एखादा अपघात झाल्यास फोन अनलॉक न करता अपघातग्रस्त व्यक्तीच्या घरच्यांना कसे कळवावे, नक्की वाचा या उपयोगी टिप्स

एकेकाळी जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी गरजेच्या होत्या. आजकाल यात एक चौथी गोष्ट जोडली गेली आहे, ‘अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल’. आपण संपूर्ण दिवस स्मार्टफोन किंवा मोबाईल आपल्या जवळ बाळगतो. फेसबुक, व्हाट्सऍप, यूट्यूब, चॅटींग , वीडियो कॉल सारख्या गोष्टी आपण दिवसभर वापरतो. आपली मूलभूत गरज बनलेला मोबाईल फोन कॉल, मेसेज आणि मनोरंजनाच्या कामी येतो पण त्याचबरोबर या मोबाईल मध्ये काही असे फीचर्स पण आहेत जे आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात. सर्वांच्या फोन मध्ये Emergency call चे फीचर आहे, पण फक्त काही लोकांना माहित आहे कि हे फीचर किती उपयोगी आहे आणि गरजेचे आहे.

सर्वात आधी Emergency call फीचर बद्दल बोलायचे तर सध्या जवळपास सर्व स्मार्टफोन यूजर आपला फोन लॉक करून ठेवतात. पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक मुळे कोणीही आपला फोन अनलॉक करू शकत नाही. या सिक्योरिटी फीचर्समुळे फोनची प्राइवेसी कायम राहते पण जरा विचार करा जर एखादी व्यक्ती अपघातग्रस्त झाली तर त्याच्या घरच्यांना कळवणे पण गरजेचे असते. आणि अश्या वेळी फोन लॉक असल्याने अडचण येते. Emergency call फीचर अश्या परिस्थितीसाठी बनला आहे, ज्यात फोन अनलॉक न करता अपघातग्रस्त व्यक्तीच्या घरच्यांना सूचित करता येऊ शकते.

असा करा आपल्या स्मार्टफोन मध्ये Emergency call ऍक्टिव्ह :

1. सर्वात आधी फोन लॉक करा आणि होम पेज वर या.

2. जेव्हा फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा Emergency call चा ऑप्शन दिसतो, तो प्रेस करा.

3. Emergency call टच करताच पॅड ओपन होईल आणि सोबतच तुम्हाला डिस्प्ले वर ‘+‘ Emergency Contact म्हणजे आपत्कालीन कॉल मध्ये नंबर ऍड करण्याचा ऑप्शन मिळेल. त्यावर टच करा.

4. आपत्कालीन कॉन्टेक्ट नंबर जोडण्याआधी फोन अनलॉक करण्याची कमांड येईल. आपला अनलॉक पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटने फोन अनलॉक करा.

5. फोन अनलॉक झाल्यानंतर कॉन्टेक्ट लिस्ट येईल, यातून आपल्या घरच्यांचा किंवा मित्रांचा नंबर निवडा.

6. नंबर निवडल्यांनंतर फोन मध्ये बॅक बटण दाबा, इथे Emergency Contact ऑप्शन येईल आणि सोबतच तुम्हाला इथे निवडलेले कॉन्टेक्ट पण दिसतील.

7. हे कॉन्टेक्ट नंबर तुमच्या Emergency Contact लिस्ट मध्ये सामील झाले आहेत. तसेच अनेक फोन मॉडेल मध्ये इथे तुमची मेडिकल इंर्फोमेशन टाकण्याचा ऑप्शन असेल. तुम्ही ब्लड ग्रुप किंवा एखादा आजार ऍड करू शकता, जो आपत्कालीन काळात उपयोगी पडू शकतो.

एकदा Emergency Contact लिस्ट मध्ये फोन नंबर आला कि कोणीहीव्यक्ती व्यक्ति तुमचा फोन अनलॉक न करता त्या निवडलेल्या लोकांच्या नंबर वर कॉल करू शकेल

फोन बुक मधून पण करू शकता सिलेक्ट

1. Emergency call ऑप्शन व्यतिरिक्त तुम्ही थेट फोन बुक किंवा कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये जाऊन पण आपत्कालीन कॉल साठी नंबर निवडू शकता.

2. कॉन्टेक्ट लिस्ट किंवा फोन बुक ओपन करा आणि त्या कॉन्टेक्ट वर जा जो तुम्ही Emergency call साठी निवडू इच्छित आहात.

3. कॉन्टेक्ट ओपन केळ्यावर तिथे नाव, नंबर, ऑर्गेनाइज़ेशन व ईमेल सोबतच Add to Emergency Contacts चा पण ऑप्शन मिळेल. तो टच करा.

4. नंबर ऍड केल्यावर तो तुमच्या Emergency Contact लिस्ट मध्ये येईल.

5. एकापेक्षा जास्त लोकांना Emergency Contacts मध्ये ऍड करण्यासाठी याची पुनरावृत्ती करा.

Emergency call फीचरचे महत्व आणि आवश्यकता समजून आपण स्वतःच्या फोन आणि आपल्या कुटुंबियांच्या फोन मध्ये पण हे फीचर ऍक्टिव्हेट केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here