Adani च्या कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं UL (AS) लायसन्स; जाणून घ्या माहिती

इंडियन टेलीकॉम मार्केटमध्ये Jio, Airtel आणि Vodafone idea (Vi) तीन प्रायव्हेट कंपन्या सक्रिय आहेत. सर्वात जास्त सब्सक्राइबर बेससह रिलायन्स जियो आघाडीवर आहे, त्यानंतर एयरटेल आणि विआयचं येतं. 5G Services भारतात सुरु झाल्यानंतर सध्या जियो आणि एयरटेलमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु आता भारतीय टेलीकॉम बाजार लवकरच बदलणार असं दिसतंय. या तिन्ही कंपन्यांसोबतच अदानी डेटा नेटवर्क या नवीन नावाचा देखील समावेश होऊ शकतो. Adani Data Networks कंपनीला UL (AS) लायसन्स मिळालं आहे त्यामुळे देशात टेलीकॉम सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये अंबानींनंतर अदानी देखील दिसू शकतात.

Adani Data Networks बद्दल मोठी बातमी समोर आली आहे की गौतम अदानी यांच्या या कंपनीला भारत सरकार कडून संपूर्ण देशात टेलीकॉम सर्व्हिस देण्याचं लायसन्स मिळालं आहे. अदानी डेटा नेटवर्क्सला यूनिफाइड लायसन्स देण्यात आलं आहे आणि आता ही कंपनी देखील Jio व Airtel प्रमाणे भारतात आपली टेलीकॉम सेवा देऊ शकेल. Adani टेलीकॉम मार्केटमध्ये आल्यामुळे संपूर्ण बाजारावर याचा परिणाम होऊ शकतो आणि यामुळे Mukesh Ambani यांच्या जियो तसेच Sunil Bharti Mittal यांच्या एयरटेलला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: Jio चा टेंशन वाढलं! BSNL नं आणला भन्नाट प्लॅन; स्वस्तात 30 दिवसांसाठी डेली 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग

How to get 5g service on 4g sim

Adani Data Networks ला मिळालं UL (AS) लायसन्स

मीडिया रिपोर्टनुसार, अदानी डेटा नेटवर्कला यूनिफाइड लायसन्स मिळालं आहे. कंपनीकडून अजूनतरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारकडून अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड (Adani Enterprises Ltd) च्या Adani Data Networks Ltd (ADNL) युनिटला संपूर्ण देशात टेलीकॉम सर्व्हिस देण्याचा अधिकार मिळाला आहे. हे जर खरं ठरलं तर येत्या काही महिन्यांमध्ये Jio, Airtel आणि Vi सोबतच Adani Sim देखील बाजारात येऊ शकतं.

3 महिने फ्री मिळू शकते 5जी सर्व्हिस

तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो भारतीय बाजारात आणली होती तेव्हा Jio 4G service अनेक महिन्यांपर्यंत मोफत देण्यात आली होती. फ्री 4जी सिम आणि मोफत 4जी डेटामुळे लोकांनी जियो सिम पटापट खरेदी केले तसेच जियो स्टोर्सवर लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. अशीच परिस्थती अदानी नेटवर्क सर्व्हिस बद्दल देखील मिळू शकते. बाजारात चर्चा आहे की जियो प्रमाणे Adani 5G service देखील काही महिने फ्री दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

6 वर्षानंतर नव्या कंपनीचं आगमन

सरकारी BSNL सोबत सध्या फक्त तीन प्रायव्हेट कंपन्या Jio, Airtel आणि Vi भारतीय बाजारात सक्रिय आहेत. वोडाफोन आणि आयडिया मिळून विआय तयार झाली आहे यातील सर्वात नवीन नाव रिलायन्स जियोचं आहे. 2016 मध्ये आलेल्या जियोला आज 6 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या सहा वर्षांमध्ये कोणतीही नवीन टेलीकॉम कंपनी भारतीय बाजारात आली नाही. लोकांकडे नवीन ऑप्शन नसल्यामुळे सर्व ऑपरेटर्सचे टॅरिफ प्लॅन्स देखील जवळपास सारखेच झाले आहेत. त्यामुळे Adani च्या रूपात नवीन टेलीकॉम कंपनी बाजारात येणं सामान्य मोबाइल युजर्ससाठी फायजेशीर ठरू शकतं. परंतु यासाठी अदानी टेलीकॉम सर्व्हिसनं व्यावसायिक रित्या सर्व्हिस देणं सुरु करण आवश्यक आहे, ज्याची अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here