Jio चा टेंशन वाढलं! BSNL नं आणला भन्नाट प्लॅन; स्वस्तात 30 दिवसांसाठी डेली 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग

BSNL 30 Days Plan: Reliance Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL ना एकत्र दोन नवीन स्वस्त आणि बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. कंपनीनं 90 दिवसांच्या रिचार्ज सोबतच 30 दिवसांचा रिचार्ज सादर केला आहे. सरकारी टेलीकॉम कंपनीच्या 30 Days Recharge Plan बद्दल बोलायचं झालं तर यात कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारखे शानदार बेनिफिट्स मिळत आहेत. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की हा कंपनीचा एक असा स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे, ज्यात युजर्सना 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक शानदार बेनिफिट्स मिळत आहेत. चला जाणून घेऊया या प्लॅनबाबत सर्वकाही.

मिळेल 30 दिवसांची वैधता

BSNL कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 269 रुपये आहे. हा 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा रिचार्ज प्लॅन, ज्यात युजर्सना 28 दिवसांच्या ऐवजी संपूर्ण 30 दिवसांची वॅलिडिटी मिळते. कंपनीनं आपल्या ट्विटर हँडलवर या प्लॅन बद्दल माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये कोणते बेनेफिट्स मिळत आहेत. हे देखील वाचा: Flying Taxi: आता उडणाऱ्या टॅक्सितून करा प्रवास; कुठेही करता येणार टेक ऑफ आणि लँडिंग, पाहा व्हिडीओ

OTT सह गेमिंगचा लाभ

या प्लॅनमध्ये Eros Now एंटरटेनमेंट, Lystn Podcast सर्व्हिस, Hardy मोबाइल गेम सर्व्हिस, Lokhdhun, Zing चं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. तसेच ग्राहक गेमिंग करत असतील तर 2 लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी देखील मिळत आहे. तसेच STV269 प्लॅनमध्ये युजर्सना 30 दिवसांपर्यंत फ्री ट्यूनची सुविधा मिळेल, जी अमर्याद वेळ बदलता येईल.

60GB डेटा आणि फ्री कॉलिंग

BSNL STV प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांची वैधता मिळेल. या वैधतेदरम्यान ग्राहकांना डेली 2GB डेटा म्हणजे एकूण 60जीबी डेटा मिळेल. तसेच प्लॅनमध्ये युजर्सना अनिलिमिटेड कॉलिंग सुविधेसह डेली 100 SMS दिले जातील. हे देखील वाचा: या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन

BSNL 5G लवकरच होईल लाँच

प्रायव्हेट कंपन्यांच्या युजर्स प्रमाणेच बीएसएनएल युजर्सना 5जी सर्व्हिस (BSNL 5G Service) साठी खूप वाट बघावी लागणार नाही. इंडिया मोबाइल कांग्रेस (आयएमसी) 2022 दरम्यान दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Telecom Min Ashwini Vaishnaw) यांनी सांगितलं की बीएसएनएल पुढील वर्षी 15 ऑगस्टच्याआसपास भारतात 5 जी सेवा देण्यास सुरुवात करेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here