आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच

Highlights

  • या फोनमध्ये 8 5G Bands देण्यात आले आहेत.
  • हा 5GB Virtual RAM ला सपोर्ट करतो.
  • फोनची विक्री लवकरच सुरु होईल.

इंडियन मोबाइल कंपनी लावानं आज बाजारात आपला अजून एक नवीन 5जी फोन सादर करत Lava Blaze 1X 5G वरील पडदा हटवला आहे. हा स्मार्टफोन लावा इंडिया वेबसाइटच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. कंपनीनं मोबाइलच्या किंमतीचा अद्याप खुलासा केला नाही परंतु किंमत व सेल डिटेल्स व्यतिरिक्त ब्लेज 1एक्स 5जी फोनची संपूर्ण माहिती प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून ऑफिशियल करण्यात आली आहे.

लावा ब्लेज 1एक्स 5जीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ IPS Display
  • 90Hz Refresh Rate

Lava Blaze 1X 5G फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही फोन स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. कंपनीनं डिस्प्लेमध्ये वाइडवाइन एल1 सोबतच 269पीपीआय व 16.7एम कलरचा सपोर्ट दिला आहे तसेच याला 2.5डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती

  • 5GB Virtual RAM
  • MediaTek Dimensity 700

लावा ब्लेज 1एक्स 5जी अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 700 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 5जीबी वचुर्अल रॅम टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जी इंटरनल 6जीबी रॅमसह मिळून 11जीबी रॅमची ताकद देते. हा लावा मोबाइल 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो.

  • 50MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 1X 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आणि वीजीए सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ब्लेज 1एक्स 5जी मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड

  • 8 5G Bands
  • 15W 5,000mAh Battery

Lava Blaze 1X 5G फोनमध्ये 8 5जी बँड्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. हे सर्व 5जी बँड Reliance Jio आणि Airtel नेटवर्कवर वापरता येतील. तसेच फोनमध्ये 4जी एलटीईला सपोर्ट देखील मिळतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here