Amazon Prime - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Apr 2023 10:07:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/#respond Thu, 27 Apr 2023 10:07:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20525 Amazon नं आपल्या भारतीय युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या Prime Membership ची किंमत वाढवली आहे आणि आपल्या सर्व्हिसेज महाग केल्या आहेत. याआधी डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वार्षिक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि आता कंपनीनं आपल्या मासिक प्लॅनचा रेट देखील वाढवला आहे. नवीन किंमतीनंतर Prime Video वर चित्रपट व वेब सीरीज बघणं […]

The post Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Amazon Prime Membership महागली आहे.
  • 1 महिना आणि 3 महिन्यांच्या प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे.
  • Prime Video वर फिल्म व सीरीज पाहणं महाग झालं आहे.

Amazon नं आपल्या भारतीय युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या Prime Membership ची किंमत वाढवली आहे आणि आपल्या सर्व्हिसेज महाग केल्या आहेत. याआधी डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वार्षिक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि आता कंपनीनं आपल्या मासिक प्लॅनचा रेट देखील वाढवला आहे. नवीन किंमतीनंतर Prime Video वर चित्रपट व वेब सीरीज बघणं महाग होईल.

किती महागले अ‍ॅमेझॉन प्राइम प्लॅन्स

नवीन अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅन प्राइस

  • Monthly Prime (1 महिना) = 299 रुपये
  • Quarterly Prime (3 महिने) = 599 रुपये
  • Annual Prime Lite (12 महिने) = 999 रुपये
  • Annual Prime (12 महिने) = 1499 रुपये

हे देखील वाचा: Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड

जुना अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅन प्राइस

  • Monthly Prime (1 महिना) = 179 रुपये
  • Quarterly Prime (3 महिने) = 459 रुपये
  • Annual Prime Lite (12 महिने) = 999 रुपये
  • Annual Prime (12 महिने) = 1499 रुपये

अ‍ॅमेझॉननं मासिक आणि तिमाही प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 1 महिना वैधता असलेला मासिक प्लॅन आधी 179 रुपयांचा होता जो आता 299 रुपयांचा झाला आहे. तर 3 महिन्यांच्या तिमाही प्लॅनची किंमत आधी 459 रुपये होती ती आता दरवाढीनंतर वाढून 599 रुपये झाली आहे. Amazon Prime च्या वार्षिक प्लॅनची किंमत मात्र बदलण्यात आली नाही. हे देखील वाचा: आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप मधील फायदे

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपमध्ये प्राइम शिपिंगचा फायदा मिळतो. तसेच प्राइम व्हिडीओवर वेब सीरिज आणि चित्रपट बघता येतात. प्राइम म्युजिकच्या माध्यमातून जाहिरातरहित गाणी ऐकता येतात. तसेच प्राइम मेंबर्ससाठी खास डील्स आणि ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स, प्राइम गेमिंग, प्राइम रिडींग आणि अ‍ॅमेझॉन फॅमिलीचे बेनिफिट्स मिळतात.

The post Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/feed/ 0
मोफत मजा ठरू शकते सजा, हे मेसेज चुकूनही उघडू नका https://www.91mobiles.com/marathi/delhi-police-warns-do-not-open-amazon-netflix-free-links-on-whatsapp/ https://www.91mobiles.com/marathi/delhi-police-warns-do-not-open-amazon-netflix-free-links-on-whatsapp/#respond Mon, 26 Apr 2021 12:52:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10702 दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम यूनिटने ट्वीटमध्ये इंटरनेट युजर्सना म्हटले आहे कि त्यांनी अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये आणि त्याचबरोबर या व्हाट्सअ‍ॅपवर एकमेकांशी शेयर पण करू नये.

The post मोफत मजा ठरू शकते सजा, हे मेसेज चुकूनही उघडू नका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp वर सध्या एक मेसेज वेगाने वायरल होत आहे, ज्यात Amazon Prime video आणि Netflix सारख्या व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर फ्री अ‍ॅक्सेसचा दावा केला जात आहे. पण या मेसेजपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे कारण फ्रीची मजा तुमच्यासाठी सजा बानू शकते. अशाप्रकारच्या लिंक नकली आहेत ज्या वेगाने व्हाट्सअ‍ॅपवर वायरल होत आहेत. तर, काही लोक कोणताही विचार न करता या लिंकवर क्लिक पण करतात आणि हा मेसेज पुढे इतरांना पाठवून देतात. लक्षात असू द्या कि अश्याप्रकारच्या मेसेजमधील लिंक तुमच्या बॅंकिंग डिटेलसह अनेक डेटा चोरू शकतात. फक्त लिंकवर क्लिक करताच तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर येता आणि आणि तुमच्या लक्षात येईस्तोवर उशीर झालेला असतो. अश्या केसेस बघून अश्याप्रकरच्या लिंकपासून सावधान राहण्यासाठी Delhi Police Cybercrime ने अलर्ट जारी केला आहे. (Delhi Police warns do not open Amazon Netflix free links on Whatsapp)

अलर्ट काय आहे

दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम यूनिटने ट्वीटमध्ये इंटरनेट युजर्सना म्हटले आहे कि त्यांनी अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये आणि त्याचबरोबर या व्हाट्सअ‍ॅपवर एकमेकांशी शेयर पण करू नये. यात सांगण्यात आले आहे कि अश्या लिंक अनेक नकली मेसेजसह पाठवण्यात येतात त्यामुळे त्यांना ब्लॉक केले पाहिजे.

DCP सायबर क्राइमच्या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे कि ‘अश्या मेसेजमध्ये URL किंवा लिंक असते, जी अनेक अँटीवायरस इंजनद्वारे फसवणूक असल्याचे सांगण्यात आले आहे. लिंक ब्लॉक करण्यात आली आहे. सावधान रहा आणि अश्या लिंकवर कधीही क्लिक करू नका आणि असा मेसेज पुढे पाठवू नका.’

वायरल मेसेजची ओळख

* ट्विटर पोस्टमध्ये अश्या अनेक मेसेजचे स्क्रीनशॉट पण शेयर केले गेले आहेत जे युजर्सना व्हाट्सअ‍ॅपवर आले आहेत. या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे कि 60 दिवसांसाठी म्हणजे दोन महिन्यांसाठी Amazon Premium मोफत मिळत आहे.

* जर अश्या प्रकारचे मेसेज लक्ष देऊन वाचले तर या नकली मेसेजची ओळख सहज पटू शकते. कारण यात Amazon Prime च्या ऐवजी Amazon Premium लिहिण्यात आले आहे.

* शेयर केल्या गेलेल्या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे कि युजर्सच्या क्रेडिट कार्डची माहिती, पासवर्ड, फोटो आणि मेसेज सारखी खाजगी माहिती चोरी करण्याच्या प्रयत्नात असे मेसेज पाठवले जात आहेत.

hacker

मोफतची हाव पडू शकते महागात

ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या केसेस पाहता युजर्सना हा सल्ला दिला जात आहे कि या फ्री ऑफर देणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये आणि असा मेसेज आल्यावर सावध रहा. अश्या मेसेजची माहिती त्वरित पोलीस आणि सायबर क्राइमला द्यावी.

The post मोफत मजा ठरू शकते सजा, हे मेसेज चुकूनही उघडू नका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/delhi-police-warns-do-not-open-amazon-netflix-free-links-on-whatsapp/feed/ 0
फक्त 129 रुपयांमध्ये मिळेल अमेजॉन प्राइम मेंबरशिप, स्मार्टफोंस वर मिळेल सूट आणि 24 तासांत होईल डिलीवरी https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-membership-monthly-subscription-rs-129-launched-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-membership-monthly-subscription-rs-129-launched-in-marathi/#respond Fri, 22 Jun 2018 11:10:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1020 विशेष म्हणजे शॉपिंग मधील सूट सोबत अमेजॉन प्राइम मेंबर्सना प्राइम वीडियो बघण्याची आणि म्यूजिक ऐकण्याची सुविधा पण मिळते.

The post फक्त 129 रुपयांमध्ये मिळेल अमेजॉन प्राइम मेंबरशिप, स्मार्टफोंस वर मिळेल सूट आणि 24 तासांत होईल डिलीवरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सध्या भारतात खुप प्रसिद्ध आहे. भरपुर अशे शानदार स्मार्टफोन आहेत जे फक्त अमेजॉन वरून एक्सक्लूसिव विकत घेता येतात. वेळोवेळी सेल सुरू करून अमेजॉन आपल्या यूजर्सना चांगल्या डील्स व आर्कषक डिस्काउंट वर स्मार्टफोन, गॅजेट्स तसेच अन्य सामान विकत घेण्याची संधी देतो. अमेजॉन च्या अशा सेल मध्ये अमेजॉन प्राइम मेंबर्सना एक्स्ट्रा फायदे मिळतात. हे फायदे प्रत्येक व्यक्ति पर्यंत पोहोचविण्यासाठी या ई कॉमर्स साइट ने अमेजॉन प्राइम मेंबरशिप मासिक वॅलिडिटी सह सादर केली आहे.

सर्वात आधी हे लक्षात घ्या की अमेजॉन प्राइम मेंबर असण्याचे भरपूर फायदे आहेत जर तुम्ही अमेजॉन वरून शॉपिंग करत असाल आणि काही विकत घेत असाल तर. साधारणतः अमेजॉन कोणत्याही स्मार्टफोन ची डिलीवरी करण्यास 4 ते 5 दिवसांचा वेळ घेते. पण प्राइम मेंबर्सना तोच स्मार्टफोन 24 तासांमध्ये डिलीवरी केला जातो. अशा प्रकारे प्राइम मेंबर्सना अन्य यूजर्स पेक्षा जास्त डिस्काउंट, सूट व आॅफर्स पण मिळतात.

अमेजॉन ची प्राइम मेंबरशिप आता पर्यंत 1 वर्षासाठीच देण्यात येत होती. यूजर्सना 1 वर्षाची ही प्राइम मेंबरशिप मिळण्यासाठी 999 रुपये द्यावे लागत होते. पण आता अमेजॉन ने प्राइम मेंबरशिप 1 महीनच्या अवधी साठी पण सादर केली आहे. आता फक्त 129 रुपये देऊन अमेजॉन ची प्राइम मेंबरशिप मिळवता येईल. ही मेंबरशिप त्या लोकांसाठी खुप फायदेशीर ठरेल जे 2-3 महिन्यातून एकदा शॉपिंग करतात आणि एक साथ भरपूर सामान विकत घेतात.

विशेष म्हणजे शॉपिंग मधील सूट सोबत अमेजॉन प्राइम मेंबर्सना प्राइम वीडियो बघण्याची आणि म्यूजिक ऐकण्याची सुविधा पण मिळते. अमेजॉन प्राइम वर शेकडो मूवीज व शो आहेत जे मेंबरशिप मुळे फ्री मध्ये बघता येतील. भारतात अमेजॉन प्राइम जुलै 2016 मध्ये आली होती. सुरवातीला हिची प्रमोशनल किंमत 499 रुपये प्रति वर्ष होती जी आता 999 रुपये आहे. तर अमेरिकेत अमेजॉन प्राइम च्या 1 वर्षासाठी यूजर्सना 8,000 रुपयांच्या आसपास द्यावे लागतात.

The post फक्त 129 रुपयांमध्ये मिळेल अमेजॉन प्राइम मेंबरशिप, स्मार्टफोंस वर मिळेल सूट आणि 24 तासांत होईल डिलीवरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-membership-monthly-subscription-rs-129-launched-in-marathi/feed/ 0