Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड

Highlights

 • रियलमी आपल्या सी-सीरीजमध्ये एक नवीन फोन लाँच करण्याची योजना बनवत आहे.
 • फोनमध्ये 33वॉट सुपरवोक सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.
 • कंपनीनं गेल्या महिन्यात बाजारात रियलमी सी55 सादर केला होता.

रियलमी आपल्या सी-सीरीजचा नवीन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, चीनी मोबाइल निर्माता लवकरच Realme C53 स्मार्टफोन सादर करू शकते. एका रिपोर्टमध्ये आगामी फोनच्या एनबीटीसी सर्टिफिकेशनची माहिती मिळाला आहे. लिस्टिंगमध्ये फोनचा मॉडेल नंबर RMX3760 सह दिसला आहे.

याआधी हा मॉडेल नंबर असलेला हँडसेट फेडरल कम्युनिकेशंस कमिशन (FCC), युरोपच्या एनर्जी एफिशिएंसी सर्टिफिकेट (EEC) आणि इंडोनेशियाच्या Tingkat Komponen Dalam Negeri (TKDN) सह अनेक सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसला होता. चला जाणून घेऊया Realme C53 बद्दल आतापर्यंत समोर आलेली माहिती.

रियलमी सी53 सर्टिफिकेशन्स डिटेल

एनबीटीसी एक स्वतंत्र स्टेट एजेंसी आहे. ही दूरसंचार आणि रेडियो सेवेतील रेडियो फ्रीक्वेंसी आणि इक्यूपमेंटच्या वापरासाठी परवाने जारी करते आणि नियमावली बनवते. तसेच एनबीटीसी सर्टिफिकेशन प्रोडक्टच्या हाय क्वॉलिटी आणि विश्वसनीयतेसाठी ओळखलं जातं.

 • लिस्टिंगनुसार, नवीन रियलमी फोनचा मॉडेल नंबर RMX3760 असेल आणि हा एक 4G smartphone असेल.
 • आधीच्या अंदाजानुसार, Realme RMX3760 स्मार्टफोन Realme 11 सीरीजचा भाग असेल.
 • FCC लिस्टिंगनं आधीच स्मार्टफोनमधील 5,000mAh बॅटरी पॅकची पुष्टी केली आहे.
 • फास्ट चार्जिंगसाठी फोनमध्ये 33W SuperVOOC सपोर्ट मिळेल.
 • सध्या आगामी Realme C53 बाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
 • गेल्या महिन्यात कंपनीनं भारतात Realme C55 लाँच केला होता, ज्यात iPhone 14 Pro प्रमाणे ‘मिनी कॅप्सूल’ होता. कंपनीनं याची प्रारंभिक किंमत 10,999 रुपये ठेवली होती. आशा आहे की Realme C53 ची किंमत भारतात याच्या आसपास असू शकते.

  दुसरीकडे, कंपनीनं सांगितलं आहे की 10 मेला चीनमध्ये Realme 11 सीरीज लाँच केली जाईल. सीरीजमध्ये Realme 11, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro + चा समावेश केला जाऊ शकतो. चीनमध्ये रिलीजनंतर हे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांसाठी सादर केले जाऊ शकतात.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here