Android Tips and Tricks - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 17 Jun 2023 15:31:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 WiFi चा पासवर्ड कसा शोधायचा; मोबाइल आणि कंप्यूटरवरच्या 2 सोप्या पद्धती https://www.91mobiles.com/marathi/wifi-cha-password-kasa-shodhu-how-to-know-wifi-password/ https://www.91mobiles.com/marathi/wifi-cha-password-kasa-shodhu-how-to-know-wifi-password/#respond Sat, 17 Jun 2023 04:04:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21128 ह्या लेखात आम्ही तुम्हाला Mobile आणि Windows कंप्यूटरवरून WiFi पासवर्ड कसा शोधायचा हे सांगणार आहोत. कारण WiFi पासवर्ड आपण रोज वापरत नाही त्यामुळे विसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा डिवाइस फॉर्मेट करता किंवा एखादा नवीन डिवाइस आला तर वायफाय पासवर्ड आठवावा लागतो. त्याहीपेक्षा वायफाय पासवर्डची जास्त गरज मित्र किंवा नातेवाईक आल्यावर त्यांना कनेक्शन देण्यासाठी असते. तेव्हा […]

The post WiFi चा पासवर्ड कसा शोधायचा; मोबाइल आणि कंप्यूटरवरच्या 2 सोप्या पद्धती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ह्या लेखात आम्ही तुम्हाला Mobile आणि Windows कंप्यूटरवरून WiFi पासवर्ड कसा शोधायचा हे सांगणार आहोत. कारण WiFi पासवर्ड आपण रोज वापरत नाही त्यामुळे विसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा डिवाइस फॉर्मेट करता किंवा एखादा नवीन डिवाइस आला तर वायफाय पासवर्ड आठवावा लागतो. त्याहीपेक्षा वायफाय पासवर्डची जास्त गरज मित्र किंवा नातेवाईक आल्यावर त्यांना कनेक्शन देण्यासाठी असते. तेव्हा पासवर्ड देण्यासाठी तुम्हाला रिसेट करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्सच्या माध्यमातून WiFi Password शोधायला शिकवणार आहोत.

वायफायचा पासवर्ड कसा शोधायचा?

आम्ही इथे ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्यांच्या मदतीनं तुम्ही विंडोज कंप्यूटर आणि अँड्रॉइड फोनवरून वायफाय पासवर्ड पाहू शकता. एक गोष्ट लक्षात असू दे की ही ट्रिक वायफाय पासवर्ड चोरण्याची पद्धत नाही तर तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील वायफाय पासवर्ड विसरल्यास पाहण्याची पद्धत आहे.

कंप्यूटरमधून कसा पाहायचा WiFi चा पासवर्ड

कंप्यूटरवरून वायफाय पासवर्ड शोधण्याची पद्धत सोपी आहे आणि सर्वात खास बाब म्हणजे ह्यासाठी तुम्हाला कोणतंही वेगळं सॉफ्टवेयर इंस्टॉल करण्याची गरज नाही. फक्त CMD commands वापरून तुम्ही पासवर्ड जाणून घेऊ शकता. ज्या वायफायशी तुमचा कंप्यूटर कनेक्ट असेल त्याचा पासवर्ड जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला

स्टेप 1: तुमच्या विंडोज कंप्यूटरवर Command Prompt ओपन करा. तुम्ही ह्यासाठी शॉर्टकट की Windows + R चा वापर करू शकता.

स्टेप 2: किंवा सर्च बार ओपन झाल्यावर तुम्ही CMD लिहून एंटर करू शकता.

स्टेप 3: त्याचबरोबर कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. आता तुम्हाला netsh wlan show profile लिहावं लागेल किंवा कॉपी करून पेस्ट करा.

स्टेप 4: हे लिहिताच तुमच्या कंप्यूटरशी कनेक्टेड सर्व WiFi चं नाव समोर येईल.

स्टेप 5: इथे Command Prompt वर NETSH WLAN SHOW PROFILE ABC KEY=CLEAR लिहा. पण ABC च्या जागी तुम्हाला त्या वायफायचं नाव लिहावं लागेल ज्याचा वायफाय पासवर्ड तुम्हाला हवा आहे.

स्टेप 6: ही कमांड टाकताच तुमच्या कंप्यूटर स्क्रीनवर बरीच माहिती येईल आणि इथे तुम्हाला कनेक्टच्या समोर तुमच्या WiFi चा पासवर्ड दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही विंडोज कंप्यूटरमधून तुमच्या WiFi चा पासवर्ड शोधू शकता.

मोबाइलवरून कसा शोधायचा WiFi चा पासवर्ड

मोबाइलवरून WiFi चा पासवर्ड शोधणं सोपं आहे. ह्यासाठी सर्वप्रथम

स्टेप 1: तुमच्या फोन सेटिंगमध्ये जा.

स्टेप 2: इथे कनेक्शनची निवड करा.

स्टेप 3: त्यानंतर WiFi वर क्लिक करा.

स्टेप 4: वायफायवर क्लिक करताच फोनवर ते सर्व वायफाय नेटवर्क दिसतील जे उपलब्ध आहेत. ह्यातून कनेक्टेड वायफाय ज्याचा तुम्हाला पासवर्ड हवा आहे त्याच्या सेटिंगमध्ये जा.

स्टेप 5: इथून वायफाय शेयर किंवा अनेक फोनमध्ये थेट QR चा ऑप्शन खाली दिसतो. त्यावर क्लिक करा. तसेच QR च्या खाली तुम्हाला वायफाय मिळेल.

स्टेप 6: सॅमसंग आणि मी सहित अनेक कंपन्यांनी फोनमध्ये QR कोड मधून वायफाय पासवर्ड हटवला आहे. त्यामुळे तुम्ही गुगल लेन्सच्या मदतीनं हे स्कॅन करू शकता. गुगल लेन्स द्वारे हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला खाली वायफाय पासवर्ड दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाइल आणि कंप्यूटरवरून वाय-फाय पासवर्ड शोधू शकता.

The post WiFi चा पासवर्ड कसा शोधायचा; मोबाइल आणि कंप्यूटरवरच्या 2 सोप्या पद्धती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/wifi-cha-password-kasa-shodhu-how-to-know-wifi-password/feed/ 0
या पद्धती अवलंबल्यास कधी करावी लागणार नाही कॉन्टेक्ट डिलीट होण्याची चिंता, बदल कितीही फोन, सर्व नंबर राहतील सोबत https://www.91mobiles.com/marathi/how-to-recover-contacts-number-in-new-phone/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-recover-contacts-number-in-new-phone/#respond Thu, 19 Nov 2020 14:59:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9015 आज आम्ही तुम्हाला काही अश्या सोप्प्या टिप्स सांगणार आहोत, ज्या अवलंबल्यास कितीही फोन्स बदलेले तरी कॉन्टेक्ट्स डिलीट होण्याची चिंता रहाणार नाही.

The post या पद्धती अवलंबल्यास कधी करावी लागणार नाही कॉन्टेक्ट डिलीट होण्याची चिंता, बदल कितीही फोन, सर्व नंबर राहतील सोबत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा आनंद वेगळा असतो. आणि का असू नये दिवसातील बराच वेळ आपण आपल्या मोबाईल फोन सोबतच घालवतो. नवीन फोन मध्ये नवनवीन ऍप्स इंस्टाल होतात, कॅमेऱ्याने फोटो काढले जातात आणि नवीन गेम्स डाउनलोड केले जातात. प्रत्येक गोष्ट करताना मजा येते पण जेव्हा गोष्ट कॉन्टेक्ट्सची येते तेव्हा अनेक मोबाईल युजरला चिंता सतावते कि कशाप्रकारे जुन्या फोनचे कॉन्टेक्ट्स नवीन फोन मध्ये आणावे. आज आम्ही तुम्हाला काही अश्या सोप्प्या टिप्स सांगणार आहोत, ज्या अवलंबल्यास कितीही फोन्स बदलेले तरी कॉन्टेक्ट्स डिलीट होण्याची चिंता रहाणार नाही.

अश्याप्रकारे करा नंबर सेव

1. फोन मध्ये नंबर सेव करण्याचा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे कि ते फोन मेमरी किंवा सिम मेमरी मध्ये नाही तर गुगल अकांउट वर सेव करावे.

2. सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन गुगल आधारित असतात आणि त्यात जीमेल अकाउंट सोबतच लॉग-इन करता येते.

3. जेव्हा नवीन फोन सेटअप करता तेव्हा जीमेलचा ‘कॉन्टेक्ट सिंक’ ऑन करा.

4. सिंक ऑन झाल्यानंतर कॉन्टेक्ट्स किंवा फोन बुक मध्ये जाऊन कॉन्टेक्स सेव करण्याचे लोकेशन बाय डिफॉल्ट ‘जीमेल’ वर सेट करा.

5. असे केल्यावर तुम्ही जे कॉन्टेक्ट तुमच्या फोन मध्ये सेव कराल ते सर्व जीमेल अकाउंट वर सेव होतील. आणि नंतर कोणत्याही फोन मध्ये तुमचे जीमेल अकाउंट लागइन करून तुमचे सर्व कॉन्टेक्ट्स त्या फोन मध्ये डाउनलोड करू शकता.

जुन्या फोनचे कॉन्टेक्ट असे करा नवीन फोन मध्ये ट्रांसफर

1. जुन्या फोन मध्ये ‘सेटिंग्स’ मध्ये जीमेल अकाउंट वर जाकर ‘सिंक’ ऑप्शन उघडा.

2. इथे ‘कॉन्टेक्ट’ ऑप्शन वर जाऊन तो ऍक्टिव्हेट करा.

3. कॉन्टेक्ट सिंक ऑन करून, सर्व कॉन्टेक्ट्सचा बॅकअप जीमेल अकाउंट वर घ्या.

4. त्यानंतर नवीन फोन मध्ये त्याच जीमेल अकाउंटने लॉगइन करा, ज्यावर जुन्या फोन मध्ये बॅकअप घेतला आहे.

5. नवीन फोन मध्ये पण कॉन्टेक्ट्स सिंक ऑन करा, असे केल्यावर आपोआप सर्व कॉन्टेक्ट्स फोन बुक मध्ये डाउनलोड होतील.

मेमरी कार्डच्या माध्यमातून बॅकअप

1. जर तुम्ही फोन मध्ये माइक्रोएसडी कार्डचा वापर करत असाल तर तो जुन्या फोन मध्ये टाका.

2. कॉन्टेक्ट लिस्ट किंवा फोनबुक मध्ये जाऊन इंपोर्ट/एक्सपोर्ट कॉन्टेक्ट ऑप्शन वर क्लिक करा.

3. इथे एक्सपोर्ट कॉन्टेक्टच्या ऑप्शन वर जा आणि ‘एक्सपोर्ट टू स्टोरेज डिवायस’ किंवा ‘एक्सपोर्ट टू कार्ड’ सिलेक्ट करा, इथे कॉन्टेक्ट लिस्टच्या फाईलला तुमच्या सोयीनुसार नाव पण देता येईल.

4. कॉन्टेक्ट एक्सपोर्ट झाल्यानंतर मेमरी कार्ड जुन्या फोन मधून काढून नवीन फोन मध्ये टाका.

5. इथे पण फोनबुक मध्ये इंपोर्ट/एक्सपोर्ट कॉन्टेक्ट वर जाऊन, ‘इंपोर्ट फ्रॉम स्टोरेज डिवायस’ किंवा ‘इंपोर्ट फ्रॉम कार्ड’ चा ऑप्शन निवडा.

इथे तुमच्या द्वारे सेव केलेली कॉन्टेक्ट फाईल सिलेक्ट केल्यावर त्यातील सर्व कॉन्टेक्ट्स नवीन फोन मध्ये डाउनलोड होतील. वर सांगितलेल्या सर्व ऑप्शन्स मध्ये तुमचे कॉन्टेक्ट्स नवीन फोन मध्ये येतील तसेच तुमच्या मेमरी कार्ड आणि जीमेल अकाउंट वर पण सेव राहतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिथे ठेऊ शकता किंवा डिलीट पण करू शकता.

The post या पद्धती अवलंबल्यास कधी करावी लागणार नाही कॉन्टेक्ट डिलीट होण्याची चिंता, बदल कितीही फोन, सर्व नंबर राहतील सोबत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-recover-contacts-number-in-new-phone/feed/ 0
फक्त 3 सेटिंग्स बदलल्यावर तुमचा एंड्रॉयड फोन होईल फास्ट https://www.91mobiles.com/marathi/how-to-speedup-android-phone/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-speedup-android-phone/#respond Thu, 02 Apr 2020 12:51:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6977 यासाठी तुम्हाला खूप मोठी प्रक्रिया करण्याची पण गरज नाही, फक्त फोनच्या की सेटिंग मध्ये तीन बदल करायचे आहेत.

The post फक्त 3 सेटिंग्स बदलल्यावर तुमचा एंड्रॉयड फोन होईल फास्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कधीही एंड्रॉयड फोन विकत घेताना प्रयत्न असा असतो कि त्याचा रॅम आणि स्टोरेज जास्तीत जास्त असावी. आणि त्याचा फायदा पण होतो काही दिवस तुमचा फोन योग्यरित्या चालतो. परंतु काही दिवसांनी सत्य समोर येऊ लागते. फोन मध्ये 2 GB रॅम असो, 4 GB रॅम असो वा 8 GB काही दिवसांनी तो स्लो होत जातो. त्यावर एक उपाय आहे कि कॅशे मेमरी तुम्ही क्लियर करता. परंतु यात खूप डेटा पण जातो. त्यामुळे अनेकदा लोक कॅशे क्लिकर करत नाहीत आणि काही प्रमाणात हे योग्य आहे. पण काही ट्रिक्स आहेत ज्या कॅशे क्लियर न करता तुमचा फोन फास्ट करतात. खास बाब अशी आहे कि यासाठी तुम्हाला खूप मोठी प्रक्रिया करण्याची पण गरज नाही, फक्त फोनच्या की सेटिंग मध्ये तीन बदल करायचे आहेत. चला तर मग बघूया.

डेवलपर्स मोड करा ऑन

एंड्रॉयड फोन मध्ये डेवलपर्स मोड असतो. जो कंपनी लपवून ठेवते आणि तुम्हाला तो ऑन करावा लागतो. हा ऑप्शन तुम्हाला साधारण सेटिंग मध्ये मिळणार नाही. हा एका ट्रिकने ऑन करावा लागतो. डेवलपर्स मोड ऑन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंग मध्ये जावे लागेल आणि तिथून अबाउट फोनची निवड कारवाई लागेल.

अबाउट फोनचा विकल्प अनेक फोन्स मध्ये वरतीच असतो तर काही कंपन्यां तो तळाला देतात. जेव्हा तुम्ही यात क्लिक कराल तेव्हा अनेक ऑप्शन दिसतील. यातील बिल्ट नंबरची निवड तुम्हाला करायची आहे आणि या वर सात वेळा टॅप करा. असे केल्यावर डेवलपर्स मोड ऑन झाल्याची सूचना येईल. आता तुम्ही जेव्हा बाहेर सेटिंग मध्ये याला तेव्हा डेवलपर्स ऑप्शन मिळेल. सर्व फोन्स मध्ये डेवलपर्स मोडचा ऑप्शन असतो पण ब्रँडनुसार याची सेटिंग बदलत जाते. अनेक फोन्स मध्ये सॉफटवेयर इन्फॉर्मेंशनच्या आत बिल्ट नंबरचा पर्याय मिळतो तर काही फोन्स मध्ये यासाठी तुम्हाला वर्जन वर क्लिक करावे लागते.

फोन फास्ट करण्यासाठी या तीन सेटिंग्स बदला

डेवलपर्स ऑप्शन ऑन झाल्यावर तुम्हाला त्यावर क्लिक करा. तिथे थोडे खाली तुम्हाला तीन पर्याय मिळतील. यात पहिला विकल्प विंडोज ऍनिमेशन स्केल, दुसरा ट्रांजिशन ऍनिमेशन स्केल आणि तीसरा ऍनिमटर ड्यूरेशन स्केल दिसेल तुम्हाला तिन्ही वर क्लिक करा आणि सर्व स्केल ऑफ करा. असे केल्याने तुमचा फोन लॅग, हँग किंवा स्लो होणार नाही.

The post फक्त 3 सेटिंग्स बदलल्यावर तुमचा एंड्रॉयड फोन होईल फास्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-speedup-android-phone/feed/ 0
फोन वापरताना लागला शॉक, 28 वर्षीय तरुणाचा झाला अंथरुणातच मृत्यू https://www.91mobiles.com/marathi/man-died-smartphone-plugged-into-charger-on-bed-electrocuted-in-thailand/ https://www.91mobiles.com/marathi/man-died-smartphone-plugged-into-charger-on-bed-electrocuted-in-thailand/#respond Wed, 04 Dec 2019 12:18:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5964 पोलिसांनी प्रथमदृष्ट्या असे मानले कि फोन चार्जिंग वर असल्यामुळे कीत्तिसकला करंट लागला आणि करंट लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

The post फोन वापरताना लागला शॉक, 28 वर्षीय तरुणाचा झाला अंथरुणातच मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात एक बातमी समोर आली होती कि ओरिसा मध्ये एक 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू फोन उशाला ठेऊन झोपल्यामुळे झाला होता. मीडिया रिपोर्ट वरून समजले कि मृतकाने आपला मोबाईल चार्ज वर लावून झोपला होता आणि रात्री त्याच्या फोन मध्ये ओवर चार्जिंगमुळे आग लागली आणि तसेच ब्लास्ट झाला आहे. या दुर्घटनेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला होता. तर आता अशीच हैराण करणारी एक बातमी थाईलँड मधून आली आहे जिथे फोनला करंट लागल्यामुळे एक 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

विदेशी न्यूज वेबसाइट द सन कडून मिळालेल्या या बातमी मध्ये सांगण्यात आले आहे कि थाईलँड मध्ये एका 28 वर्षीय व्यक्तीने फोन चार्जिंगला लावून आपल्या बेड वर ठेवला होता आणि नंतर तो मृत अवस्थेत बेड वर मिळाला. न्यूज रिपोर्ट नुसार 28 वर्षीय कीत्तिसक मूनकीत्तिने आपल्या बेड वरच एक्स्टेंशन बोर्ड मध्ये फोन चार्जिंगला लावला होता आणि तो बेड वर पडून तो वापरत होता. वापरताना त्याला करंट लागला आणि अंथरुणातच तरुणाचा मृत्यू झाला.

कीत्तिसक सोबत घडलेल्या या घटनेची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. रिपोर्टनुसार त्याच्या आईने पोलिसांना सांगितले आहे कि, ती घरात काम करत होती आणि काम करताना त्यांनी कीत्तिसकला कामात मदत करण्यासाठी आवाज दिला. जेव्हा अनेकदा हाक मारून पण तरुणाने उत्तर दिले नाही तेव्हा कीत्तिसकची आई त्याच्या खोलीत गेली तेव्हा तिने बघितले कि कीत्तिसक आपल्या अंथरुणात झोपलेला आहे आणि त्याच्या शरीरात हालचाल नव्हती.

मुलगा निपश्चित पडलेला पाहून त्याच्या आईने कीत्तिसकला अनेकदा हलवून बघितले तर तो पूर्णपणे बेशुद्ध होता. तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले आणि जेव्हा पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा कीत्तिसकला मृत घोषित करण्यात आले. पोलीस नुसार 28 वर्षीय युवकाच्या शरीरावर फोनची तार गुंडाळलेली होती तसेच कीत्तिसकचे दोन्ही हात आणि मनगटांवर भाजल्याचे निशाण होते. पोलिसांनी प्रथमदृष्ट्या असे मानले कि फोन चार्जिंग वर असल्यामुळे कीत्तिसकला करंट लागला आणि करंट लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृत शरीर पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले आहे.

एका महिन्यात हि दुसरी दुर्घटना आहे ज्यात दुर्लक्षामुळे मोबाईल यूजरला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांना सावधानतेचा इशारा देत आहोत कि टेक्नॉलॉजीला वापर करताना हिशोबात करावा व्यसन लागू नये. 91मोबाईल्स आपल्या वाचकांना विनंती करत आहोत कि रात्री झोपताना फोन चार्जिंग वरून काढून स्वतःपासून दूर ठेऊन झोपा आणि कधीही फोन ओवर चार्ज करू नका. करंट, आग किंवा ब्लास्टच नाही तर मोबाईल मधून होणारा किरणोत्सर्ग मानवी शरीरासाठी घातक असतो.

The post फोन वापरताना लागला शॉक, 28 वर्षीय तरुणाचा झाला अंथरुणातच मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/man-died-smartphone-plugged-into-charger-on-bed-electrocuted-in-thailand/feed/ 0
एखादा अपघात झाल्यास फोन अनलॉक न करता अपघातग्रस्त व्यक्तीच्या घरच्यांना कसे कळवावे, नक्की वाचा या उपयोगी टिप्स https://www.91mobiles.com/marathi/emergency-contact-call-how-to-use-lock-phone-screen-setting/ https://www.91mobiles.com/marathi/emergency-contact-call-how-to-use-lock-phone-screen-setting/#respond Mon, 02 Dec 2019 15:30:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5940 Emergency call चे फीचर आहे, पण फक्त काही लोकांना माहित आहे कि हे फीचर किती उपयोगी आहे आणि गरजेचे आहे.

The post एखादा अपघात झाल्यास फोन अनलॉक न करता अपघातग्रस्त व्यक्तीच्या घरच्यांना कसे कळवावे, नक्की वाचा या उपयोगी टिप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एकेकाळी जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी गरजेच्या होत्या. आजकाल यात एक चौथी गोष्ट जोडली गेली आहे, ‘अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल’. आपण संपूर्ण दिवस स्मार्टफोन किंवा मोबाईल आपल्या जवळ बाळगतो. फेसबुक, व्हाट्सऍप, यूट्यूब, चॅटींग , वीडियो कॉल सारख्या गोष्टी आपण दिवसभर वापरतो. आपली मूलभूत गरज बनलेला मोबाईल फोन कॉल, मेसेज आणि मनोरंजनाच्या कामी येतो पण त्याचबरोबर या मोबाईल मध्ये काही असे फीचर्स पण आहेत जे आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात. सर्वांच्या फोन मध्ये Emergency call चे फीचर आहे, पण फक्त काही लोकांना माहित आहे कि हे फीचर किती उपयोगी आहे आणि गरजेचे आहे.

सर्वात आधी Emergency call फीचर बद्दल बोलायचे तर सध्या जवळपास सर्व स्मार्टफोन यूजर आपला फोन लॉक करून ठेवतात. पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक मुळे कोणीही आपला फोन अनलॉक करू शकत नाही. या सिक्योरिटी फीचर्समुळे फोनची प्राइवेसी कायम राहते पण जरा विचार करा जर एखादी व्यक्ती अपघातग्रस्त झाली तर त्याच्या घरच्यांना कळवणे पण गरजेचे असते. आणि अश्या वेळी फोन लॉक असल्याने अडचण येते. Emergency call फीचर अश्या परिस्थितीसाठी बनला आहे, ज्यात फोन अनलॉक न करता अपघातग्रस्त व्यक्तीच्या घरच्यांना सूचित करता येऊ शकते.

असा करा आपल्या स्मार्टफोन मध्ये Emergency call ऍक्टिव्ह :

1. सर्वात आधी फोन लॉक करा आणि होम पेज वर या.

2. जेव्हा फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा Emergency call चा ऑप्शन दिसतो, तो प्रेस करा.

3. Emergency call टच करताच पॅड ओपन होईल आणि सोबतच तुम्हाला डिस्प्ले वर ‘+‘ Emergency Contact म्हणजे आपत्कालीन कॉल मध्ये नंबर ऍड करण्याचा ऑप्शन मिळेल. त्यावर टच करा.

4. आपत्कालीन कॉन्टेक्ट नंबर जोडण्याआधी फोन अनलॉक करण्याची कमांड येईल. आपला अनलॉक पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटने फोन अनलॉक करा.

5. फोन अनलॉक झाल्यानंतर कॉन्टेक्ट लिस्ट येईल, यातून आपल्या घरच्यांचा किंवा मित्रांचा नंबर निवडा.

6. नंबर निवडल्यांनंतर फोन मध्ये बॅक बटण दाबा, इथे Emergency Contact ऑप्शन येईल आणि सोबतच तुम्हाला इथे निवडलेले कॉन्टेक्ट पण दिसतील.

7. हे कॉन्टेक्ट नंबर तुमच्या Emergency Contact लिस्ट मध्ये सामील झाले आहेत. तसेच अनेक फोन मॉडेल मध्ये इथे तुमची मेडिकल इंर्फोमेशन टाकण्याचा ऑप्शन असेल. तुम्ही ब्लड ग्रुप किंवा एखादा आजार ऍड करू शकता, जो आपत्कालीन काळात उपयोगी पडू शकतो.

एकदा Emergency Contact लिस्ट मध्ये फोन नंबर आला कि कोणीहीव्यक्ती व्यक्ति तुमचा फोन अनलॉक न करता त्या निवडलेल्या लोकांच्या नंबर वर कॉल करू शकेल

फोन बुक मधून पण करू शकता सिलेक्ट

1. Emergency call ऑप्शन व्यतिरिक्त तुम्ही थेट फोन बुक किंवा कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये जाऊन पण आपत्कालीन कॉल साठी नंबर निवडू शकता.

2. कॉन्टेक्ट लिस्ट किंवा फोन बुक ओपन करा आणि त्या कॉन्टेक्ट वर जा जो तुम्ही Emergency call साठी निवडू इच्छित आहात.

3. कॉन्टेक्ट ओपन केळ्यावर तिथे नाव, नंबर, ऑर्गेनाइज़ेशन व ईमेल सोबतच Add to Emergency Contacts चा पण ऑप्शन मिळेल. तो टच करा.

4. नंबर ऍड केल्यावर तो तुमच्या Emergency Contact लिस्ट मध्ये येईल.

5. एकापेक्षा जास्त लोकांना Emergency Contacts मध्ये ऍड करण्यासाठी याची पुनरावृत्ती करा.

Emergency call फीचरचे महत्व आणि आवश्यकता समजून आपण स्वतःच्या फोन आणि आपल्या कुटुंबियांच्या फोन मध्ये पण हे फीचर ऍक्टिव्हेट केले पाहिजे.

The post एखादा अपघात झाल्यास फोन अनलॉक न करता अपघातग्रस्त व्यक्तीच्या घरच्यांना कसे कळवावे, नक्की वाचा या उपयोगी टिप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/emergency-contact-call-how-to-use-lock-phone-screen-setting/feed/ 0
होटल किंवा चेंजिंग रूम मधील छुपा कॅमेरा आणि माइक मोबाईलने कसा शोधावा https://www.91mobiles.com/marathi/how-to-detect-hidden-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-detect-hidden-camera-in-marathi/#respond Wed, 13 Nov 2019 14:26:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5770 फोनचा वापर पण तुम्ही कॅमेरा आणि माइक्रोफोन डिटेक्टरच्या स्वरूपात करू शकता फक्त तुम्हाला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.

The post होटल किंवा चेंजिंग रूम मधील छुपा कॅमेरा आणि माइक मोबाईलने कसा शोधावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका रेस्टॉरंट मधील घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. बातमी समोर आली होती कि पुण्यातील एका रेस्टॉरंटच्या महिला शौचालयात कॅमेरा लपवण्यात आला होता, जो महिलांची रेकॉर्डिंग करत होता. एका तरुणीला जेव्हा छुप्या कॅमेऱ्याबद्दल समजले तेव्हा तिने पोलिसांमध्ये तक्रार केली. हे प्रकरण खु गंभीर होतं पण ते समोर आल्यामुळे महिला सुरक्षा पुन्हा चर्चेत आली. असे प्रसंग कुठेही आणि कोणासोबत पण होऊ शकतात. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी तयार रहाणे केव्हाही चांगले. पुढे आम्ही काही असे सोप्पे उपाय सांगितले आहेत, जे फॉलो करून तुम्ही तुमचा आणि तुमच्या नातेवाईकांचा अश्या प्रसंगातून बचाव करू शकता.

तुम्हाला वाटत असेल कि असा छुपा कॅमेरा बटणाप्रमाणे असतो आणि तसाच माइक्रोफोन असेल तर या गोष्टींचा शोध कसा घ्यायचा? कॅमेरा आणि माइक्रोफोन डिटेक्टर तर प्रत्येक ठिकाणी घेऊन जाता येत नाही. पण तुम्ही विसरताय कि एक डिटेक्टर सतत तुमच्या हातात असतो पण तुम्ही त्याचा वापर करत नाही. मी बोलतोय तुमच्या फोन बद्दल. याचा वापर पण तुम्ही कॅमेरा आणि माइक्रोफोन डिटेक्टरच्या स्वरूपात करू शकता फक्त तुम्हाला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.

या ऍप्लिकेशनचे नाव आहे हिडन कॅमेरा डिटेक्टर. सर्वात खास बाब अशी कि याचा वापर खूप सोप्पा आहे. फक्त हा इंस्टॉल करावा लागेल आणि एका क्लिक मध्ये हा आपले काम सुरु करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या एंडरॉयड फोन मध्ये हिडन कॅमेरा डिटेक्टर ऍप इंस्टॉल करून उघडाल तेव्हा सुरवातीला हा तुमच्याकडे कॅमेऱ्या सहित काही ऍक्सेस मागेल. ऍक्सेस दिल्यानंतर सर्वात आधी डिटेक्ट कॅमेरा बाई रेडियेशन मीटर चा ऑप्शन येईल. सोबत डिटेक्ट इन्फ्रारेड कॅमेरा, टिप्स एंड ट्रिक्स आणि पेड ऍप घेण्याचा ऑप्शन असेल.

डिटेक्ट कॅमेरा बाय रेडियेशन मीटर वर क्लिक केल्यावर हा सुरु होईल. स्क्रीन वर गोल सर्कल दिसेल तसेच खाली हिरव्या रंगाची रेष चालू लागेल. लाइनच्या खाली एका पट्टी वर तुम्हाला सूचना मिळतील कि कॅमेरा आहे किंवा माइक्रोफोन. आता तुम्हाला तुमचा फोन अजुनबाजूच्या वस्तूंशी न्यावा लागेल ज्या ठिकाणी छुपा कॅमेरा असल्याचा तुम्हाला संशय आहे. जर काही मिळाले नाही तर हिरवी रेष चालू राहील. एखादा कॅमेरा किंवा माइक्रोफोन रेडियेशन याले मिळाले कि खालची लाइन झिगझॅग होईल. तसेच जेव्हा यात कॅमेरा डिटेक्ट होईल तेव्हा लाइन लाल होईल आणि डिटेक्टरचा अलार्म वाजू लागेल.

इतकेच नव्हे तर हा ऍप मोबाईल आणि कंप्यूटर कॅमेरा पण डिटेक्ट करू शकतो. आणि जर रेडियेशन जास्त असेल तर संपूर्ण रेष काली होईल आणि खालची रेष स्क्रीनच्या वर चालू लागेल. यातून तुम्हाला समजले कि काहीतरी गडबड आहे.

हिडन कॅमेरा डिटेक्टर ऍपचा वापर करताना आम्हाला कोणतीही अडचण आली नाही आणि हा कॅमेरा डिटेक्ट करण्यास सक्षम आहे. तसेच माइक्रोफोन आणि रेडियेशनची पण माहिती देतो. हा कधीकधी चुकीच्या पण सूचना देतो. खासकरून एकदा कॅमेरा डिटेक्ट केल्यावर ऍप पूर्णपणे बंद न करता तुम्ही पुन्हा डिटेक्ट करण्याचा प्रयत्न केल्यास माहिती चुकीची मिळेल. जास्त लांबचा कॅमेरा डिटेक्ट करता येत नाही.

याचा इन्फ्रारेड कॅमेरा डिटेक्टर चांगले काम करतो आणि कमी प्रकाशहत पण हा एखाद्या ठिकाणी कॅमेरा लागला आहे कि नाही ते सांगेल. टिप्स एंड ट्रिक्स मध्ये तुम्हाला कशाप्रकारे आणि कुठे छुपा कॅमेरा शोधू शकता याची पद्धत सांगण्यात आली आहे जे सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. एकंदरीत हे ऍप्लिकेशन चांगले आहे पण यात खूप सुधारणेची गरज आहे. फ्री ऍप मध्ये खूप अड्स आशेत त्यामुळे तुम्ही फक्त 50 रुपयांत तुम्ही ऍड फ्री ऍप चा वापर करू शकता. गूगल प्ले वरून हा ऍप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

The post होटल किंवा चेंजिंग रूम मधील छुपा कॅमेरा आणि माइक मोबाईलने कसा शोधावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-detect-hidden-camera-in-marathi/feed/ 0
वनप्लस 6टी चे 7 फीचर्स जे आहेत इतरांपेक्षा वरचढ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-oxygen-os-9-tips-and-tricks/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-oxygen-os-9-tips-and-tricks/#respond Wed, 20 Mar 2019 14:09:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3904 पुढे आम्ही वनप्लस 6टी च्या अशाच काही खास ट्रिक्सची माहिती दिली आहे.

The post वनप्लस 6टी चे 7 फीचर्स जे आहेत इतरांपेक्षा वरचढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रीमियम फोन जेव्हा कमी रेंज मध्ये घेण्याचा विचार येतो तेव्हा सर्वात आधी लोक वनप्लस चे नाव घेतात. चांगले स्पेसिफिकेशन, शानदार परफॉर्मन्स आणि सोप्प्या ऑपरेटिंग सिस्टम मूळे याला फ्लॅगशिप कीलर म्हटले जाते. याचकारणामुळे थोड्याच काळात कंपनीने प्रीमियम सेग्मेंट मध्ये सॅमसंग आणि ऍप्पल सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकत नंबर एक ब्रँड बनली आहे. वनप्लस फोन ऑक्सीजन ओएस वर चालतात जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. परंतु ऑक्सीजन ओएस सह तुम्हाला काही खास फीचर्स मिळतात जे साधारण एंडरॉयड फोन मध्ये दिसत नाहीत. अलीकडेच कंपनी ने वनप्लस 6टी मध्ये ऑक्सीजन ओएस 9 आणला आहे आणि यात अनके नवीन फीचर्स तुम्हाला दिसतील. पुढे आम्ही वनप्लस 6टी च्या अशाच काही खास ट्रिक्सची माहिती दिली आहे.

1. मोशन वॉलपेपर

वनप्लस फोनच्या वॉलपेपरची चर्चा खूप होते. नवीन ओएस सह तुम्हाला मोशन वॉलपेपर दिसतील जे एंडरॉयड पाई सॉफ्टवेयर फ्लेवर्ड आहेत. मोशन वॉलपेपरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला
1. होम बटण थोडा वेळ प्रेस करायचा आहे.
2. असे करताच खाली काही ऑप्शन तुम्हाला दिसतील त्यात वॉलपेपरची निवड करा.
3. वॉलपेपर जेव्हा तुम्ही स्क्रोल कराल तेव्हा शेवटच्या काही वॉलपेपर मध्ये छोटा माउंटेन दिसेल. तुम्हाला यातील एखादा निवडायचा आहे. आता जेव्हा पण तुम्ही स्क्रीन अनलॉक कराल एक ऍनिमेशन दिसेल ज्यामुळे फोनचा वापर अजून मजेशीर होईल.

2. स्क्रीन अनलॉक ऍनिमेशन

तुम्हाला तर माहीतच आहे कि वनप्लस 6टी मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. जेव्हा तुम्ही स्क्रीन अनलॉक करता तेव्हा एक इफेक्ट येतो. तुम्हाला हवं असल्यास तो इफेक्ट पण बदलू शकता. फोन मध्ये प्रीइंस्टॉल तीन ऍनिमेशन आहेत. तुम्ही यातील कोणत्याही एकाची निवड करू शकता. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरचे ऍनिमेशन बदलण्यासाठी
1. सर्वात आधी फोनच्या सेटिंग मध्ये जा.
2. तिथे सिक्योटिरी आणि लॉक स्क्रीनची निवड करा.
3. यात तुम्हाला फिंगरप्रिंटचा ऑप्शन दिसेल तो निवडा.
4. त्यांनतर सर्वात आधी तुम्हाला फोन लॉक कोड टाइप करावा लागेल. त्यांनतर पुढे गेल्यानंतर खाली फिंगरप्रिंट ऍनिमेशन इफेक्टचा ऑप्शन दिसेल. तुम्ही आपल्या इच्छेनुसार कोणताही निवडू शकता.

3. शेल्फ

वनप्लस ने तुमचा यूजर एक्सपीरियंस चांगला करण्यासाठी यात शेल्फचा ऑप्शन दिला आहे. जेव्हा होम स्क्रीन तुम्ही डावीकडे स्क्रोल कराल तेव्हा हि विंडो येईल. यात तुम्ही बघू शकता कि कोणत्या ऍप्सचा वापर तुम्ही जास्त करता, कोणत्या कॉन्टेक्ट्सना तुम्ही जास्त कॉल करता आणि रिसेंट ऍप्सची पण माहिती मिळेल. इथून तुम्ही ऍप्स ओपेन पण करू शकता आणि कॉन्टेक्ट्सना कॉल पण करू शकता. तुम्ही आपल्या फोन मधून शेल्फ डिसेबल पण करू शकता. यासाठी सर्वात आधी
1. होम स्क्रीन वर थोडा वेळ प्रेस करा.
2. काही सेकंदांनी खाली काही ऑप्शन दिसतील.
3. तुम्हाला यात होम सेटिंगचा पर्याय मिळेल तो क्लिक करा.
4. यात शेल्फ दिसेल तो ऑफ करा.

4. आईकॉन नाव आणि स्टाइल

वनप्लस 6टी मध्ये ऑक्सीजन ओएस सह अजून एक चांगला फीचर आहे ज्यात तुम्ही एखाद्या ऍप आईकॉनचे नाव आणि लेबल पण बदलू शकता. जसे कि तुम्ही व्हाट्सऍपला चॅट म्हणू शकता किंवा फेसबुकला टिकटॉक. जे हवे ते तुम्ही नाव ठेवू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला
1. कोणत्याही ऍप आईकॉन वर थोडा वेळ टच करून ठेवा.
2. असे करताच काही ऑप्शन पॉप-अप मध्ये दिसतील.
3. तुम्हाला एडिटचा पर्याय निवडायचा आहे.
4. असे केल्याने नाव एडिट करण्याचा आणि लेबल बदलण्याचा ऑप्शन येईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदलू शकता.

5. डार्क थीम

एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम क्यू चा पहिला बीटा वर्जन गूगल ने आता रोल आउट केला आहे. त्यातील काही फीचर्स पण दाखवण्यात आले आहेत आणि यात डार्क थीमची खूप चर्चा आहे. परंतु वनप्लस मध्ये हि डार्क थीम आधीपासूनच उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला
1. सर्वात आधी सेटिंग मध्ये जा आणि तिथून थीम निवडा.
2. याखाली डार्क थीमचा पर्याय मिळेल. हा ऑन करा.

6. थीम एक्सेंट कलर
वनप्लस 6टी मध्ये यूजरच्या सुविधेसाठी छोट्याछोट्या गोष्टींची काळजी घेतली आहे. कंपनी ने यात थीम एक्सेंट कलर सेट करण्याची सुविधा दिली आहे. ज्यात तुम्ही थीम मधील आईकॉन आणि सेंटिंगचे रंग बदलू शकता. यासाठी
1. सेटिंग मध्ये जा.
2. तिथे डिस्प्ले निवडा.
3. तिथे खाली एक्सेंट कलरचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा आणि रंग निवडा.

7. ऍप्स कॉपी
लोका आपली ऑफिस आणि पर्सनल लाइफ वेगळी ठेवायची असते. त्यामुळे ते सोशल मीडिया वर दोन प्रोफाइल बनवतात. यासाठी वनप्लस ने पॅरलल ऍप्सचे फीचर ऑक्सीजन 9 सह दिले आहे आणि हे वनप्लस 6टी मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही एका फोन मध्ये दोन व्हाट्सऍप आणि फेसबुक सहित अन्य सोशल मीडिया ऍप्स वापरू शकता.

The post वनप्लस 6टी चे 7 फीचर्स जे आहेत इतरांपेक्षा वरचढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-oxygen-os-9-tips-and-tricks/feed/ 0