एयरटेल घेऊन आला 168 दिवस वॅलिडिटी वाला दमदार प्लान, संपूर्ण देशात करता येईल अनलिमिटेड कॉलिंग, 10जीबी डाटा सह मिळतील 16,800एसएसएम

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने काही दिवसांपूर्वी 558 रुपयांचा प्री-पेड प्लान सादर केला होता ज्यात यूजर्सना 82 दिवसांसाठी रोज 3जीबी इंटरनेट डाटा दिला जात आहे. या प्लान मध्ये ग्राहकांना एकूण 246जीबी डाटा मिळतो. भरपूर डाटा वाल्या या प्लान च्या काही दिवसांनी आज कंपनी ने अजून एक नवीन प्लान सादर केला आहे जो यूजर्सना दीर्घकाळासाठी बेनिफिट देतो. एयरटेल कडून 597 रुपयांचा प्लान सादर करण्यात आला आहे जो 168 ​दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो.

एयरटेल ने सादर केलेला 597 रुपयांचा प्लान प्री-पेड ग्राहकांसाठी आहे. हा प्लान 168 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. एयरटेल ने हा प्लान एका वॉयस प्लान च्या रुपात सादर केला आहे जो जास्त अवधी साठी फ्री कॉलिंग ची सुविधा देतो. एयरटेल च्या या प्लान मध्ये 168 दिवसांसाठी फ्री वॉयस कॉल ची सुविधा मिळते. हे वॉयस कॉल लोकल व एसटीडी मध्ये आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क दोन्ही वर वापरता येतात.

एयरटेल च्या या प्लान मध्ये 168 दिवसांसाठी संपूर्ण देशात अनलिमिटेड कॉल अगदी मोफत करता येतील आणि हे कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील. वॉयस कॉल सह या प्लान मध्ये यूजर्सना 168 दिवसांसाठी रोज 100एसएमएस पण मिळतील. म्हणजे संपूर्ण प्लान मध्ये एकूण 16,800एसएमएस मिळतील. वॉयस कॉल आणि एसएमएस सह एयरटेल या प्लान मध्ये 10जीबी इंटरनेट चा लाभ पण देत आहे. कंपनी तर्फे पुर्ण प्लान च्या वैधते साठी एकूण 10जीबी 4जी इंटरनेट डाटा दिला जात आहे.

विशेष म्हणजे आत्ताच एयरटेल ने 99 रुपयांच्या प्लान मधील डाटा डबल केला आहे. हा प्लान एक प्रीपेड प्लान आहे हैजो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. एयरटेल या प्लान मध्ये आधी रोज 1जीबी इंटरनेट डाटा देत होती त्या जागी आता कंपनी रोज 2जीबी 4जी डाटा देत आहे. या मुळे ग्राहकांना प्लान मध्ये एकूण 56जीबी 4जी डाटा मिळेल जो 28 दिवस चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here