसन्स; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-gets-unified-license-for-full-fledge-telecom-services-in-india/feed/ 0
Adani Group देशातील 6 सर्कल्समध्ये सुरु करणार आपली 5G Services; अंबानींच्या Jio देणार टक्कर? https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-5g-service-in-india-ambani-jio-5g-plan/ https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-5g-service-in-india-ambani-jio-5g-plan/#respond Wed, 24 Aug 2022 08:45:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12432 5G Spectrum चा लिलाव पूर्ण झाला आहे आणि सर्व प्रायव्हेट टेलीकॉम ऑपरेटर्सना आपलं स्पेक्ट्रम मिळालं आहे. 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावात Jio , Airtel आणि Vi वर तर सर्वांच्या नजारा होत्या परंतु याव्यतिरिक्त ज्या नावाची जास्त चर्चा झाली ते म्हणजे Adani Group. अदानी ग्रुपच्या Adani Data Networks नं यावेळी 5जी स्पेक्ट्रम ऑक्शनमध्ये सहभागी होऊन सर्वांना धक्का दिला. […]

The post Adani Group देशातील 6 सर्कल्समध्ये सुरु करणार आपली 5G Services; अंबानींच्या Jio देणार टक्कर? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Spectrum चा लिलाव पूर्ण झाला आहे आणि सर्व प्रायव्हेट टेलीकॉम ऑपरेटर्सना आपलं स्पेक्ट्रम मिळालं आहे. 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावात Jio , Airtel आणि Vi वर तर सर्वांच्या नजारा होत्या परंतु याव्यतिरिक्त ज्या नावाची जास्त चर्चा झाली ते म्हणजे Adani Group. अदानी ग्रुपच्या Adani Data Networks नं यावेळी 5जी स्पेक्ट्रम ऑक्शनमध्ये सहभागी होऊन सर्वांना धक्का दिला. ही कंपनी आधीपासून सांगत आहे की ते रिलायन्स जियो, एयरटेल आणि विआयच्या रस्त्यात येणार नाहीत. तसेच मोबाइल युजर्सशी थेट संपर्क करणार नाहीत परंतु तरीही बाजारात चर्चा आहे की अदानी ग्रुपमुळे अंबानींवर परिणाम होईल. पुढे आम्ही अदानी डेटा नेटवर्कच्या प्लॅनची माहिती दिली आहे, ज्यामुळे अंबानी आणि रिलायन्स जियोवर त्याचा किती परिणाम होईल ते समजेल.

अदानी ग्रुपचा 5जी प्लॅन

5जी स्पेक्ट्रम लिलावात अदानी डेटा नेटवर्कनं एकूण 400 MHz Spectrum मिळवलं आहे. हे 26GHz band आहेत ज्यासाठी अदानी समूहानं 212 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्व High-band spectrum आहेत तसेच Adani Data Networks नं Low-band किंवा Mid-band मध्ये कोणतीही रुची दाखवली नाही.

आम्ही लो, मिड किंवा हाय बँड्सबाबत का बोलत आहोत, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. सामान्य लोक ज्या स्मार्टफोन्समध्ये इंटरनेट वापरतात आणि कॉलिंग इत्यादीसाठी उपयोग करतात, ते मोबाइल फोन मोठ्याप्रमाणावर मिड बँड फ्रीक्वेंसी आणि लो बँड फ्रीक्वेंसीवर काम करतात. mid-band spectrum सर्वात जास्त कन्ज्यूमर सर्व्हिससाठी यूज केला जातो. शहर आणि वस्त्यांमध्ये चांगलं सिग्नल आणि कव्हरेज देण्यासाठी या मिड बँड्सचा वापर केला जातो. परंतु अदानी समूहानं मिडबँड विकत न घेऊन आपण मोबाइल नेटवर्क सादर करणार नसल्याचं दर्शवलं आहे.

जियोचा 5जी प्लॅन

अदानी नंतर आता अंबानी बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी लिलावात सर्वात जास्त 5जी स्पेक्ट्रम मिळवलं आहे. रिलायन्स जियोनं 88,078 कोटी रुपये देऊन 24,740 MHz 5G spectrum ताब्यात घेतलं आहे. Jio च्या 5G Bands मध्ये अदानी समुहूकडे असलेला 26 GHz High frequency band तर आहेच त्याचबरोबर या कंपनीनं सर्वात शक्तिशाली व दूरवर रेंज देणारा 700 MHz 5G Band देखील मिळवला आहे.

Ambani vs Adani

वरील पॉईंट्स वाचून तुम्हाला समजलं असेल की 5G Service बद्दल सध्या तरी Adani vs Ambani अशी स्पर्धा बाजारात दिसणार नाही. अदानी डेटा नेटवर्क इंटीट्यूशनल 5जी सर्व्हिस देईल तर रिलायन्स जियो सेल्युलर 5जी सर्व्हिस देईल. त्यामुळे अदानी ग्रुपच्या 5जी सेक्टरमध्ये येण्यामुळे अंबानींच्या जियोला कोणताही धोका वाटत नाही.

परंतु येत्या काळात Adani Data Networks नं आपली योजना बदलली आणि एखाद्या टेलीकॉम ऑपरेटरशी भागेदारी केली तर Jio समोर आव्हान उभं राहू शकतं. परंतु सध्यातरी भारतातील 5जी बाजारात अशी शक्यता दिसत नाही.

The post Adani Group देशातील 6 सर्कल्समध्ये सुरु करणार आपली 5G Services; अंबानींच्या Jio देणार टक्कर? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-5g-service-in-india-ambani-jio-5g-plan/feed/ 0