BSNL 90 Days Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) नं कोणताही गाजावाजा न करता आपला नवीन 90 Days Plan सादर केला आहे. कंपनीनं फेस्टिवल सीजनसाठी STV769 रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) लाँच केला आहे. प्लॅनची खासियत म्हणजे यात कॉलिंग आणि डेटा सोबतच एंटरटेनमेंट आणि गेमिंगची मजा देखील ग्राहकांना मिळेल. प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स पाहता ह्याची टक्कर प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी जियो (Jio) च्या 749 रुपये आणि एयरटेल (Airtel) च्या 779 रुपयांच्या रिचार्जशी होईल. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये मिळणारे सर्व बेनिफिट्स सविस्तर.
प्लॅनची किंमत
BSNL नं आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून STV769 प्लॅनची माहिती दिली आहे. कंपनीचा 769 रुपयांच्या हा प्लॅन एक खास रिचार्ज प्लॅन आहे. त्यामुळे हा सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध होईलच असं नाही. ग्राहक BSNL च्या वेबसाइटवरून रिचार्ज करू शकतात. या प्लॅनमध्ये गेमिंगचा आनंद घेता येईल. यासाठी ग्राहकांना games.challengesarena.com वर विजिट करावे लागेल. हे देखील वाचा: Samsung चे 5 सर्वात स्वस्त Mobile Phone, फक्त 1400 रुपयांपासून सुरु होते किंमत!
90 दिवसांची वैधता
एकीकडे इतर प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या तीन महिन्यांच्या नावाखाली 84 दिवसांची वैधता ऑफर करत आहेत. तर दुसरीकडे सरकारी कंपनी BSNL च्या या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता दिली जात आहे. म्हणजे प्लॅनमध्ये मिळणारे सर्व लाभ युजर्सना 90 दिवस वापरता येतील.
180GB डेटा आणि फ्री कॉलिंग
BSNL STV प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळेल. या वैधतेदरम्यान ग्राहकांना डेली 2GB डेटा म्हणजे एकूण 180 जीबी डेटा मिळेल. तसेच प्लॅनमध्ये युजर्सना अनिलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. म्हणजे ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याची मर्यादेविना कॉलिंग करू शकतात. त्याचबरोबर डेली 100 SMS देखील मोफत दिले जातात. हे देखील वाचा: एकच नंबर! रेडमी-रियलमीच्या अडचणी वाढल्या; 7 हजारांच्या बजेटमध्ये नवीन Lava फोन लाँच
ओटीटीसह गेमिंगची मजा
या प्लॅनमध्ये कॉलिंग, वैधता, एसएमएस आणि डेटा व्यतिरिक्त Eros Now एंटरटेनमेंट, Lystn Podcast सर्व्हिस, Hardy मोबाइल गेम सर्व्हिस, Lokhdhun, Zing चं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. तसेच ग्राहकांना गेमिंग आवडत असल्यास 2 लाख रुपयांचे बक्षीस देखील जिंकता येईल. STV769 प्लॅन युजर्सना 90 दिवसांपर्यंत फ्री ट्यूनची सुविधा मिळेल, जी कधीही बदलता येते, ट्यून बदलण्यावर कोणतीही मर्यादा नाही.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.