एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

रिलायंज जियोच्या एंट्री मुळे इंडियन टेलीकॉम बाजार पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त डेटा पॅक्स मुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे तसेच सामन्य माणसांसाठी वॉयस कॉलिंग जणू मोफत झाली आहे. बाजारात असे प्लान आहेत ज्यात इंटरनेट डेटा, एसएमएस आणि वॉयस कॉलिंग एक साथ मिळतात. एक वेळ होती जेव्हा इन​कमिंग कॉलचे पण पैसे द्यावे लागत होते. पण आता इनकमिंग कॉल सोबत आउटगोइंग कॉल पण फ्री झाले आहेत. पण असे असताना एयरटेल ने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. एयरटेल ने असे काही दिशा-निर्देश लागू केले आहेत ज्यामुळे एयरटेल यूजर्सची फ्री इन​कमिंग बंद होऊ शकते.

एयरटेल सोबत देशातील सर्वच कंपन्यांनी इनकमिंग कॉल फ्री ठेवल्या आहेत. म्हणजे कोणत्याही रिचार्ज विना यूजर कमीत कमी इनकमिंग कॉल रिसीव करू शकतात. पण आता एयरटेल यूजर्सची ही फ्री ची सुविधा संपणार आहे. अशी माहिती मिळाली आहे की एयरटेल कंपनी आपली फ्री इनकमिंग बंद करणार आहे. ही फ्री इनकमिंग कॉल बंद होण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इन​कमिंग साठी ​​पैसे द्यावे लागतील. पण जर तुम्ही एका महिन्यासाठी तुमच्या फोन नंबर वर कोणताही रिचार्ज केला नाही तर त्या नंबरची इनकमिंग सर्विस बंद केली जाईल.

एयरटेल यूजर्सना 28 दिवसांतून कमीत कमी 20 रुपयांचा एक रिचार्ज करावा लागेल. या रिचार्ज ने तुमचा नंबर चालू राहील आणि तुम्ही इन​कमिंग सोबत आउटगोइंग कॉल व इंटरनेटचा वापर करू शकाल. जर 28 दिवसांत एयरटेल यूजर्सनी आपल्या नंबर वर कोणताही रिचार्ज केला नाही तर त्या नंबर वर येणारे वॉयस कॉल बंद केले जातील. फक्त एवढेच नाही तर काही ठरावीक काळा नंतर एयरटेल तो नंबर कायमस्वरूपी सस्पेंड म्हणजे बॅन करेल.

एयरटेल ने हे निर्देश आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. हा नियम आल्यामुळे दोन​ ​नंबर वापरणाऱ्या लोकांची अडचण होईल. कारण अनेक यूजर आपल्या फोन मध्ये दोन नंबर ठेवतात. एक नंबर वरून इंटरनेट वापरली वापरली जाते आणि त्याच इंटरनेट ने व्हाट्सॅप व अन्य वॉयस तसेच वीडियो कॉल केले जातात. तर दुसरा नंबर फक्त कॉल रिसीव करण्यासाठी ठेवला जातो.

पण आता एयरटेल चे नवीन नियम आल्यामुळे लोकांना दोन्ही नंबर्स वर रिचार्ज करावा लागेल. विशेष म्हणजे एयरटेल च्या आधी रिलायंस जियो ने पण हा नियम आणला आहे. जियो ने निर्देश दिले आहेत ज्यात यूजर्सना आपल्या नंबर वर न्यूनतम रिचार्ज करणे अनिवार्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here