आता गूगल वर करण्यात आला आहे एंडरॉयड स्मार्टफोन यूजर्स च्या डाटा चोरी चा आरोप

थोडेच दिवस झाले असतील सोशल मीडिया मध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सर्विस फेसबुक वर डाटा चोरी चे आरोप लागून. इंटरनेट च्या दुनियेतील मोठया आणि तेवढ्याच गंभीर बतामीने भारता सह जगभरातील फेसबुक यूजर हादरले होते. फेसबुक या आरोपांमधून अजून पूर्णपणे बाहेर पण आली नाही की जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गूगल वर पण डाटा चोरी चे आरोप ठेवण्यात आले आहेत.

गूगल वर एंडरॉयड यूजर्स चा डाटा चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा आरोप आहे. गूगल वर आरोप आहे की कंपनी ने एंडरॉयड फोन मध्ये यूजर्स ने बनवलेले अकाउंट आणि सेव केलेला डाटा चुकीच्या पद्धतीने गोळा करते. या आरोपांमध्ये सांगण्यात आले आहे की गूगल लाखो एंडरॉयड यूजर्स चा डाटा यूजर्स च्या परवानगी वीना आणि त्यांना सांगितल्या शिवाय गोळा करत आहे. गूगल वर हे आरोप करणारी कंपनी आहे आॅरेकल.

सॉफ्टवेयर बनवणारी कंपनी आॅरेकल ने गूगल वर आरोप केला आहे की गूगल स्मार्टफोन यूजर्स चा डाटा चुकीच्या पद्धतीने गोळा करत आहे आणि याचा फायदा त्या स्मार्टफोन मध्ये वापरल्या जाणार्‍या टेलीकॉम आॅपरेटरला होतो. आॅरेकल ने सांगितले की गूगल लोकेशन व जीपीएस सारख्या सर्विसेस च्या माध्यमातून एंडरॉयड चा डाटा सेव करते आणि बॅकग्राउंड रनिंग सर्विस मुळे यूजर्स च्या डाटा वापर पण चालूच राहतो आणि त्यामुळे स्मार्टफोन यूजर्सना जास्त पैसे द्यावे लागतात.

आॅरेकल चे आरोप फेटाळत गूगल ने सांगितले की कंपनी कडे आपल्या यूजर्स चा डाटा सेव करण्याचे सर्व अधिकार आहेत आणि याची माहिती यूजर्सना आधी पासून देण्यात येते. गूगल ने सांगितले की लोकेशन सारख्या सर्विसेस वर वापरला जाणारा डाटा चा चार्ज कंपनी च्या प्लान च्या हिशोबाने दिला जातो तसेच या डाटा चा वापर पूर्णपणे यूजर्स च्या वापरावर अवलंबून आहे.

गूगल ने सांगितले की त्यांनी यूजर्सना याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे की यूजर्स एंडरॉयड च्या सेटिंग्स मध्ये जाऊन आपली सर्विस डिएक्टिवेट करू शकतात. आॅरेकल चे आरोप आणि गूगल चे स्पष्टीकरण यावर ऑस्ट्रेलियाचे नियामक मंडळ तपास करत आहे. विशेष म्हणजे जावा प्लॅटफॉर्म च्या रॉयल्टी बद्दल पण ऑरेकल आणि गूगल मध्ये खुप काळापासून वाद चालू आहे. गूगल जावा प्लेटफॉर्म चा वापर फ्री टू यूज आहे असे सांगते तर याच्या निर्मिती मध्ये सहायक असलेली आॅरेकल जावा च्या रॉयल्टी ची मागणी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here