Airtel Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 Oct 2018 13:41:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/#respond Thu, 11 Oct 2018 13:41:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2456 साधारणतः वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह येतात पण या प्लान मध्ये कोणतीही दैनिक किंवा साप्ताहिक मर्यादा देण्यात आली नाही.

The post जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात दूरसंचार कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेचा फायदा सामन्यांना होत आहे. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपन्या असे प्लान्स घेऊन येत आहेत ज्यांची किंमत कमी आणि त्यातील फायदे जास्त आहेत.याच हेतूने एयरटेल ने पण आपल्या यूजर्स साठी पण नवीन प्लान सादर केला आहे. एयरटेल ने आणलेला हा नवीन प्लान 398 रुपयांचा आहे जो जास्त वॅलिडिटी सह अनलिमिटेड वॉयस कॉल आणि भरपूर इंटरनेट बेनिफिट देतो.

एयरटेल द्वारा लॉन्च करण्यात आलेला 398 रुपयांचा हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्लान 70 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता कंपनी कडून ग्राहकांना रोज 1.5जीबी इंटरनेट डेटा देण्यात येईल. अशा प्रकारे संपूर्ण प्लान मध्ये एकूण 105जीबी इंटरनेट डेटा मिळेल. या डेटाचा वापर 4जी सोबतच 3जी वर पण करता येईल.

त्याचबरोबर एयरटेल 398 रुपयांच्या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा पण देत आहे. साधारणतः वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह येतात पण या प्लान मध्ये कोणतीही दैनिक किंवा साप्ताहिक मर्यादा देण्यात आली नाही. एयरटेल ग्राहक लोकल व एसटीडी प्रत्येक नंबर वर अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण पूर्णपणे फ्री असतील. तसेच एयरटेल 70 दिवस रोज 90 एसएमएस पण देईल.

विशेष म्हणजे 398 रुपयांच्या प्लानच्या आधी एयरटेल ने 399 रुपयांचा पण एक प्लान सादर केला आहे. हा प्लान 84 दिवसांच्या वैधते सह येतो. पण या प्लान मध्ये इंटरनेट डेटा 1.4जीबी प्रतिदिन मिळत आहे. तसेच रोज मिळणारे एसएमएस 100 आहेत. अर्थात हा प्लान वॅलिडिटी एसएसएस बेनिफिट मध्ये जरी पुढे असला तरी इंटरनेट डेटाच्या बाबतीती मागे आहे.

The post जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/feed/ 0
एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 06:45:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2391 रिलायंज जियोच्या एंट्री मुळे इंडियन टेलीकॉम बाजार पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त डेटा पॅक्स मुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे तसेच सामन्य माणसांसाठी वॉयस कॉलिंग जणू मोफत झाली आहे. बाजारात असे प्लान आहेत ज्यात इंटरनेट डेटा, एसएमएस आणि वॉयस कॉलिंग एक साथ मिळतात. एक वेळ होती जेव्हा इन​कमिंग कॉलचे पण पैसे द्यावे लागत होते. पण आता इनकमिंग […]

The post एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंज जियोच्या एंट्री मुळे इंडियन टेलीकॉम बाजार पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त डेटा पॅक्स मुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे तसेच सामन्य माणसांसाठी वॉयस कॉलिंग जणू मोफत झाली आहे. बाजारात असे प्लान आहेत ज्यात इंटरनेट डेटा, एसएमएस आणि वॉयस कॉलिंग एक साथ मिळतात. एक वेळ होती जेव्हा इन​कमिंग कॉलचे पण पैसे द्यावे लागत होते. पण आता इनकमिंग कॉल सोबत आउटगोइंग कॉल पण फ्री झाले आहेत. पण असे असताना एयरटेल ने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. एयरटेल ने असे काही दिशा-निर्देश लागू केले आहेत ज्यामुळे एयरटेल यूजर्सची फ्री इन​कमिंग बंद होऊ शकते.

एयरटेल सोबत देशातील सर्वच कंपन्यांनी इनकमिंग कॉल फ्री ठेवल्या आहेत. म्हणजे कोणत्याही रिचार्ज विना यूजर कमीत कमी इनकमिंग कॉल रिसीव करू शकतात. पण आता एयरटेल यूजर्सची ही फ्री ची सुविधा संपणार आहे. अशी माहिती मिळाली आहे की एयरटेल कंपनी आपली फ्री इनकमिंग बंद करणार आहे. ही फ्री इनकमिंग कॉल बंद होण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इन​कमिंग साठी ​​पैसे द्यावे लागतील. पण जर तुम्ही एका महिन्यासाठी तुमच्या फोन नंबर वर कोणताही रिचार्ज केला नाही तर त्या नंबरची इनकमिंग सर्विस बंद केली जाईल.

एयरटेल यूजर्सना 28 दिवसांतून कमीत कमी 20 रुपयांचा एक रिचार्ज करावा लागेल. या रिचार्ज ने तुमचा नंबर चालू राहील आणि तुम्ही इन​कमिंग सोबत आउटगोइंग कॉल व इंटरनेटचा वापर करू शकाल. जर 28 दिवसांत एयरटेल यूजर्सनी आपल्या नंबर वर कोणताही रिचार्ज केला नाही तर त्या नंबर वर येणारे वॉयस कॉल बंद केले जातील. फक्त एवढेच नाही तर काही ठरावीक काळा नंतर एयरटेल तो नंबर कायमस्वरूपी सस्पेंड म्हणजे बॅन करेल.

एयरटेल ने हे निर्देश आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. हा नियम आल्यामुळे दोन​ ​नंबर वापरणाऱ्या लोकांची अडचण होईल. कारण अनेक यूजर आपल्या फोन मध्ये दोन नंबर ठेवतात. एक नंबर वरून इंटरनेट वापरली वापरली जाते आणि त्याच इंटरनेट ने व्हाट्सॅप व अन्य वॉयस तसेच वीडियो कॉल केले जातात. तर दुसरा नंबर फक्त कॉल रिसीव करण्यासाठी ठेवला जातो.

पण आता एयरटेल चे नवीन नियम आल्यामुळे लोकांना दोन्ही नंबर्स वर रिचार्ज करावा लागेल. विशेष म्हणजे एयरटेल च्या आधी रिलायंस जियो ने पण हा नियम आणला आहे. जियो ने निर्देश दिले आहेत ज्यात यूजर्सना आपल्या नंबर वर न्यूनतम रिचार्ज करणे अनिवार्य आहे.

The post एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/feed/ 0
एयरटेल घेऊन आला 168 दिवस वॅलिडिटी वाला दमदार प्लान, संपूर्ण देशात करता येईल अनलिमिटेड कॉलिंग, 10जीबी डाटा सह मिळतील 16,800एसएसएम https://www.91mobiles.com/marathi/airtel-offer-rs-597-plan-for-168-days-unlimited-voice-call-10gb-4g-data-16800-sms-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-offer-rs-597-plan-for-168-days-unlimited-voice-call-10gb-4g-data-16800-sms-in-marathi/#respond Mon, 18 Jun 2018 08:09:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=935 एयरटेल च्या या प्लान मध्ये 168 दिवसांसाठी संपूर्ण देशात अनलिमिटेड कॉल अगदी मोफत करता येतील आणि हे कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील.

The post एयरटेल घेऊन आला 168 दिवस वॅलिडिटी वाला दमदार प्लान, संपूर्ण देशात करता येईल अनलिमिटेड कॉलिंग, 10जीबी डाटा सह मिळतील 16,800एसएसएम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने काही दिवसांपूर्वी 558 रुपयांचा प्री-पेड प्लान सादर केला होता ज्यात यूजर्सना 82 दिवसांसाठी रोज 3जीबी इंटरनेट डाटा दिला जात आहे. या प्लान मध्ये ग्राहकांना एकूण 246जीबी डाटा मिळतो. भरपूर डाटा वाल्या या प्लान च्या काही दिवसांनी आज कंपनी ने अजून एक नवीन प्लान सादर केला आहे जो यूजर्सना दीर्घकाळासाठी बेनिफिट देतो. एयरटेल कडून 597 रुपयांचा प्लान सादर करण्यात आला आहे जो 168 ​दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो.

एयरटेल ने सादर केलेला 597 रुपयांचा प्लान प्री-पेड ग्राहकांसाठी आहे. हा प्लान 168 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. एयरटेल ने हा प्लान एका वॉयस प्लान च्या रुपात सादर केला आहे जो जास्त अवधी साठी फ्री कॉलिंग ची सुविधा देतो. एयरटेल च्या या प्लान मध्ये 168 दिवसांसाठी फ्री वॉयस कॉल ची सुविधा मिळते. हे वॉयस कॉल लोकल व एसटीडी मध्ये आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क दोन्ही वर वापरता येतात.

एयरटेल च्या या प्लान मध्ये 168 दिवसांसाठी संपूर्ण देशात अनलिमिटेड कॉल अगदी मोफत करता येतील आणि हे कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील. वॉयस कॉल सह या प्लान मध्ये यूजर्सना 168 दिवसांसाठी रोज 100एसएमएस पण मिळतील. म्हणजे संपूर्ण प्लान मध्ये एकूण 16,800एसएमएस मिळतील. वॉयस कॉल आणि एसएमएस सह एयरटेल या प्लान मध्ये 10जीबी इंटरनेट चा लाभ पण देत आहे. कंपनी तर्फे पुर्ण प्लान च्या वैधते साठी एकूण 10जीबी 4जी इंटरनेट डाटा दिला जात आहे.

विशेष म्हणजे आत्ताच एयरटेल ने 99 रुपयांच्या प्लान मधील डाटा डबल केला आहे. हा प्लान एक प्रीपेड प्लान आहे हैजो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. एयरटेल या प्लान मध्ये आधी रोज 1जीबी इंटरनेट डाटा देत होती त्या जागी आता कंपनी रोज 2जीबी 4जी डाटा देत आहे. या मुळे ग्राहकांना प्लान मध्ये एकूण 56जीबी 4जी डाटा मिळेल जो 28 दिवस चालेल.

The post एयरटेल घेऊन आला 168 दिवस वॅलिडिटी वाला दमदार प्लान, संपूर्ण देशात करता येईल अनलिमिटेड कॉलिंग, 10जीबी डाटा सह मिळतील 16,800एसएसएम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-offer-rs-597-plan-for-168-days-unlimited-voice-call-10gb-4g-data-16800-sms-in-marathi/feed/ 0
82 दिवसांसाठी रोज 3जीबी 4जी डाटा देत आहे एयरटेल, लॉन्च केला हा धमाकेदार प्लान https://www.91mobiles.com/marathi/airtel-558-prepaid-recharge-plan-3gb-data-per-day-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-558-prepaid-recharge-plan-3gb-data-per-day-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 08:18:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=853 एयरटेल यूजर्स माय एयरटेल अॅप वर जाऊन या प्लान ची उपलब्धता जाणून घेऊ शकतात.

The post 82 दिवसांसाठी रोज 3जीबी 4जी डाटा देत आहे एयरटेल, लॉन्च केला हा धमाकेदार प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एयरटेल ने भारतीय टेलीकॉम बाजारातील स्मार्टफोन यूजर्सना आपल्या नेटवर्क सोबत जोडण्यासाठी आपल्या 28 दिवसांची वॅलिडिटी असणार्‍या 149 रुपयांच्या प्लान मध्ये बदल केले आहेत. यात 1जीबी ऐवजी आता 2जीबी डाटा मिळेल. या अपडेट नंतर लगेचच एयरटेल ने जास्त वॅलिडिटी हवी असणार्‍या यूजर्स साठी पण एक खुपच शानदार प्लान सादर केला आहे. एयरटेल ने 82 दिवसांच्या वैधता असलेला प्लान आणला आहे जो रोज 3जीबी 4जी इंटरनेट डाटा देईल.

एयरटेल ने 558 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. हा प्लान फक्त प्री-पेड ग्राहकांसाठी आहे. असे यूजर ज्यांना जास्त वॅलिडिटी वाले प्लान हवे आहेत आणि जास्त डाटा वापरतात, त्यांच्यासाठी एयरटेल चा हा प्लान खूपच चांगली आॅफर ठरू शकते. एयरटेल चा हा प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान मध्ये रोज 3जीबी 4जी इंटरनेट डाटा मिळेल.

3जीबी डाटा रोज या हिशोबाने एयरटेल यूजर्सना 82 दिवसांसाठी एकूण 246जीबी 4जी डाटा मिळेल. इंटरनेट डाटा व्यतिरिक्त अन्य सेवा पाहता एयरटेल या प्लान अंतर्गत 82 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉलिंग ची सुविधा देत आहे. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील. त्याचबरोबर एयरटेल यूजर्सना 82 दिवस रोज 100 एसएमएस पण मिळतील.

एयरटेल ने हा नवीन प्लान सध्य काही निवडक सर्कल्स मध्ये सादर केला आहे जो काही दिवसांमध्ये संपूर्ण देशात रोलआउट केला जाईल. एयरटेल यूजर्स माय एयरटेल अॅप वर जाऊन या प्लान ची उपलब्धता जाणून घेऊ शकतात. अजून एक बातमी म्हणजे प्रतिदिन 3जीबी डाटा सह एयरटेल ने आपला जुना 349 रुपयांचा प्लान पण अपडेट केला आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो.

The post 82 दिवसांसाठी रोज 3जीबी 4जी डाटा देत आहे एयरटेल, लॉन्च केला हा धमाकेदार प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-558-prepaid-recharge-plan-3gb-data-per-day-in-marathi/feed/ 0
एयरटेल देत आहे जियो पेक्षा मोठी आॅफर, 149 रुपयांमध्ये मिळेल 56जीबी 4जी डाटा आणि वॉयस कॉल मोफत https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs149-plan-offer-2gb-data-per-day-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs149-plan-offer-2gb-data-per-day-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 06:14:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=850 हा पॅक कोणत्याही प्लान च्या वॅलिडिटी सोबत जोडला जातो आणि त्या प्लान मध्ये रोज 1जीबी अतिरिक्त डाटा देतो.

The post एयरटेल देत आहे जियो पेक्षा मोठी आॅफर, 149 रुपयांमध्ये मिळेल 56जीबी 4जी डाटा आणि वॉयस कॉल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी सध्या आपल्या यूजर्स साठी एका पेक्षा एक प्लान सादर करत आहे. कुठे ना कुठे तरी सर्वांना माहिती आहे की हे चांगले प्लान्स आणून कंपनी बाजारातील स्पर्धेत टिकून राहू इच्छिते. बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी एयरटेल काही दिवसांपूर्वी 193 रुपयांचा स्पेशल पॅक सादर केला होता तर आता कपंनी ने आपल्या जुन्या 149 रुपयांचा प्लान अपडेट केला आहे.

एयरटेल चा 149 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वैधता सह येतो. या प्लान मध्ये आधी रोज 1जीबी डाटा मिळत होता पण अपडेट नंतर ग्राहकांना 2जीबी डाटा प्रतिदिन मिळेल. म्हणजे जिथे आधी एकूण 28जीबी डाटा मिळत होता तिथे आता 56जीबी डाटा मिळेल. डाटा सह अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल मिळतील तसेच रोज 100एसएमएस पण मिळतील.

एयरटेल चा 193 रुपयांचा प्लान एक अॅड आॅन पॅक आहे. हा पॅक कोणत्याही प्लान च्या वॅलिडिटी सोबत जोडला जातो आणि त्या प्लान मध्ये रोज 1जीबी अतिरिक्त डाटा देतो. जर एयरटेल कस्टमर कडे 28 दिवस वॅलिडिटी वाला प्लान आहे ज्यात रोज 1 जीबी डाटा मिळत आहे, त्या प्लान सोबत 193 रुपयांचा अॅड आॅन पॅक घेतल्यास 28 दिवसांसाठी रोज 2जीबी डाटा मिळायला सुरवात होईल.

त्याचप्रमाणे ग्राहकांनी एयरटेल चा 509 रुपयांचा प्लान घेतला असेल जो 90 दिवसांसाठी 1.4जीबी डाटा प्रतिदिन देत असेल आणि या प्लान सोबत 193 रुपयांचा अॅड आॅन पॅक घेतला गेल्यास कस्टमरला 90 दिवसांसाठी रोज 2.4जीबी 4जी डाटा मिळणे सुरू होईल.

The post एयरटेल देत आहे जियो पेक्षा मोठी आॅफर, 149 रुपयांमध्ये मिळेल 56जीबी 4जी डाटा आणि वॉयस कॉल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs149-plan-offer-2gb-data-per-day-in-marathi/feed/ 0