जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता

बाजारात अनेक म्यूजिक स्ट्रीमिंग ऍप आहेत ज्यातील अनेक ऍप्स युजर्सना फ्री ऍक्सेस पण देतात. पण हे म्यूजिक स्ट्रीमिंग ऍप्स असतानाही YouTube ची गरज आपल्याला पडतेच हे देखील तेव्हढेच मोठे सत्य आहे. इंटरनेट वर फक्त व्हिडीओज बघण्यासाठी नाही तर गाणी ऐकण्यासाठी पण आपण यू-ट्यूब कडे वळतो. स्मार्टफोन मध्ये यू-ट्यूब वापरताना आपण इतर ऍप्सचा वापर करू शकत नाही आणि हि समस्या नेहमीच येते. पण आज आम्ही तुम्हाला अश्या सोप्प्या ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही बॅकग्राउंड मध्ये पण YouTube वापरू शकाल आणि यू-ट्यूब वर गाणी ऐकत फोन मध्ये इतर कामे करू शकाल.

अश्याप्रकारे वापरा बॅकग्राउंड मध्ये यू-ट्यूब

1. सर्वप्रथम आपल्या फोन मध्ये गुगल क्रोम बाउजर वर जा आणि यू-ट्यूब उघडा.

2. YouTube उघडल्यावर तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यावर ‘तीन डॉट’ दिसतील, त्यावर क्लिक करा.

3. इथे ऑप्शन्सची एक लिस्ट येईल, त्यात खाली जाऊन ‘Desktop Site’ वर क्लिक करा.

4. आता तुमच्या आवडीची गाणी किंवा व्हिडीओ प्ले करा, आणि मग होम बटन दाबा.

5. आता फोनचा नोटिफिकेशन पॅनल उघडा, इथे तुम्हाला व्हिडीओ प्लेबॅकचा ऑप्शन मिळेल. प्ले बटन वर क्लिक करताच तो व्हिडीओ सुरु होईल.

6. चांगली गोष्ट अशी कि आता तुम्ही जर तुमचा फोन लॉक पण केला तरीदेखील हा व्हिडीओ सुरु राहील आणि तुम्ही नोटिफिकेशन पॅनल वरून तो कंट्रोल करू शकाल.

अँड्रॉइड स्मार्टफोन्सप्रमाणे ऍप्पल आयफोन युजर पण आपल्या फोन मध्ये यू-ट्यूब बॅकग्राउंड मध्ये वापरू शकतात. आयफोनच्या सफारी ब्राउजर किंवा गुगल क्रोम, दोन्ही मध्ये हि ट्रिक वापरता येईल. अँड्रॉइड मध्ये ब्राउजरच्या वरच्या कोपऱ्यावर तीन डॉट्स क्लिक करायच्या असतात तर आयफोन मध्ये वर डावीकडे डावीकडे असलेल्या ‘aA’ लोगो वर टॅप करून, ‘डेस्कटॉप साइट’ वर क्लिक करावे लागेल. बाकी सर्व प्रोसेस सारखीच असेल. अश्याप्रकारे कोणत्याही मोबाईलचा युजर आपल्या कामात व्यत्यय न आणता YouTube बॅक ग्राउंड मध्ये पण चालू ठेऊ शकतो आणि इतर ऍप्सचा वापर पण सोबतच करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here