Android Smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Jun 2023 08:43:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कसा करायचा नवीन अँड्रॉइड फोन सेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत https://www.91mobiles.com/marathi/navin-android-phone-kasa-set-karayacha/ https://www.91mobiles.com/marathi/navin-android-phone-kasa-set-karayacha/#respond Wed, 07 Jun 2023 08:43:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21446 कीपॅड असलेले फोन वापरणं सोपं आहे, ह्यात दुमत नाही. फक्त फोनमध्ये सिम टाका, तो ओपन केला आणि काम सुरु. परंतु आता अँड्रॉइड स्मार्टफोनचं युग आलं आहे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा फोन सेट करण्याची पद्धत फीचर फोनपेक्षा वेगळी असते. जी समजण्यासाठी वेळ लागतो आणि आजच्या लेखात आम्ही तुम्हाला नवीन […]

The post कसा करायचा नवीन अँड्रॉइड फोन सेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कीपॅड असलेले फोन वापरणं सोपं आहे, ह्यात दुमत नाही. फक्त फोनमध्ये सिम टाका, तो ओपन केला आणि काम सुरु. परंतु आता अँड्रॉइड स्मार्टफोनचं युग आलं आहे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा फोन सेट करण्याची पद्धत फीचर फोनपेक्षा वेगळी असते. जी समजण्यासाठी वेळ लागतो आणि आजच्या लेखात आम्ही तुम्हाला नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन सेट करण्याची पद्धत सांगणार आहोत.

नवीन स्मार्टफोन सेट करण्याची पद्धत

नवीन अँड्रॉइड फोन सेटअपमध्ये तुम्हाला तीन प्रोसेस पूर्ण कराव्या लागतात. पहिली प्रोसेस बेसिक सेटअप, दूसरी इंटरनेट सेटअप आणि तीसरी प्रक्रिया आहे ईमेल आयडी सेटअप. सर्वप्रथम बेसिक सेटअपबद्धल जाणून घेऊया.

बेसिक सेटअप

जेव्हा तुम्ही नवीन अँड्रॉइड फोन घेता तेव्हा रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला फोनसह, चार्जर, केबल, एक पिन ज्याला सिम इजेक्टर टूल म्हणतात आणि काही डॉक्यूमेंट मिळतात. आता फोनमध्ये वेगळी बॅटरी मिळत नाही. फोनमध्ये बॅटरी आधीपासूनच असते. त्यामुळे फोन बाॅक्समधून काढल्यानंतर

स्टेप 1 : सर्वप्रथम बॉक्समधील सिम इजेक्टर टूल द्वारे फोन सिम ट्रे काढा. फोनमध्ये सिम ट्रे साइड पॅनल किंवा खालच्या बाजूला दिला असेल.

स्टेप 2 : सिम ट्रे च्या बाजूला एक छोटासा होल असेल ज्यात पिननं प्रेस केल्यावर ट्रे बाहेर येईल.

स्टेप 3 : सिम ट्रे मध्ये सिमसाठी खाचा बनवलेला असतो ज्यात सिम ठेऊन ट्रे बंद करा. एकदा सिम चांगल्याप्रकारे लागला तर फोन ऑन करा. पावर बटन फोनच्या साइड पॅनलवर असतं. इथून तुम्ही फोन ऑन करता येतो.

इंटरनेट सेटअप

एकदा फोन ऑन झाला की डेटा म्हणजे इंटरनेट सेटअप करावं लागेल. तुम्ही इंटरनेटविना देखील फोन ऑन करू शकता परंतु इंटरनेटविना अँड्रॉइड स्मार्टफोन वापरण्यात मजा येणार नाही. त्यामुळे जेव्हा फोन ऑन होईल तेव्हा सर्वप्रथम तुमच्या पसंतीची भाषा निवडण्यास सांगितलं जाईल.

स्टेप 1 : फोनच्या स्क्रीनवर तुम्हाला स्टार्ट लिहलेलं दिसेल त्यावर इंग्रजी शब्द लिहलेला दिसेल त्याच्या बाजुंच्या बाणावर टच केल्यास सर्व भाषांचे पर्याय तुमच्यासमोर येतील आणि तुम्ही तुमच्या आवडीची भासह निवडू शकता.

स्टेप 2 : भाषा निवडल्यानंतर तुमच्या समोर काही दिशा निर्देश येतील जे वाचून तुम्हाला मान्य करून पुढे जावं लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला जुन्या फोनमधून डेटा काॅपी करायचं आहे की नाही ते विचारलं जाईल. जर तुमच्याकडे आधी अँड्रॉइड फोन किंवा आयफोन असेल तर डेटा ट्रांसफर करता येईल. परंतु पहिल्यांदा अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुम्ही स्किप करू शकता.

स्टेप 4 : त्यानंतर तुम्हाला वायफाय नेटवर्क सेटअप करण्याचा पर्याय दिसेल. जर तुमच्या घरी वायफाय सर्व्हिस असेल तर तुम्ही सेटअप करून घेऊ शकता अन्यथा स्किपवर क्लिक करून पुढे जाता येईल.

स्टेप 5 : वायफाय सेट करण्यासाठी स्क्रीनवरील वायफाय लिस्टमधून तुमच्या घरातील वायफायवर क्लिक करून पासवर्ड टाकून वायफाय सेट करा. वायफाय नसेल तर फोन आपोआप मोबाइल डेटावर शिफ्ट होईल.

स्टेप 6 : अशाप्रकारे तुमचा फोन सेटअप होण्यास थोडा वेळ लागेल आणि थोड्या वेळात स्क्रीनवर जुन्या फोनमधून अ‍ॅप्लिकेशन आणि डेटा कॉपी करण्याचा मेसेज येईल. परंतु तुम्ही नवीन फोन सेटअप करत असल्यामुळे तुम्ही हे देखील स्किप करू शकता.

ईमेल आयडी सेटअप

वरील प्रोसेस पूर्ण झाल्यावर ईमेल आयडी सेटअप करण्याची वेळ येईल. जर तुम्ही अँड्रॉइड फोन सेटअप करत असाल तर गुगल आयडी योग्य ठरेल. कारण आयडी सेटअप करून तुम्ही स्मार्ट फीचर्स जसे की अ‍ॅप, ईमेल आणि गेम इत्यादी वापरू शकाल. नाही तर हा एख्याद्या सामान्य फोनप्रमाणे वापरता येईल. म्हणून

स्टेप 1 : जेव्हा तुम्ही पुढे जात तेव्हा गुगल अकाऊंटमध्ये साइन इन करण्याचा पर्याय मिळतो. त्यामुळे जर तुमच्याकडे आधीपासून गुगलचं अकाऊंट असेल तर ह्यात तुमचा आयडी टाका आणि पासवर्ड टाकून साइन इन करा म्हणजे फोन सेट होईल. परंतु जर गुगलचं अकाऊंट नसेल तर अकाऊंट बनवण्याचा ऑप्शन निवडा.

स्टेप 2 : इथे तुम्ही तुमच्या नावानं अकाऊंट बनवू शकता किंवा मोबाइल नंबरनं देखील गुगल अकाऊंट बनवता येईल.

स्टेप 3 : नवीन अकाऊंट बनवताना तुमचं नाव, जन्म तारीख इत्यादी माहिती विचारली जाईल आणि मग एक ओटीपी तुमच्या फोन नंबरवर येईल.

स्टेप 4 : त्यानंतर अकाऊंटसाठी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं गुगल अकाऊंट बनवू शकता.

स्टेप 5 : गुगल अकाऊंट बनवल्यानंतर गुगल सेवांसाठी काही दिशा निर्देश येतील आणि ते मान्य केल्यावर तुम्हाला पिन, पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक सारख्या सिक्योरिटी मधू एकाची निवड करावी लागेल.

स्टेप 6 : हे वगळता येईल परंतु फोनच्या सुरक्षेसाठी सिक्योरिटी सेटअप आवश्यक आहे.

स्टेप 7 : पिन पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला थीम सिलेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. आवडीची थीम सेट करून पुढे जा म्हणजे तुमचा फोन सेट होईल.

त्यानंतर थोड्यावेळाने फोन सेट होऊन वापरण्यासाठी सज्ज होईल. आता तुम्ही तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू शकता.

The post कसा करायचा नवीन अँड्रॉइड फोन सेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/navin-android-phone-kasa-set-karayacha/feed/ 0
जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/#respond Fri, 04 Dec 2020 13:07:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9167 अँड्रॉइड स्मार्टफोन्सप्रमाणे ऍप्पल आयफोन युजर पण आपल्या फोन मध्ये यू-ट्यूब बॅकग्राउंड मध्ये वापरू शकतात.

The post जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बाजारात अनेक म्यूजिक स्ट्रीमिंग ऍप आहेत ज्यातील अनेक ऍप्स युजर्सना फ्री ऍक्सेस पण देतात. पण हे म्यूजिक स्ट्रीमिंग ऍप्स असतानाही YouTube ची गरज आपल्याला पडतेच हे देखील तेव्हढेच मोठे सत्य आहे. इंटरनेट वर फक्त व्हिडीओज बघण्यासाठी नाही तर गाणी ऐकण्यासाठी पण आपण यू-ट्यूब कडे वळतो. स्मार्टफोन मध्ये यू-ट्यूब वापरताना आपण इतर ऍप्सचा वापर करू शकत नाही आणि हि समस्या नेहमीच येते. पण आज आम्ही तुम्हाला अश्या सोप्प्या ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही बॅकग्राउंड मध्ये पण YouTube वापरू शकाल आणि यू-ट्यूब वर गाणी ऐकत फोन मध्ये इतर कामे करू शकाल.

अश्याप्रकारे वापरा बॅकग्राउंड मध्ये यू-ट्यूब

1. सर्वप्रथम आपल्या फोन मध्ये गुगल क्रोम बाउजर वर जा आणि यू-ट्यूब उघडा.

2. YouTube उघडल्यावर तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यावर ‘तीन डॉट’ दिसतील, त्यावर क्लिक करा.

3. इथे ऑप्शन्सची एक लिस्ट येईल, त्यात खाली जाऊन ‘Desktop Site’ वर क्लिक करा.

4. आता तुमच्या आवडीची गाणी किंवा व्हिडीओ प्ले करा, आणि मग होम बटन दाबा.

5. आता फोनचा नोटिफिकेशन पॅनल उघडा, इथे तुम्हाला व्हिडीओ प्लेबॅकचा ऑप्शन मिळेल. प्ले बटन वर क्लिक करताच तो व्हिडीओ सुरु होईल.

6. चांगली गोष्ट अशी कि आता तुम्ही जर तुमचा फोन लॉक पण केला तरीदेखील हा व्हिडीओ सुरु राहील आणि तुम्ही नोटिफिकेशन पॅनल वरून तो कंट्रोल करू शकाल.

अँड्रॉइड स्मार्टफोन्सप्रमाणे ऍप्पल आयफोन युजर पण आपल्या फोन मध्ये यू-ट्यूब बॅकग्राउंड मध्ये वापरू शकतात. आयफोनच्या सफारी ब्राउजर किंवा गुगल क्रोम, दोन्ही मध्ये हि ट्रिक वापरता येईल. अँड्रॉइड मध्ये ब्राउजरच्या वरच्या कोपऱ्यावर तीन डॉट्स क्लिक करायच्या असतात तर आयफोन मध्ये वर डावीकडे डावीकडे असलेल्या ‘aA’ लोगो वर टॅप करून, ‘डेस्कटॉप साइट’ वर क्लिक करावे लागेल. बाकी सर्व प्रोसेस सारखीच असेल. अश्याप्रकारे कोणत्याही मोबाईलचा युजर आपल्या कामात व्यत्यय न आणता YouTube बॅक ग्राउंड मध्ये पण चालू ठेऊ शकतो आणि इतर ऍप्सचा वापर पण सोबतच करू शकतो.

The post जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/feed/ 0
आता गूगल वर करण्यात आला आहे एंडरॉयड स्मार्टफोन यूजर्स च्या डाटा चोरी चा आरोप https://www.91mobiles.com/marathi/oracle-against-google-in-australia-for-allegedly-collecting-data-of-android-users-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oracle-against-google-in-australia-for-allegedly-collecting-data-of-android-users-in-marathi/#respond Thu, 17 May 2018 15:20:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=526 विशेष म्हणजे जावा प्लॅटफॉर्म च्या रॉयल्टी बद्दल पण ऑरेकल आणि गूगल मध्ये खुप काळापासून वाद चालू आहे.

The post आता गूगल वर करण्यात आला आहे एंडरॉयड स्मार्टफोन यूजर्स च्या डाटा चोरी चा आरोप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
थोडेच दिवस झाले असतील सोशल मीडिया मध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सर्विस फेसबुक वर डाटा चोरी चे आरोप लागून. इंटरनेट च्या दुनियेतील मोठया आणि तेवढ्याच गंभीर बतामीने भारता सह जगभरातील फेसबुक यूजर हादरले होते. फेसबुक या आरोपांमधून अजून पूर्णपणे बाहेर पण आली नाही की जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गूगल वर पण डाटा चोरी चे आरोप ठेवण्यात आले आहेत.

गूगल वर एंडरॉयड यूजर्स चा डाटा चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा आरोप आहे. गूगल वर आरोप आहे की कंपनी ने एंडरॉयड फोन मध्ये यूजर्स ने बनवलेले अकाउंट आणि सेव केलेला डाटा चुकीच्या पद्धतीने गोळा करते. या आरोपांमध्ये सांगण्यात आले आहे की गूगल लाखो एंडरॉयड यूजर्स चा डाटा यूजर्स च्या परवानगी वीना आणि त्यांना सांगितल्या शिवाय गोळा करत आहे. गूगल वर हे आरोप करणारी कंपनी आहे आॅरेकल.

सॉफ्टवेयर बनवणारी कंपनी आॅरेकल ने गूगल वर आरोप केला आहे की गूगल स्मार्टफोन यूजर्स चा डाटा चुकीच्या पद्धतीने गोळा करत आहे आणि याचा फायदा त्या स्मार्टफोन मध्ये वापरल्या जाणार्‍या टेलीकॉम आॅपरेटरला होतो. आॅरेकल ने सांगितले की गूगल लोकेशन व जीपीएस सारख्या सर्विसेस च्या माध्यमातून एंडरॉयड चा डाटा सेव करते आणि बॅकग्राउंड रनिंग सर्विस मुळे यूजर्स च्या डाटा वापर पण चालूच राहतो आणि त्यामुळे स्मार्टफोन यूजर्सना जास्त पैसे द्यावे लागतात.

आॅरेकल चे आरोप फेटाळत गूगल ने सांगितले की कंपनी कडे आपल्या यूजर्स चा डाटा सेव करण्याचे सर्व अधिकार आहेत आणि याची माहिती यूजर्सना आधी पासून देण्यात येते. गूगल ने सांगितले की लोकेशन सारख्या सर्विसेस वर वापरला जाणारा डाटा चा चार्ज कंपनी च्या प्लान च्या हिशोबाने दिला जातो तसेच या डाटा चा वापर पूर्णपणे यूजर्स च्या वापरावर अवलंबून आहे.

गूगल ने सांगितले की त्यांनी यूजर्सना याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे की यूजर्स एंडरॉयड च्या सेटिंग्स मध्ये जाऊन आपली सर्विस डिएक्टिवेट करू शकतात. आॅरेकल चे आरोप आणि गूगल चे स्पष्टीकरण यावर ऑस्ट्रेलियाचे नियामक मंडळ तपास करत आहे. विशेष म्हणजे जावा प्लॅटफॉर्म च्या रॉयल्टी बद्दल पण ऑरेकल आणि गूगल मध्ये खुप काळापासून वाद चालू आहे. गूगल जावा प्लेटफॉर्म चा वापर फ्री टू यूज आहे असे सांगते तर याच्या निर्मिती मध्ये सहायक असलेली आॅरेकल जावा च्या रॉयल्टी ची मागणी करत आहे.

The post आता गूगल वर करण्यात आला आहे एंडरॉयड स्मार्टफोन यूजर्स च्या डाटा चोरी चा आरोप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oracle-against-google-in-australia-for-allegedly-collecting-data-of-android-users-in-marathi/feed/ 0